हक्काचा नेता संग्रामसिंह पाटील* (बाबा)२५ वर्षाची सत्ता कायम टिकविली.....
मनोजकुमार मस्के - मांगरूळ
शिराळा तालुक्यातील प्रतिष्ठेची समजली जाणारी मांगरूळ येथील ग्रामपंचायत निवडणूक नुकत्याच पार पडल्या. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा गटाचा धुरळा उडवत ग्रामपंचायतची एक हाती सत्ता राष्ट्रवादीच्या हाती ठेवून संग्रामसिंह पाटील खऱ्या अर्थानं किंगमेकर ठरले.
गेले अनेक वर्षे गावची सत्ता संग्रामसिंह पाटील यांच्या हाती असून गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन आमदार फंडाच्या माध्यमातुन अनेक कामे त्यांनी केली. गावातील लोकांच्या अडीअडचणींना त्यांनी नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. कृष्णराव पाटील पतसंस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना ते कमी व्याजदरात कर्जपुरवठाही करतात. दिन दुबळ्यासाठी व गरजू व्यक्तींसाठी सातत्याने झुकणारा, जनसामान्यांच्या हाकेला धावणारा अशी प्रतिमा असलेला नेता संग्रामसिंह पाटील समाजात त्यांचे नाव आदराने घेतले जाते...
असे म्हणतात कि कर्तृत्व निर्माण करण्यासाठी राजकीय बलाढ्य हस्तीचे वरद हस्त असावेच लागते. खर्या अर्थाने संग्रामसिंह पाटील यांचे चुलते माजी पंचायत समिती सदस्य रंगराव पाटील (बापू), माजी आमदार शिवाजीराव नाईक आणि सध्याचे आमदार मानसिंगराव नाईक (भाऊ) यांचे मोठे पाठबळ असल्यामुळे विकासाच्या कामावर मांगरूळ गावात संग्रामसिंह पाटील यांनी गरुड भरारी घेतली .
एखादी व्यक्ती संग्रामसिंह पाटील यांचे कडे आली आणि ती व्यक्ती रिकाम्या हातानी गेली असे आजतागत घडले नाही. त्या व्यक्तीचे प्रश्न मार्गी लावल्याशिवाय संग्रामसिंह पाटील स्वस्त बसत नाहीत. याच उल्लेखनीय स्वभावाने संग्रामसिंह पाटील यांची हाक आणि त्या हाकेला जनतेची साथ मिळाल्याने राजकीय प्रतिस्पर्धीचा संग्रामसिंह पाटील यांच्यासमोर टीकाव लागला नाही.
नेते अनेक निर्माण होतात, मात्र जनसामान्यांच्या मनामध्ये आपुलकीचे घर निर्माण करणारे आणि जनसामान्यांना प्रेम देणारे नेते खूपच कमी असतात. जी व्यक्ती दुसर्याचे दु:ख समजते आणि त्यांच्यावर प्रसंग निर्माण झाल्यास ती पुढे सरसाऊन त्याच्या समस्यांचा निपटारा करते अशी अगळीवेगळी छाप जनमानसात उमटवणारी व्यक्ती म्हणजेच संग्रामसिंह पाटील होय.
चौकट -
मांगरूळ येथील जनतेने नेहमीच मला साथ दिली आहे व माझ्या वरती विश्वास दाखवला आहे. म्हणुनच मी लोकांची सेवा करू शकतो. माझ्या गावाने माझ्यावर व माझ्या पॅनलच्या सर्व उमेदवारांच्या वर दाखविलेल्या विश्वासास मी सदैव ऋणी राहीन, मी मांगरूळच्या जनतेचे आभार मानतो त्याचे हे प्रेम असेच माझ्या पाठीशी खंबीर राहो. व सरपंच तानाजी आढाव सदस्य भगवान मस्के, प्रदीप माने, मनीषा कुंभार, शोभा मस्के, शोभा पाटील, रेश्मा खांडेकर या सर्व टीमला पुढील पाच वर्षाची सेवा करण्यासाठी बळ मिळो.
- संग्रामसिंह पाटील , (बाबा) उपसरपंच मांगरूळ
शब्दांकन:- मनोजकुमार मस्के -मांगरूळ
Comments
Post a Comment