मांगरूळचा हुशार आणी कर्तुत्ववान सरपंच - तानाजी आढाव (आबा)

 मांगरूळ- वार्ताहर,.  - शब्दांकन:- सुजित आढाव 
अगदी सकाळी घरातून बाहेर जाताना रिक्षावाल्याने १०० रूपये सुट्टे दिले तरी त्याचे आपण आभार मानतो. साधे मोटरसायकल वरून ऐखाद्याने नेले तरी आपण अभार व्यक्त करतो, ऐखाद्या अडचणीच्या वेळेला  आपल्याला मदत करणारी व्यक्ती अशा सर्वांचे आपण आभार मानतो. पण आपल्यावर विश्वास ठेऊन सतत सावली बनून माझ्या गावाने माझ्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला मी जागणार हा माझा शब्द आहे.  व माझ्यावर विश्वास ठेऊन मला भरघोस मताने विजयी करणारे माझ्या गावातील लोक, माझे भावंडं, मित्रमंडळी व विशेष करून गावातील तरूण पिढी या सर्वांचे मला आभार मानायचे आहेत. 

माझ्यावर विश्वास दाखवून आपण जे मला मताच्या माध्यमातून दिलेलं दान आहे ते मी कधीही विसरणार नाही व आपल्या विश्वासाला पात्र राहील अशीच यापुढे काम करत राहील. माझे वय जरी 80 वर्षे असले तरी एखाद्या तरुणाला लाजवेल असं मी काम करून दाखवीन. माझी उरली सुरली जी काही वर्ष मला गावाची सेवा करण्यासाठी मिळत आहेत यापेक्षा मोठे पुण्य कोणतेच नाही. शिवाय याही वयात आपण आणि श्री.संग्रामसिंह पाटील(बाबा)ह्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासाला मी पुरेपुर जागेन व यानंतर माझ्या कामातुन मी माझी ओळख सदैव ठेवीन. 
चार दिवसाचे राजकारण संपले तिथेच माझे विरोधक ही संपले, माझा या गावात एकही विरोधक नाही, जी आहेत ती सर्व माझीच माणस आहेत. अशा खेळीमेळीत मी काम करणारा सरपंच असेल. खऱ्या अर्थाने येणाऱ्या पाच वर्षात जी कामे होतील त्यावरूनच माझी ओळख स्पष्ट होणार आहे. त्यामुळे मी सदैव गावचा विकास कसा होईल याच दृष्टीने प्रयत्न करणार आहे.

श्री चिंचेश्वर प्रसन्न, मंगरूळचे ग्रामदैवत, व संपूर्ण गावाची थळपांडर तसेच शिवछत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, यांना नतमस्तक होऊन मी गावचा कारभार स्वच्छ ठेवेन अशी आपणास खात्री देतो. व आपण मला सरपंच होण्याची संधी दिलीत त्याबद्दल आभार व्यक्त करतो. मी  माझ्या     मांगरुळच्या जनतेचा नेहमीच ऋणी राहीन धन्यवाद !

चौकट :- 
मित्रांनो, इथे एक गोष्ट आवर्जून नुमद करावीशी वाटते, सरपंचामध्ये कीतीही चांगले गुण असले तरीही त्याला गावकऱ्यांच्या सहभागा शिवाय काहीच करता येत नाही. आणि जर लोकांनी दुर्लक्षित केले तर सरपंच फक्त नावाचा बनून राहतो.  त्यामुळे गावातील लोकांनी त्याला प्रतिसाद देणं, प्रोत्साहीत करणंही तितकंच आवश्यक असतं. लोकांनी ग्रामपंचायतीच्या कारभारात व ग्रामसभेत आवर्जून सहभाग घेतला पाहिजे. गावाच्या विकासाचा भार एकट्या सरपंचावर देऊन गावे कधीच समृद्ध होऊ शकणार नाहीत. हे देखील तितकेच खरे..! त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारात लोकसहभाग हा महत्वाचा ठरतो.
- तानाजी आढाव -सरपंच मांगरुळ

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*