चिंचेश्वर यात्रा मांगरूळ
श्री चिंचेश्वर मंदिर मांगरूळ सर्व भक्तांना कळविण्यात येते की यावर्षी श्री चिंचेश्वर देवाची यात्रा व पालखी दिनांक २ एप्रिल रोजी आहे. तरी मांगरूळ यात्रा कमिटीच्या वतीने यावर्षीचा यात्रा सोहळा चांगला करण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत. येणाऱ्या भक्तांची व्यवस्था चांगली व्हावी या दृष्टीने यात्रा कमिटी काम करत आहे. तरी यावर्षीचे यात्रेसाठी आसपासच्या परिसरातील सर्व भाविकांनी मोठ्या प्रमाणात यावे असे आव्हान यात्रा कमिटीने केलेले आहे.
*विशेष सूचना चिंचेश्वर देवालयाच्या नावे कोणी देणगी मागत असल्यास कृपया देऊ नये. ज्यांना दान करायचं असेल त्यांनी प्रत्यक्ष मंदिरात येऊन प्रत्यक्ष दानपेटीत दान करावे, अथवा प्रसाद रुपी स्वतः आणून स्वतः द्यावे. परस्पर कोणाजवळही देणगी देणे कृपया टाळावे. असे यात्रा कमिटीचे म्हणणे आहे. देणगी बाबत पुजारी अथवा अन्य कोणत्याही व्यक्तीचा फोन आल्यास कृपया माहिती न घेता दानधर्म करणे योग्य नाही. आपणास दान करायचे असल्यास मंदिरामध्ये त्या पद्धतीचे पावती बुक ठेवलेले आहे. आपण एक रुपयापासून आपल्या इच्छेप्रमाणे दान करावे . धन्यवाद! आपणा भक्त मंडळींची उपस्थिती मोठ्या प्रमाणात असावी*.
यात्रा कमिटी मांगरूळ
Comments
Post a Comment