*गावक-यांचा स्नेहमेळावा......चिंचेश्वर यात्रा*

*गावक-यांचा स्नेहमेळावा......चिंचेश्वर  यात्रा*
✍️ *शब्दांकन :श्री. सुवर्णसिंग मस्के सर*

*खरंतर यावर्षीची चिंचेश्वरची  यात्रा  वेगवेगळे  रुप घेऊन भरतेय...यात्रा  म्हटलं की प्रत्येक घरात प्रत्येक कुटुंबात लहानापासून वृद्धांपर्यंत उत्सुकता लागलेला प्रत्येकालाच आनंदी ठेवणारा  सार्वजनिक सर्वात मोठा सण उत्सव*..... *दरवर्षी  गुढीपाडव्यानंतर 12व्या  दिवशी  येणा-या या चिंतामणीच्या यात्रेची* *आपण  सर्वजण  उत्सुकतेने वाट पाहात असतो. नविन  वर्षाचे  कॅलेंडर जेंव्हा जेंव्हा*  *प्रत्येकाच्या हाती  येईल तेंव्हा  आपण प्रथम  काय शोधून काढतो तर ? आपली  यात्रा* 😆 *बरोबर  ना?*
*आपण  गावकरी  खुपच  भाग्यवान आहोत. आपली यात्रा गावच्या लोकसंख्येच्या मानाने पश्चिम  भागात  सर्वांत मोठी यात्रा  म्हणून प्रसिद्ध आहे*. 
*घरादाराची स्वच्छता  परिसराची  स्वच्छता  देवालय  परिसराची  स्वच्छता या गोष्टी  करता करता गुढीपाडव्यानंतर एक एक  दिवस  पुढे सरकत  यात्रेचा मुख्य  दिवस  जवळ  येऊन  ठेपतो.मग काय लहान चिमुरड्या मुलामुलींपासून ते वृद्ध माणसांचे यात्रा  नियोजन ठरू लागते*. *चिमुरड्यांचे यात्रेत काय  वस्तू घ्यायची?  ट्रॅक्टर, जेसीबी, ट्रक  बाहुली बांगड्या माळा याचे नियोजन  तर  मोठ्यांचे लहान मुलांना कपडे, घरातील विविध वस्तू, यात्रेसाठी मलकापूरच्या बाजारात  बकरं खरेदी😆 याचं नियोजन..*महिला  विभागात.... लाडक्या  लेकी ,नातवंडे यांना  चार दिवस राहायला  बोलवायचे त्यांची उठाठेव, खाणे, पिणे  कोड कौतुकाची  आनंदाने व उत्साहाने  तयारी करायची.  पै पाहुण्याच्या  जेवणावळींसाठी  दळपकांडप मालमसालाची  तयारी करायची..तरुणाईची आगळीवेगळीच तयारी  असते. यात्रेच्या आदल्या दिवशीच पुजारी मंदिरात व मंदिर बाहेर सजावट सडा रांगोळी घालून  लाईटींग लाऊन मंदिर  भक्तांच्या स्वागताला सज्ज ठेवतो. पहिल्या  दिवशी* *पहाटेपासूनच भक्तांच्या दंडस्नानाने सुरवात होते. वर्षानुवर्ष 40/50वर्षापासून  दंडस्नान घालणारे  अनेक गावकरी भक्त अजुनही भक्तिभावाने  दंडस्नान घालत आहेत* *दंडस्नान घालणारे महिला- पुरुष भक्त हे दंडस्नानाची  सुरवात  पहाटे  2/3वाजले  पासून  घरातील देव्हा-यातील देवदेवतांना नमस्कार करून हात जोडून  लोटांगण घेत नतमस्तक होत सुरवात करतात. परत उठून   उभा राहुन देवाला नमस्कार करत भक्तांचा  घरापासून मंदिरापर्यंत  अखंड हा भक्तीमय प्रवास  सुरू असतो. मंदिराला  दंडस्नानाचे  पाच फेरे मारून आंघोळ  करून देवदर्शनाने  दंडस्नानाचा  शेवट होतो. दंडस्नान पहाणे  हा लहान मुलांना कुतूहलाचे  व नाविन्याचे दर्शन वाटते* *पहाटेपासूनच मंदिरात घंटानाद अखंड सुरु होतो. गावातील लोक देवदर्शनासाठी  गर्दी करतात. सकाळी 11वा. पासून देवाला बैलगाड्या काढण्यासाठी बैलगाडीत आंबिल ठेवणे ,बैलांची व बैलगाडीची सजावट करणे याची  तयारी  जोरात असते.  अलिकडे  बैलगाड्यांची संख्या कमी होत त्यांची    जागा ट्रॅक्टर व इतर वाहनांनी घेतलीय.मनमोहक व आकर्षक  वाकुर्डेच्या पुंगीच्या निनादाच्या  मैफलीत आपल्या बैलगाडीची मिरवणूक  काढण्याची प्रथा मात्र   काही बैलगाडीवाणांनी*   *अजूनही  टिकूवून ठेवली आहे. संपूर्ण  यात्रा  परिसर मिठाई दुकाने, खेळणी , पाळणे, झोपाळे, भेळ,आइस्क्रीम गाडे, आणि  पै पाहुणे, भक्तजन, माहेरवाशीन  व गावकरी  माणसांनी उत्साहाने फुलून जातो*. *समाजप्रिय  तरुण  मंडळी मोफत लस्सी, सरबत वाटप करून रणरणत्या उन्हात भक्तांच्या ओठामध्ये व पोटामध्ये गारवा व तृप्ती निर्माण करतात. दिवसभर लेकी माहेरवाशीन यांचा देवाला नारळ  देणे, देवदर्शन घेणे. प्रत्येक  व्यक्ती भेटेल त्यांच्याशी हस्तांदोलन  करत नमस्कार करत हसतमुख  गप्पा गोष्टी करत दिवसभर व्यस्त असतो.संपूर्ण  दिवस  लहान मुले  शेजारीपाजारी घरची माणसं पाहुणे यांच्या  सहवासात व गप्पाटप्पात  कधी  कसा संपतो कळत नाही. दिवसभर किलबिलाट करणारी चिमुकली पाखरे मात्र रात्र झाली तरी त्याच आनंदात  व उत्साहाने खाली वर  लुडबुड करत असतात. सायंकाळी भक्तासाठी भंडारा महाप्रसादाचे आयोजन असते*.  *रात्र झाली  की चाहुल लागते ती चिंतामणीच्या पालखीची.....रात्री 11च्या दरम्यान सासनकाठ्या व चिंतामणी  पालखी  वाजत गाजत व नाचत येते. नवसफेडीचे  नारळ अर्पण करायला  सासनकाठ्याजवळ  झुंबड उडते यामध्ये पवार, कुंभार मस्के लो हार गायकवाड यांच्या  सासनकाठ्यांचा समावेश असतो. चिंतामणी  पालखी  दर्शनासाठी  व पालखीवर गुलालखोबरे  उधळण्यासाठी  सर्व  गावकरी बांधव लहान मुले  व महिला भगिनी तोबा गर्दी करतात मंदिराचा रस्ता भक्तांनी  माणसांनी फुलून जातो. दिवसापेक्षा  रात्री  पालखीला होणारी  गर्दी दुप्पट असते. पालखीला खांदा  देण्यासाठी  भक्तांची  चढाओढ  लागते. तर पालखी दर्शनासाठी देखील तितकीच  चढाओढ असते .परिसरात  फटाके, औषधे, विद्युत रोषणाई बरोबरच .... चिंतामणी च्या नावाने  चांगभलं ... आप्पासाहेबाच्या घोड्याच्या नावानं  चांगभलं चांगभलं... या जयघोषाने  परिसर  आनंदी उत्साही वातावरणाने दुमदुमतो. चिंतामणीचा पालखी सोहळा दिमाखदार  साजरा  झाल्यानंतर रात्री  दोन अडीच  वाजता गावकरी  परतीच्या  वाटेला लागतात.  गुलालखोब-याच्या  मुक्त  उधळणीमुळे प्रत्येकजण भक्तीमय व  संपूर्ण  गुलालमय झालेला असतो. घरी येऊन एक डुलका  काढतो ना काढतो  तोच त्याला खाटक्याच्या बक-याच्या आरोळीने  जाग येते* . *आता ख-या अर्थाने  यात्रा   पार्ट 2 सुरू होते. हौशेला  मोल नसते  या उक्ती प्रमाणे  पै पाहुणे ,मित्र मंडळी यांच्या  जेवणावळीसाठी  पहाटेपासूनच मटनासाठी  गर्दी  सुरु  होते. घरी मटन  शिजत शिजत मटनावर व रस्स्यावर ताव मारत मारत.चर्चा सुरू होते..ती. कुस्ती मैदानाची..दुपारी 3 वाजता  .*हनुमानाचा  फोटो व कोल्हापूरी भगवे  फेटे गुंडलेल्या यात्रा कमिटीचे आगमन धनगरी ढोल व  *हालगीच्या  ठेक्यावर व तुतारीच्या निनादाने कुस्ती मैदानात  होते*.  
*मग सुरु  होतो कुस्ती रणसंग्राम* .. *निवेदकाच्या  प्रत्येक बोलण्याच्या  लकबीवर  मैदान मंत्रमुग्ध होऊन जाते*. *गोरा गोमटा दिसाय देखणा ...विकास पाटील त्याचं नाव आणि मांगरुळ त्याचं गाव...*
*अखंड महाराष्ट्र  गाजवलेला*
*सहा फुट उंचीचा देखणा पैलवान सुमित खांडेकर...*  
 *बाभळीचा  बुंधा ...रामा फोंडे....* ....
 *अशा अनेक  उपाधीने पैलवान व शौकीनात उत्साह येतो. चटकदार व आकर्षक  कुस्त्याने मैदान पार पडते. आॅलंम्पिक वीर  बंडा पाटील  रेठरेकर... मामा , पै आनंदा धुमाळ वस्ताद, उपमहाराष्ट्र केसरी  संपतराव जाधव दादा  अशा नामवंत वस्ताद मंडळीची दरवर्षी मैदानात  हजेरी  असते. कुस्त्या रात्री आठपर्यंत  संपतात. मग सुरु  होते  जेवणावळीचा कार्यक्रम  पै पाहुणे येती घरा आनंदाला नाही तोटा..... प्रत्येक घरात  पंगतीवर  पंगती  उठत  असतात.मटन व रस्स्यावर ताव मारीत  सगळीच  लोकं  तृप्त  ढेकर  देतच उठत असतात* ....
*अशा उत्साहात  यात्रा  कधी संपते  ते कळतच नाही*. 
*या यात्रेसाठी 15दिवस राब राब राबणारा घरातील महीला वर्ग  जरी दुर्लक्षित  असला तरी आपल्या कुटुंबियांच्या आनंदासाठी  तिच्या  चेह-यावरचे हास्य  तिने कधीच मावळू  दिले नाही*.
 *आपली यात्रा  एकमेव असा उत्सव आहे की आपला बाहेरगावी असलेला  गावकरी  बांधव  व आपण अनेक वर्षांनी एकमेकांना भेटतो . एकमेकांची विचारपुस  करतो. सुखदुःखाची चर्चा करतो.  आपला स्नेहभाव  प्रकट करतो*. *आपले गावक-यांशी एक प्रकारचे असलेले अतूट नातं जपतो.*आपल्या  गावकरी बांधवांचे हे एक गेट टुगेदरच आहे* . 
*यावर्षी  1एप्रिलला  क्रिकेट सामने तर 2/3एप्रिलला  मुख्य  यात्रा भरत आहे* *तरी  सर्व बाहेरगावीस्थित गावकरी  बांधवांनी आपल्या चिंतामणी देवाच्या यात्रेसाठी नियोजन  करून वेळ  काढून नक्कीच या*. 
*आपल्या  सर्वांच्याच भेटीच्या प्रतिक्षेत- *आपले कुटुंबिय व मांगरुळ  ग्रामस्थ*

✍️ *शब्दांकन :श्री. सुवर्णसिंग मस्के सर*

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*