मनोजकुमार मस्के चिखली : वार्ताहर लग्न म्हटलं की एक वेगळाच जल्लोष असतो. बेंड बाजा, घोडा, सनई, डाॅल्बी, खुप सार्या पदार्थांची मेजवानी , नवीन कपडे. अगदी जल्लोष पण कोरेनामुळे तरुणाईचा हा जल्लोष पुर्ण मंदावला. कोरेना व्हाईरसच्या भितीने लोकं लग्न कार्यात, रक्षाविसर्जन, अशा विविध ठिकाणी जायला मागत नाही. अनेक लग्नमंडपात तर फक्त चारच मुंडकी, अनेकजण लग्नाला का बोलवले नाहीस म्हणून भांडणारी मंडळी आज सांगुन सुद्धा लग्नात आली नव्हती. अक्षदाला एरवी दोन - तीनशे लोकं आसणार्या मंडपात आज फक्त दहा - पंथराच लोकं होती. कोरेनाने एक वेगळीच दहशत निर्माण केली असून. रोज एकत्र येऊन कार्यक्रम करणारी मंडळी आज एकमेकांकडे संशयाने पाहत आहेत. आपुलकीने मिठी मारणारे मुंबईचे मित्र लांबूनच हाय हॅलो म्हणून भेटण्याचे टाळत आहेत. प्रत्येक समारंभात कलकल करणाऱ्या महिला तोंडाला पदर लाऊन कोणाशीही न बोलता गप्प आहेत. एवढंच काय तर मुंबई -पुण्यावरून आलेल्या आपल्या घरातील माणसांच्या शेजारी सुद्धा लोकं उभी राहायला तयार नाहीत. आजूबाजूला कोणी आजारी असले तरी त्याल...