*हक्काचा माणूस संग्रामसिंह (बाबा)*
*हक्काचा माणूस संग्रामसिंह (बाबा)*
करडा आवाज, रोखठोक बोलणे, कार्यकर्त्यावर विश्वास, आणी मनाने हळवा असणारा आमचा हक्काचा माणूस संग्रामसिंह पाटील (बाबा) कै. कृष्णराव पाटील उद्योग समूहाच्या माध्यमातून गावातील व परिसरातील अनेक युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारी ही मांगरूळ गावातील पहीली व्यक्ती असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही.
आज संग्रामसिंह पाटील (बाबा) यांच्याकडे लोकं हक्काने आपली कामे घेऊन येतात. अनेकांची कामे स्वतःच्या खिशातून करणारा हा नेता खऱ्या अर्थाने अनेकांचा हक्काचा माणूस बनला आहे. कोणतेही काम हक्काने सांगावे असा हा माणसातला माणूस म्हणून अनेकांना परीचीत आहे. रात्री अपरात्री उठून संग्राम बाबांनी अनेक लोकांना मदत केली आहे. मदत करत असताना कोण कुठल्या पक्षाचा आहे, ज्या माणसाला मदत केली तो परत करेल का? नाही. अशा कुठल्याही शंका मनात येत नाहीत. त्यावेळी समोरच्या व्यक्तीचे काम महत्वाचे एवढंच या माणसाच्या डोक्यात असतं.
संग्रामसिंह पाटील (बाबा) यांचा स्वभाव स्पष्ट बोलने हा आहे. त्यामुळे ते नेहमी रोखठोक बोलतात कदाचीत समोरच्याला त्यांचा राग येत असेलही पण माघारी बोलने हे मात्र संग्रामसिंह पाटील (बाबा) यांना कधी जमलच नाही. तोंडावर गोड आणि माघारी मापं काढणं हे त्यांच्या रक्तात नाही. काय असेल ते तोंडावरच त्यामुळे अनेकजण बोलतानाच विचारकरूनच बोलतात.
संग्रामसिंह पाटील (बाबा) शब्दांनी जरी कठोर असले तरी मनानी फार हळवे आहेत हे मात्र खरे आहे. आत्ता जरी ते कठोर शब्दात बोलले असतील तर थोड्याच वेळात ते तितक्याच मायेने त्या व्यक्तीशी बोलतील. एखादी गोष्ट मनावर न घेता ती लगेच विसरणे हा त्यांचा गुण आणेकांना माहिती आहे. त्यामुळे हा माणूस प्रत्येकाला हक्काचा माणूस वाटतो
संग्रामसिंह पाटील (बाबा) यांनी आपल्या उद्योग समुहाची सुरवात ही आपल्या गावापासून केली आहे. 1993 साली त्यांनी कृष्णराव पाटील ग्रामीण पतसंस्थेची स्थापना केली. त्यानंतर विकास सेवा सोसायटीची स्थापना केली. अलीकडे शाखा विस्तार करून तालुक्यात कमी व्याजदराने कर्ज वितरणासाठी अनेक शाखांच्या माध्यमातून जाळे निर्माण करण्याचा त्याचा प्रामाणीक प्रयत्न आहे. लोकांना कमी व्याजाने व भरमसाठ कागदपत्र न घेता सुलभ पद्धतीने कसे कर्ज देता येईल याकडे त्यांचे लक्ष सतत असते. म्हणूनच तर कमी कालावधीत अनेक शाखांचे ते जाळे निर्माण करू शकले. शाखा विस्तार करत असताना प्रामुख्याने कर्जदाराला सोप्या पद्धतीने कर्ज घेऊन परतफेड ही सोप्या पद्धतीने कशी करता येईल याकडे प्रामुख्याने संस्थापकाने लक्ष दिले पाहिजे हा त्यांचा मानस आहे. अनेक चुका सुधारत त्यांनी संपूर्ण तालुकाभर आपल्या संस्थेचे काम व शाखा सुरू केल्या आहेत.
खऱ्या अर्थाने संग्रामसिंह पाटील (बाबा) यांनी आजपर्यंत केलेल्या प्रामाणिक कामाची ही पोहच पावती म्हणावी लागेल यात तिळमात्र शंका नाही. आज संग्राम बाबांचा वाढदिवस तसं वाढदिवस साजरा करणे हे त्यांना पटत नाही . पण कार्यकर्ते व मित्रपरिवार त्यांना शुभेच्छा तर देणार यात तिळमात्र शंका नाही. अशा या हक्काच्या माणसाला वाढदिवसाच्या हक्काच्या शुभेच्छा !💐💐💐💐💐🎂🎂🎂🎂
Comments
Post a Comment