अभ्यास करून पोराला IAS, IPS बनवायचं अन् कराड-खोक्याभाई त्याची नियुक्ती करणार?, मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र व्हायरल
अभ्यास करून पोराला IAS, IPS बनवायचं अन् कराड-खोक्याभाई त्याची नियुक्ती करणार?, मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र व्हायरल आदरणीय मुख्यमंत्री साहेब, माझ्या ११ वर्षाच्या मुलाने मला काल प्रश्न विचारला आप्पा मी मोठा झाल्यावर कलेक्टर होऊ का? किंवा त्यापेक्षा मोठा अधिकारी? त्याच्या या प्रश्नामुळे मीच बुचकळ्यात पडलो. कारण माझ्यासमोर बीडचं प्रकरण समोर आलं. वाल्मिक कराड, त्याचं टोळकं, धस, मुंडे, तो खोक्या भाई… अभ्यास करून पोराला IAS, IPS बनवायचं आणि असल्या फाल्तू लोकांची चाकरी करायला लावायची? आम्ही नोकरदार माणसं आहोत. आमच्या आई-वडिलांनीही इमाने-इतबारे नोकरीच केली. आजही रिक्षाने प्रवास करायचं म्हटलं तर आम्ही आधी खिसा चाचपडतो. ITR लेट झाला तर छाती धडधडते. मग या खोक्याभाई सारखी मंडळी हेलिकाॅप्टरमधून कशी फिरतात हो? पैशांच्या गड्ड्या उडवतात. आयकर विभाग तेव्हा झोपा काढतं का? की आयकर विभागाला फक्त नोकरदारांवरच लक्ष ठेवायला सांगीतलंय? आणि असले खोक्या भाई भाजपचे पदाधीकारी? त्यांचे ‘आका’ भाजपचे आमदार? अहो एक सुसंस्कृत पक्ष म्हणून भाजपची ओळख होती. मनोहर पर्रिकर, नितीन गडकरी, अरुण जेटली...
Comments
Post a Comment