वेळ आली आहे गावासाठी काहीतरी करण्याची
मांगरूळ ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व गणेश मंडळांना विनंती करण्यात येते की, या संकटसमयी आपण सर्वांनी एकत्र येऊन यातुन मार्ग काढणे गरजेचे आहे. आज आपले मंडळ संकटात सुद्धा मदतीचा हात पुढे करत आहे. हा अभिमान फार मोठी शिकवन देऊन जाते. आता खऱ्या आर्थाने युवक मंडळांची गरज गावाला आहे. मला वाटतं सर्व गणेश मंडळ, संघटना, युवा ग्रुप स्वतःहु या सामुदायीक कामात भाग घेतील. आणी या कामात आम्ही शासनाच्या खांद्याला खांदा लावुन काम केले याचा आनंद घेतील. तसेच या मंडळांना ग्रामपंचायतीकडून प्रशासनाला मदत केली व संकटकाळी हे मंडळ नेहमीच गावासोबत असते असे प्रमाणपत्र सुद्धा देईल असं सरपंच व पोलीसपाटील यांनी सांगीतले. आता आपल्या सर्वांची नितांत गरज गावाला आहे.
गावात कोरेनासारखा शत्रु न येवू देण्याची जबाबदारी आता शिवछत्रपतींच्या मावळ्यांवर आहे. मला वाटतं सुईच्या टोकाऐवढ्या कोरोनासारख्या शत्रुला आम्ही गावात फिरवुन सुद्धा देणार नाही. असं म्हणण्याची वेळ आली आहे. चला ऐक चांगलं काम करण्यासाठी स्वतःहून ग्रामपंचायतीत मंडळाचे नाव, स्वःताचे नाव नोंदणी करून आपले कर्तव्य पार पाडूु. आत्ता नाही तर पुन्हा कधीच नाही. ही वेळ ऐकत्र येण्याची आहे. ज्या प्रमाणे शीवतेज मंडळ, जांबेवाडी मंडळ पुढे येऊन सहकार्य करत आहे त्याप्रमाणे प्रत्येक मंडळाकडून आपेक्षा आहे. आणी आज या संकटाला माझ्या गावातील तरूण मुलंच वाचवतील यात तिळमात्र शंका नाही.
भावांनो ऐक विनंती कोणीही नदीवर आंघोळीला जाऊ नका कारण आपण आपल्याच गावाचे नाव आपणच घालवने हे पटत नाही.
कृपया ही वेळ कोणीही चेष्टेवारी घेवू नये. हात जोडून विनंती आहे.
मनोजकुमार मस्के
Comments
Post a Comment