तालमी बंद असल्याने पैलवानांना 'लाईव्ह' धडे
चिखली :- आज जगावर कोरोना सारखं महाभयंकर संकट आले आसताना आख्खा देश घरामध्ये आहे. ईतकं भयानक संकट येईल असं स्वप्नातही आले नाही. सुपर फास्ट धावणारा देश जाग्यावरच उभा राहिला आख्खी आर्थव्यवस्था ढासळली आणि देवावर विश्वास ठेवणारी जनता सरकारच्या धावा करू लागली. जगातील सर्व देवांनी आपापली दारे खिडक्या लावून घेतली तेंव्हा माणूसपण विसरलेल्या माणसाला माणसात देव दिसू लागला. देशाचा खजिना खाली होवू लागला. लोकं मिळेल ती मदत करू लागली. याच भावनेने संस्थापक कुस्ती हेच जीवन या संघटनेने पंतप्रधान मदत निधनिधीसाठी 12000 चा निधी मदत म्हणून दिला. तसेच एक वर्ष पुर्ण झाल्याबद्दल या संघटनेच्या माध्यमातून अनेक गरजुंना मदतीचे कीट देण्यात आले. एकच वर्ष झाले या संघटनेला . कुस्ती हेच जीवन नेहमीच मदतीचा हात पुढे करत असते. यानंतर मुख्यमंत्री मदत निधनिधीसाठी सुद्धा काही मदत करणार असल्याचे संस्थापक पै.रामदास देसाई सर यांनी सांगितले.
या लाॅकडाउन च्या काळात फेसबुक, युट्यूब च्या माध्यमातून अनेक पैलवानांना फेसबुक लाईव्ह आणुन मार्गदर्शन दिले. अनेक डावांची माहीती ,अनेक जुन्या पैलवानांच्या आठवणी लोकांच्या पर्यंत पोहचवल्या. सध्या तालमी बंद असल्याने पैलवानांना कुस्ती हेच जीवन या संघटनेच्या माध्यमातून शोशर मिडीयावर पहाता व वाचता आले. संपूर्ण महाराष्ट्रातील पैलवान, वस्ताद यांचा कुस्ती हेच जीवन या फेसबुक लायुव्हला मोठा प्रतीसाद असल्याचे निदर्शनास आले.
चौकट:- आत्तापर्यंत कुस्ती हेच जीवन संघटनेशी लायुव्ह आलेले पैलवान व पुढे येणारे पैलवान हिंद केसरी दिनानाथ सिह (आण्णा), त्रिवार महाराष्ट्र केसरी, विजय चौधरी, त्रिवार महाराष्ट्र केसरी नरसिंह यादव, राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते राम सारंग, रुस्तुम हिंद केसरी व महाराष्ट्र केसरी अमोल बुचडे, पैलवान अमर निबाळकर (SAI कुस्ती प्रशिक्षक), कुस्ती निवेदक सर्जेराव मोरे सर (गारगोटी), बाबा लिम्हण (पुणे), कुस्ती अभ्यासक पैलवान अशोक जाधव (पुणे), अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष मा.डी आर. जाधव (आण्णा) तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेले नामवंत पैलवान व कुस्ती प्रशिक्षक
चौकट :- सुरक्षेच्या दृष्टीने अनेक पैलवान आपपल्या घरी गेल्याने तालमीतील सराव बंद झाला. अनेक पैलवान आपल्या घरीच मेहनत मारत आहेत. त्यातच कोरेनामुळे अनेक कुस्ती मैदाने बंद झाली. सर्वच जन गरीब घरातील असल्याने पैशे येणे बंद झाले आहे. त्यामुळे खुराक सुद्धा घेणे मुश्कील आहे. लवकरात लवकर हे संकट टळो हीच बजरंग बली प्रार्थना
-: पै. राम सारंग ,राष्ट्रकुल पदक विजेते
Comments
Post a Comment