शिराळ्यातील एका युवकाने चक्क आपल्या मुलांचे केस आपणच कापले
चिखली :- कोरोनाच्या भितीने अनेकांनी आपली घरे बंद करून घेतली आहेत. कोणीही शेजारच्या घरात जायला मागत नाही की माणसाच्या बाजूला उभं राहायला मागत नाही. अनेकांनी महिन्याचे रेशन भरून घरात ठेवले आहे. नेमके कितीदिवस लागणार कोरेना मुक्त होण्यासाठी हे नेमकं माहीत नाही. या कालावधीत मुलांच्या खाण्यापिण्यपेक्षा मोठा प्रश्न आहे तो त्यांच्या वाढलेल्या केसांचा. या वाढलेल्या केसांच्या मुळे अनेक मुलांना सर्दी होणे यासारखे अजारपणास सामोरी जावं लागत आहे. त्यातच बाहेर हेअर कटींग सलून सगळे बंद असल्याने लहान मुलांचा मोठा प्रश्न समोर उभा राहीला. परंतु शिराळ्यातील एका युवकाने चक्क आपल्या मुलांचे केस आपणच कापले आणि याही संकटाला पळवून लावले. वेळ सगळं काही करायला लावते हे मात्र खरं आहे.
दादा हा युवक शिराळयाचा आहे की मांगरूळ चा
ReplyDelete