आज दिवसभर गावचा बुरूज अत्यंत चांगल्या व विना तक्रार जांबेवाडी गणेश मंडळांने पार पाडला.
मला कौतुक करावं वाटतं ते म्हणजे न्यु गणेश मंडळ जांबेवाडी येथील कार्यकर्त्यांचे चारच घरांच मंडळ पण गावासाठी संकट आले आणि या चार घरातील पोरं गाव राखायला तयार झाली. आणी त्यांनी आज दिवसभर गावचा बुरूज अत्यंत चांगल्या व विना तक्रार पार पाडला. तसं शिवतेज मंडळाने सुद्धा संपुर्ण दिवस प्रामाणिक गड राखन्याचे काम केले. आज दिवसभर प्रत्येक कार्यकर्ता स्वतःहुन आपण दिलेली जबाबदारी पार पाडत होते.
काल अजित पाटील व विशाल खांडेकर मिस्त्री यांनी सरबत वाटला व आज गावातील सुवर्णसिंग मस्के यांनी बिस्किटे दिली. आजीत पाटील, नागेश मस्के, रूपेश मस्के यांनी प्रत्येकांनी वेगळा वेगळा सरबत दिला. अभिजीत ढेरे यांनी बिस्कीटे व प्रशांत पोतदार यांनी चहा तर खवरे गणेश मंडळांच्या कार्यकर्ते यांनी द्राक्षे खावू घातली.
Comments
Post a Comment