*कर्तृत्ववान पत्रकार संजय घोडे पाटील यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा*!
*कर्तृत्ववान पत्रकार संजय घोडे पाटील यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा*! पत्रकारिता हे केवळ वृत्त संकलनाचे माध्यम नसून, समाजातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे, अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याचे आणि सामान्य माणसाच्या समस्या सक्षमपणे मांडण्याचे प्रभावी व्यासपीठ आहे. या क्षेत्रात प्रामाणिकपणे आणि निष्ठेने कार्य करणारे दैनिक पुण्यनगरीचे शिराळा तालुका प्रतिनिधी मा. संजय घोडे पाटील (दादा) हे आपल्या कार्यातून पत्रकारितेची वेगळी ओळख निर्माण करीत आहेत. माजी जनसंपर्क अधिकारी तसेच आमदार रोहित पवार यांचे कर्जत येथील स्वीय सहाय्यक म्हणून काम करताना मिळालेला प्रशासकीय व सामाजिक अनुभव त्यांच्या पत्रकारितेत निश्चितच उपयुक्त ठरत आहे. नवागत पत्रकारांना मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणूनही त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करताना सहकाऱ्यांना प्रोत्साहन देणे, नव्या पत्रकारांना योग्य दिशा दाखविणे आणि सामाजिक प्रश्नांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. शिराळा तालुक्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय तसेच लोकहिताच्या...