*एक मल्लविकासाच्या युगाचा अंत – कै. पै. शिवाजी (भाऊ) कृष्णा जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली*
*एक मल्लविकासाच्या युगाचा अंत – कै. पै. शिवाजी (भाऊ) कृष्णा जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली* मनोजकुमार मस्के, मांगरूळ कराड सांगली जिल्ह्यातील कुस्ती क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे, नवनवीन मल्ल घडवणारे आणि सामाजिक नेतृत्व करणारे कै. पै. * शिवाजी कृष्णा जाधव (भाऊ)* यांचे नुकतेच आकस्मित निधन झाले. त्यांच्या निधनाने रेड गावासह संपूर्ण कुस्ती विश्वावर शोककळा पसरली असून, ही केवळ एक व्यक्ती नाही, तर एक युग संपल्याची भावना सर्वत्र आहे. कै. जाधव हे * सांगली जिल्हा तालीम संघाचे जेष्ठ सदस्य , शिराळा तालुका तालीम संघाचे उपाध्यक्ष , रेड गावचे माजी उपसरपंच* तसेच * शिवछत्रपती तालीम संघाचे संस्थापक* होते. त्यांनी आपल्या कुशल मार्गदर्शनातून रेड गावात मल्लांची नवी पिढी घडवली. त्यांच्या शिस्तप्रिय व समर्पित वृत्तीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक कुस्ती मैदानांवर रेड गावाचे मल्ल विजयी ठरले. त्यांचे योगदान केवळ कुस्ती क्षेत्रापुरते मर्यादित नव्हते. * निष्कलंक आणि निर्व्यसनी जीवनाचा आदर्श* ठेवून त्यांनी अनेक युवकांना फौजदार, पोलिस, व शासकीय सेवेकडे वळवले. समाजहितासाठी झटणारा, गावा...