*"कुस्ती हेच जीवन" या चळवळीचे धडाडीचे नेतृत्व – रामदास देसाई सर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा*!


*"कुस्ती हेच जीवन" या चळवळीचे धडाडीचे नेतृत्व – रामदास देसाई सर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा*!
*लेखन – मनोज मस्के, पत्रकार, दै. पुण्यनगरी*

काही व्यक्तिमत्त्वं अशी असतात की त्यांच्याशी एकदा संवाद झाला, की आपल्या आयुष्यातील  भावना, गुपितं, मनातली घुसमट त्यांच्या समोर सहज व्यक्त होते. ते ऐकतातही मनापासून आणि शब्दही देतात — "मी आहे ना रे सोबत..."
असंच एक दिलदार, समर्पित आणि कुस्तीला आयुष्य मानून चालणारं नाव म्हणजे मा. रामदास देसाई सर – "कुस्ती हेच जीवन" या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष.

*उगम एका छोट्या रोपट्याचा*...

सन २०१७ मध्ये ‘फेसबुक पेज’च्या माध्यमातून सुरू झालेली ही चळवळ – "कुस्ती हेच जीवन" – केवळ एक डिजिटल उपक्रम नव्हता, तर मातीशी नाळ जोडलेल्या आणि देशभरातल्या कुस्तीप्रेमींना एकत्र आणणारा आत्मीय प्रयत्न होता.

पैलवानांचे प्रशिक्षण, खुराक, लढतींचे व्हिडीओ, कुस्ती संस्कृतीची माहिती या माध्यमातून भारतातच नव्हे, तर परदेशातही पोहोचवली गेली. आज त्याच छोट्या रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे – पेजवर ५०,००० पेक्षा अधिक फॉलोअर्स हे याचेच प्रतीक!


*अडथळ्यांवर मात करणारा ‘रामदास*’

चांगलं काम करताना संकटं येतातच. देसाई सरांच्याही वाट्याला हे आलं. पेज, युट्यूब चॅनेल बंद पाडण्याचा प्रयत्न झाला. सगळी मेहनत, लेखन, व्हिडीओ गेलं. पण ते म्हणतात ना – "हार मानणं हे रामदासांना जमत नाही!"

सरांनी पुन्हा नव्यानं सुरुवात केली. पुन्हा फेसबुक पेज उघडलं, नवा आत्मविश्वास, नव्या ताकदीने. आणि अवघ्या तीन महिन्यांत २५,००० लाईक्स मिळवले. ही आहे खऱ्या सोन्याची ओळख.


*सेवेचा वसा – वृक्षारोपण ते कोरोना मदतपर उपक्रम*

२५,००० फॉलोअर्स झाल्याच्या आनंदात २५ झाडांचं वृक्षारोपण, तर कोविड काळात प्रधानमंत्री सहाय्यता निधीसाठी १२,००० रुपये निधी, पुरग्रस्तांना मदत, आणि पैलवानांना खुराक वाटप हे उपक्रम म्हणजे त्यांच्या निस्वार्थ सेवाभावाची साक्ष.

इतकंच नव्हे, तर त्यांनी साके (ता. कागल) येथे ऐतिहासिक कुस्ती मैदान, तुरूकवाडी येथे देशातील पहिले ऑनलाईन कुस्ती मैदान आणि हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी यांचे डाव प्रदर्शन घडवून आणले.


*आपलं माणूसपण*

रामदास सर कोणाचं कौतुक पैसे घेऊन करत नाहीत. कुणीतरी चांगलं काम करत असेल, तर सर स्वतः फोन करून माहिती घेतात आणि त्या व्यक्तीचं कौतुक समाजासमोर मोकळेपणाने मांडतात.

त्यांची राहणी साधी, भाषा स्पष्ट, आणि विचार सरळ. म्हणूनच ते सर्वसामान्यांना आपलेसे वाटतात. राम सारंग सरांच्या शिकवणीत घडलेला हा शिष्य, खऱ्या अर्थानं "रामाचा दास" झाला. आजही गुरूंच्या विचारांनी चालणारा हा माणूस कागल तालुक्यातील एक तुफानी वादळ बनला आहे – पण शांत, शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी.


*वाढदिवसानिमित्त एक सन्मान*

आज रामदास देसाई सरांचा वाढदिवस. हा दिवस म्हणजे त्यांच्या कार्याची, त्यागाची आणि प्रेरणादायी नेतृत्वाची आठवण करून देणारा सण. आज लाखो कुस्तीप्रेमींना दिशा देणाऱ्या या योध्याला हृदयपूर्वक शुभेच्छा!


*"कुस्ती हेच जीवन" या विचारधारेसाठी आयुष्य झोकून देणाऱ्या रामदास सरांना सलाम*!

संपर्क:
*मनोज मस्के*
पत्रकार – दै. पुण्यनगरी
📞 9529309640 / 9890291065

Comments

Popular posts from this blog

अभ्यास करून पोराला IAS, IPS बनवायचं अन् कराड-खोक्याभाई त्याची नियुक्ती करणार?, मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र व्हायरल

शिरशी गावच्या लोकनियुक्त पहिल्या सरपंच – सौ. स्मिताताई बापूराव भोसले

*केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी झालेली भेट आणि आलेला अनुभव*....