*एक मल्लविकासाच्या युगाचा अंत – कै. पै. शिवाजी (भाऊ) कृष्णा जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली*


*एक मल्लविकासाच्या युगाचा अंत – कै. पै. शिवाजी (भाऊ) कृष्णा जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली*

मनोजकुमार मस्के, मांगरूळ

कराड सांगली जिल्ह्यातील कुस्ती क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे, नवनवीन मल्ल घडवणारे आणि सामाजिक नेतृत्व करणारे कै. पै. *शिवाजी कृष्णा जाधव (भाऊ)* यांचे नुकतेच आकस्मित निधन झाले. त्यांच्या निधनाने रेड गावासह संपूर्ण कुस्ती विश्वावर शोककळा पसरली असून, ही केवळ एक व्यक्ती नाही, तर एक युग संपल्याची भावना सर्वत्र आहे.

कै. जाधव हे *सांगली जिल्हा तालीम संघाचे जेष्ठ सदस्य, शिराळा तालुका तालीम संघाचे उपाध्यक्ष, रेड गावचे माजी उपसरपंच* तसेच *शिवछत्रपती तालीम संघाचे संस्थापक* होते. त्यांनी आपल्या कुशल मार्गदर्शनातून रेड गावात मल्लांची नवी पिढी घडवली. त्यांच्या शिस्तप्रिय व समर्पित वृत्तीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक कुस्ती मैदानांवर रेड गावाचे मल्ल विजयी ठरले.

त्यांचे योगदान केवळ कुस्ती क्षेत्रापुरते मर्यादित नव्हते. *निष्कलंक आणि निर्व्यसनी जीवनाचा आदर्श* ठेवून त्यांनी अनेक युवकांना फौजदार, पोलिस, व शासकीय सेवेकडे वळवले. समाजहितासाठी झटणारा, गावाच्या उन्नतीसाठी झिजणारा असा हा द्रष्टा कार्यकर्ता आज काळाच्या पडद्याआड गेला.

त्यांच्या कुस्ती परंपरेचा वारसा त्यांच्या सुपुत्रांनीही समर्थपणे चालवला आहे. *पै. विक्रम जाधव व पै. विशाल जाधव* हे कुस्ती क्षेत्रात यशस्वी ठरले असून, वडिलांचा आदर्श त्यांनी आपल्या कामगिरीतून जपला आहे.

आज त्यांच्या निधनानंतर *कराड व सांगलीतील सर्व कुस्ती संघटना, वस्ताद मंडळी, आजी-माजी मल्ल आणि सामाजिक कार्यकर्ते* हळहळ व्यक्त करत आहेत. त्यांच्या आठवणी आणि कार्यगौरव सदैव प्रत्येकाच्या मनात अढळ राहतील.

*भावपूर्ण श्रद्धांजली!*

"कर्तृत्वाला मृत्यू नसतो. कार्याची पाऊले काळाच्या वाळूत ठसा उमटवून जातात"

Comments

Popular posts from this blog

अभ्यास करून पोराला IAS, IPS बनवायचं अन् कराड-खोक्याभाई त्याची नियुक्ती करणार?, मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र व्हायरल

शिरशी गावच्या लोकनियुक्त पहिल्या सरपंच – सौ. स्मिताताई बापूराव भोसले

*केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी झालेली भेट आणि आलेला अनुभव*....