शित्तूरच्या आनंदराव पाटलांनी गॅरेज व्यवसायातून यशस्वी उद्योजकतेचा घडवला आदर्श प्रवास*
"*कोण म्हणतं मराठी तरुण उद्योगात यशस्वी होत नाही*?"
*शित्तूरच्या आनंदराव पाटलांनी गॅरेज व्यवसायातून यशस्वी उद्योजकतेचा घडवला आदर्श प्रवास*
*वाढदिवसानिमित्त मित्रासाठी खास लेख*
🖊️ *मनोजकुमार मस्के, मांगरूळ*
"कोण म्हणतं मराठी तरुण उद्योगात यशस्वी होत नाही?" – हे विधान खोडून काढले आहे शाहुवाडी तालुक्यातील शित्तूर गावचे सुपुत्र मा. आनंदराव पाटील यांनी. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची, वडील शेतकरी, शिक्षण अपुरं... पण मेहनतीवर आणि प्रामाणिकपणावर अपार विश्वास ठेऊन त्यांनी निर्माण केला यशाचा नवा प्रवास.
*गावाकडून शेडगेवाडीकडे – एक यशोगाथा*
शित्तूरसारख्या छोट्याशा खेड्यात जन्मलेले आनंदराव पाटील यांनी शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी येथे मोटरसायकल दुरुस्ती गॅरेज सुरू करून आपल्या उद्योजकीय वाटचालीची सुरुवात केली. सुरुवातीला हाताशी मोठं भांडवल नव्हतं, पण मनात प्रचंड आत्मविश्वास होता.
प्रामाणिक काम, गोड बोलणं आणि ग्राहक सेवा – या तीन गोष्टींवर त्यांनी ग्राहकांची मने जिंकली
*गॅरेज ते शोरूम – यशाचा टप्पा*
उत्कृष्ट सेवा आणि नावारूपाला आलेल्या व्यवसायामुळे काही वर्षांतच त्यांनी शेडगेवाडीत स्वतःची जागा खरेदी करून शोरूम सुरू केले. केवळ व्यवसाय वाढवण्यापुरताच नव्हे, तर त्या परिसरात व्यवसायाचा नवा आदर्श उभा केला.
आज त्यांच्या शोरूमच्या मागे आलिशान घर, समोर यशाचं शिल्प उभं आहे. हे सगळं करत असतानाही आनंदराव पाटील यांनी आपली माती, आपली संस्कृती, आणि पारंपरिक साधेपणा कायम ठेवला आहे.
*प्रेरणादायक व्यक्तिमत्त्व*
आज अनेक तरुण नोकरीच्या शोधात शहरांकडे धाव घेतात, पण आनंदराव पाटील यांचं जीवन सांगतं – स्वतःच्या गावात, कमी भांडवलात, सचोटीने काम केल्यास मोठं यश गाठणं अशक्य नाही.
त्यांच्या शोरूमला भेट दिल्यास हे प्रकर्षानं जाणवतं – की यश म्हणजे केवळ श्रीमंती नव्हे, तर लोकांच्या विश्वासाची कमाईसुद्धा.
✨ *तरुणांसाठी प्रेरणा*
आनंदराव पाटील यांचा प्रवास म्हणजे ग्रामीण भागातील युवकांसाठी एक जीवतंत प्रेरणा आहे. अडचणींना न घाबरता, परिस्थितीवर मात करत, त्यांनी व्यवसायातून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
Comments
Post a Comment