वाटचाल एका दीपस्तंभाची – डी. वाय. एस. पी. दीपक कांबळे
वाटचाल एका दीपस्तंभाची – डी. वाय. एस. पी. दीपक कांबळे
मनोजकुमार मस्के, मांगरूळ
गावाच्या मातीशी नातं जपणारा, हलाखीच्या परिस्थितीतून उभा राहून समाजात दीपस्तंभ ठरलेला अधिकारी म्हणजे डी. वाय. एस. पी. दीपक कांबळे. आज त्यांचा वाढदिवस, आणि हा दिवस म्हणजे केवळ एक शुभेच्छा देण्याचा नव्हे, तर त्यांच्या प्रेरणादायी वाटचालीचा गौरव करण्याचा एक सुवर्णक्षण आहे.
सन 2009 साली दीपक कांबळे यांनी "अचाट पुस्तक" या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली. शिक्षण हा मुलभूत हक्क असावा, ही भावना घेऊन त्यांनी पुढच्याच वर्षी "नालंदा अभ्यास केंद्र" या संकल्पनेचा जन्म घडवला. सुरुवातीला एका पडक्या इमारतीत, वीज नसताना मेणबत्तीत अभ्यास करणाऱ्या काही जिद्दी विद्यार्थ्यांपासून सुरुवात झालेली ही चळवळ, आज मंगरूळ गावात शिक्षणाचा मजबूत वटवृक्ष बनून उभी आहे.
नालंदा अभ्यास केंद्र हे केवळ अभ्यासाचे ठिकाण नव्हते, तर स्वप्न पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची ऊर्जा देणारे एक विद्यास्थान ठरले. दीपक कांबळे यांनी गावातील मुला-मुलींमध्ये अधिकारी होण्याची उमेद जागवली. त्यांच्या प्रयत्नांनी गावातील अनेक विद्यार्थी यशस्वी झाले. आज हे केंद्र IPS, IRS, PSI, शिक्षक, पोलीस अधिकारी घडवणारे केंद्र म्हणून ओळखले जाते.
गरीब घरची पार्श्वभूमी, हालअपेष्टा आणि संघर्ष यांचा सामना करत दीपक कांबळे यांनी स्वतः PSI पदापर्यंत मजल मारली आणि पुढे जाऊन आज D.Y.S.P. पदावर कार्यरत आहेत. सध्या ते पुणे येथे आपल्या कार्यरत असूनही, त्यांच्या मनात गावासाठी धडपडणारी एक वेगळीच भावना आहे.
अनेकजण अधिकारी झाल्यावर आपल्या गावाकडे पाठ फिरवतात, पण दीपक कांबळे यांनी उलट गावासाठीच पुढाकार घेतला. त्यांनी ‘नालंदा अभ्यास केंद्र’ सारख्या नव्या संस्थांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना पुस्तके आणि मार्गदर्शन विनामूल्य उपलब्ध करून दिले. शिक्षणाच्या या लढ्यात त्यांना गावकऱ्यांनी, सहकाऱ्यांनी आणि हितचिंतकांनी साथ दिली, पण या चळवळीचा खरा शिल्पकार दीपक कांबळे हेच आहेत, यात शंका नाही.
"स्वतः पुढे जाणं हे यश आहे, पण इतरांना पुढे नेणं हे खरे नेतृत्व आहे."
हीच ओळख आज दीपक कांबळे यांच्या कार्यातून उमगते.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा
Comments
Post a Comment