राजारामबापूंच्या इस्लामपूरात....!
- मधुकर भावे अनेक महिन्यांनंतर इस्लामपुरात जायचा योग आला होता. इस्लामपूर हे राजारामबापू यांचे गाव. महाराष्ट्रात काही गावं अशी आहेत, जी काही व्यक्तिमत्त्वाशी त्यांची नावं नाळेसकट जुळलेली आहेत. इस्लामपूर म्हणजे बापू. सांगली म्हणजे वसंतदादा. बारामती म्हणजे पवारसाहेब. एकेकाळी पुण्याची ओळखसुद्धा जेधे-मोरे-गाडगीळ या ित्रकुटामुळे होती. या नावाशी ती ती गावं जोडली गेली. कारण या व्यक्तिमत्त्वांनी आपल्या गावाला सगळ्या अर्थाने खूप उंचीवर नेवून ठेवले. बापू त्यात फार आघाडीवर म्हटले पाहिजेत. ७० वर्षंापूर्वी लोकल बोर्डाचे अध्यक्ष असताना बापूंनी जे काम केले, तसे काम महाराष्ट्रात कोणाचेही नव्हते म्हणून त्या लोकल बोर्डाने बापूंना एक जीप घेवून िदली. महाराष्ट्रात मोरारजी देसाईंचे सरकार होते. जीप का घेतली? याची चौकशी झाली. तेव्हा बापूंनी केलेले िढगभर काम चौकशी समितीने बघितले. जिकडे-तिकडे साकव (त्यावेळी छोट्या पुलाला साकव म्हणत.) जिकडे-तिकडे आड म्हणजे विहिर... त्यावर रहाट... प्रत्येक गावात रस्ता...आिण गावोगाव शाळा... तेव्हाचा वाळवा तालुका कुऱ्हाडी हातात घेवून खून- मारामारऱ्या याकरिता प्रसिद्...