चिखली येथील मैदानात पै उदय खांडेकर विजयीहनुमान यात्रेनिमीत्त कुस्ती मैदान पडले पार
मनोजकुमार मस्के - चिखली
चिखली:- चिखली येथील हनुमान यात्रेनिमीत्त उत्कृष्ट असे कुस्ती मैदान पार पडले. या मैदानात अत्यंत प्रेक्षणिय लढती कुस्ती शौकिनांना पहावयास मिळाल्या. या मैदानातील प्रथम क्रमांकाची कुस्ती आमदार मानसिंगराव नाईक यांनी पुरस्कृत केली होती. प्रथम क्रमांकाची कुस्ती पै. उदय खांडेकर विरूद्ध पै. प्रदिप ठाकुर यांच्यात बराच वेळ चाललेल्या कुस्तीत प्रदीप ठाकुर ने डाव मारला पण तो अंगावर आल्याने पै. उदय खांडेकर विजय झाला. त्याच बरोबर नंबर दोनची कुस्ती ओमकार भाटमारे विरूद्ध अमर पाटील यांची कुस्ती अतिशय रटाळ झाली त्यामुळे ती बरोबरीत सोडविण्यात आली. पै. नामदेव केसरे, अभिजीत भोसले, अक्षय शिंदे, दिग्विजय जाधव, विशाल जाधव, यांनी अत्यंत प्रेक्षनिय लढती करत विजय मिळविला
पंच म्हणून पै. संदीप पाटील, दिपक कुरणे, दगडू गोसावी, शिवाजी लाड, रंगराव पाटील, दत्ता आंधळकर, मारुती पाटील, भास्कर नायकवडी, दिपक गायकवाड, एल बी पाटील, भीमराव पाटील, प्रकाश तानवडे, हौसेराव पाटील यांनी काम पाहिले.
मैदानाचे उद्घटन ,माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक, सरपंच राजेंद्र नाईक (आबा), अमरसिंह नाईक (पापा), सम्राट नाईक, देवेंद्र नाईक , शहाजी नाईक, उपसरपंच सचिन पाटील, महादेव पाटील, गोरख कुरणे, दिनकर सावंत, सुदेश चौगुले, शामराव कुरणे, विक्रम पाटील, सचिन पाटील अभिजित पाटील, महादेव पाटील, सुरेश मोहिते पाटील, प्रकाश पाटील, यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
चौकट:- अनेक दिवस बंद पडलेले कुस्ती मैदान गेली दोन वर्षे झाली छोट्या स्वरूपात चालू आहेत. हळूहळू लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. येणाऱ्या पुढील काळात चिखली चे मैदान हे चांगल्या प्रकारे आम्ही करणार आहोत. चांगले कुस्तीपटू या मैदानात खेळतील चालू वर्षी पेक्षा पुढच्या वर्षी चे मैदान खरोखरच चांगलं होईल
- राजेंद्रसिंह नाईक (आबा)- सरपंच चिखली
Comments
Post a Comment