युवा उद्योजक मा सचिन येळवे वाढदिवस विशेष*.
✍️ *पै अशोक सावंत - पाटील*
---------- सोंडोली-------
शाहूवाडी तालुक्यातील सोंडोली गावचे सुपुत्र *मा सचिन येळवे यांचा आज वाढदिवस आहे*.
सचिन च्या बाबतीत बोलायचे झाले तर *शून्यातून विश्व निर्माण करणारे एक सामान्य व्यक्ती मत्व म्हणजे सचिन येळवे*....
सचिन ची परिस्थिती पहिल्या पासून हलाखीचीच,साध्या पद्धतीचे घर, त्यात सचिन एकदम लहान असताना त्यांचे वडिल आनंदा येळवे हे जग सोडून गेले. आईने लोकांच्या शेतात राबुन मुलांना वाढवले. लहानाचे मोठे केले.
सचिनचे शिक्षण म्हणावे असे काही झालेले नाही, पण म्हणतात ना माणुस *आपल्या शिक्षणाने नाही तर आपल्या बुद्धीमत्तेने मोठा होत असतो* हे सचिन येळवे यांनी दाखवून दिले आहे.
जेमतेम शिक्षण घेऊन सचिन आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मुंबईत आला, त्याच्या मामाने त्याला मुंबईत आणले. दहा बाय दहाच्या खोलीत राहुन मुंबईत सचिन हळुहळु सेटल झाला,म्हणावा असा काही पगार मिळायचा नाही.
पण सचिनला नेहमी वाटायचे की, आपण व्यवसायात करियर करायचं..... म्हणून रोज त्याच्या डोक्यात एकच प्रश्न घर करायचा. पण व्यवसाय टाकायचा म्हटले की पैसा पाहिजे, आणि तो कुठून उभा करायचा या एकाच प्रश्नाने तो कायम त्रस्त असायचा, सर्व प्रकारचे सोंग करता येते पण पैशाचे सोंग करता येत नाही. गावाकडे आई दुसर्या च्या शेतात राबुन घर चालवायची. पण देव सर्वांचे दिवस सारखे ठेवत नसतो. त्यातच सचिन विवाहबद्ध झाला, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीशी एक स्त्री असते ती म्हणजे त्याची अर्धांगिनी.. आईच्या आशीर्वादाने आणि बायकोच्या सोबतीने *सचिनने पुणे शहरात आपला एक किराणा मालाचा व्यवसाय सुरू केला*, एक दोन वर्ष हा व्यवसाय स्थिर करण्यासाठी सचिनला खुप मेहनत घ्यावी लागली, व्यवसायाची माहिती मिळेपर्यंत त्याला खुप कष्ट घ्यावे लागले. *पण म्हणतात ना कष्टाशिवाय फळ नाही आणि त्याच्या कष्टाचे फळ त्याला मिळाले*. त्याचा व्यवसाय खूप मोठा झाला, मार्केट मध्ये सचिन येळवे म्हणून त्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. सचिन आपल्या आईसंह त्याठिकाणी वास्तव्यास आहे.
सचिनला लहानपणी काढलेल्या दिवसाची आठवण आहे. आपल्याला त्यावेळी कोणी मदत केली असेल नसेल त्याला माहित नाही पण तो नेहमी गावातील विधायक कामासाठी आर्थिक स्वरुपात मदत करत असतो. *गावच्या कुस्ती मैदान साठी सुद्धा सचिन कुस्ती पुरस्कृत करत असतो*.
सचिन आता पुणे या शहरात सेटल झाला आहे. शिवाय त्याला एक मुलगा सुद्धा आहे. कुस्ती या खेळावर वर त्याचे विशेष प्रेम आहे म्हणून त्याचा एकुलता एक मुलगा पैलवान करण्याचा त्याचा माणस आहे.
अशा या सहृदयी व्यक्ती चा आज वाढदिवस त्याला *कुस्ती हेच जीवन कडुन या शब्दरूपी शुभेच्छा*...
- - - - - - - - - - - - - - - -
धन्यवाद
*पै अशोक सावंत - पाटील* कुस्ती संघटक
कुस्ती हेच जीवन
शाहूवाडी तालुका प्रमुख
9702984006
Comments
Post a Comment