भिमराव ज्ञानदेव मस्के- पाटील. भावपूर्ण श्रद्धांजली

 
 भिमराव ज्ञानदेव मस्के- पाटील. (तात्या)  आज तात्यांचे वय ८५ वर्ष . लहानपणी आम्ही लेमनच्या गोळ्या, पेपरमिंटच्या गोळ्या आणण्यासाठी ज्या दुकानात जात होतो. त्या दुकानाचे मालक भीमा दुकानदार (तात्या) असं आम्ही त्यांना म्हणत होतो. तसा तात्यांचा स्वभाव शांत, संयमी आणि दूरदृष्टीचा. फार पूर्वीचे किराणा मालाचे दुकान त्यांचे. याच दुकानाच्या जीवावर त्यांनी आपल्या मुलांना शिकवलं मोठे केलं. आज तात्यांचे  दुकान बंद आहे. परंतु भीमा दुकानदार (तात्या) या नावानेच या बंद असणाऱ्या दुकानाकडे पाहीले जाते. असे हे प्रेमळ स्वभावाचे तात्या  ८५ व्या वर्षी आम्हा सर्वांना सोडून गेले.  अशा या महान व थोर मानसाला भावपूर्ण श्रद्धांजली....

मनोज मस्के (पत्रकार)

Comments

Popular posts from this blog

शिरशी गावच्या लोकनियुक्त पहिल्या सरपंच – सौ. स्मिताताई बापूराव भोसले

*शिराळा उत्तरच्या मातीत दोन दिवसांपूर्वी जे घडलं, ते फक्त निवडणूक नव्हतं*… *तो विश्वासाचा, नात्याचा आणि घराण्याच्या संस्कारांचा विजय होता*.

*सोंडोलीमध्ये रंगणार दोन महाराष्ट्र केसरींची तुफानी दंगल देवा थापा स्पर्धेचे खास आकर्षण*