राजारामबापूंच्या इस्लामपूरात....!

- मधुकर भावे
अनेक महिन्यांनंतर इस्लामपुरात जायचा योग आला होता. इस्लामपूर हे राजारामबापू यांचे गाव. महाराष्ट्रात काही गावं अशी आहेत, जी काही व्यक्तिमत्त्वाशी त्यांची नावं नाळेसकट जुळलेली आहेत. इस्लामपूर म्हणजे बापू. सांगली म्हणजे वसंतदादा. बारामती म्हणजे पवारसाहेब. एकेकाळी पुण्याची ओळखसुद्धा जेधे-मोरे-गाडगीळ या ित्रकुटामुळे होती. या नावाशी ती ती गावं जोडली गेली.  कारण या व्यक्तिमत्त्वांनी आपल्या गावाला सगळ्या अर्थाने खूप उंचीवर नेवून ठेवले. बापू त्यात फार आघाडीवर म्हटले पाहिजेत. ७० वर्षंापूर्वी लोकल बोर्डाचे अध्यक्ष असताना बापूंनी जे काम केले, तसे काम महाराष्ट्रात कोणाचेही नव्हते म्हणून त्या लोकल बोर्डाने बापूंना एक जीप घेवून िदली. महाराष्ट्रात मोरारजी देसाईंचे सरकार होते. जीप का घेतली? याची चौकशी झाली. तेव्हा बापूंनी केलेले िढगभर काम चौकशी समितीने बघितले. जिकडे-तिकडे साकव (त्यावेळी छोट्या पुलाला साकव म्हणत.) जिकडे-तिकडे आड म्हणजे विहिर... त्यावर रहाट... प्रत्येक गावात रस्ता...आिण गावोगाव शाळा... तेव्हाचा वाळवा तालुका कुऱ्हाडी हातात घेवून खून- मारामारऱ्या याकरिता प्रसिद्ध होता.  बापूंनी याच आक्रमक आिण संतापी गावांत घरोघरी मुलांच्या हातत पाटी-पेन्सील िदली. परिणाम असा झाला की,  मोरोरजी देसाई सरकारने हे काम बघून सर्व लोकल बोर्डाच्या अध्यक्षांना जीप देण्याचा िनर्णय मुंबईत केला. बापूंचे काम िकती मोठे होते, याचे हे एक उदाहरण. प्रत्यक्ष राजकारणात आल्यावर, आमदार झाल्यावर, मंत्री झाल्यावर वीज मंत्री म्हणून ७००० हजार खेड्यांत बापूंनी वीज पोहोचवली. उद्योग मंत्री म्हणून कुरूकुंभ असेल, धाटाव असेल,  लोटे-परशुराम असेल या औद्योगिक वसाहतींना बापूंनी खूप मोठी शक्ती िदली. त्यानंतर शरद पवार उद्योगमंत्री असताना नंतर १९८० साली जवाहरलाल दर्डा उद्योगमंत्री असताना बुटीबोरी असेल, औरंगाबाद असेल िकंवा नाशिकजवळच्या एमआयडीसी असतील... यांची भरभराट झाली. बापू महसूल मंत्री असताना शेतकऱ्याच्या शेतात असलेल्या झाडाची मालकी तेव्हा सरकारची होती... बापूंनी एक विधेयक आणले.. आिण ही मालकी शेतकऱ्याची करण्याचा कायदाच केला. त्याकाळात बापूंचे मंत्रालयातील चेंबर कोणते? या प्रश्नाचे उत्तर ‘जिथे सर्वांत जास्त गर्दी ते चेंबर..’ असे सांगितले जायचे. इस्लामपूरला जाताना ३०-३५ वर्षांच्या िजव्हाळ्याच्या संबंधातले बापू आठवत राहिले. सहा फूट उंचीचे, सदा हसतमुख, स्वच्छ पांढऱ्या शुभ्र कपड्यांतले... बापू हे न विसरता येणारे व्यक्तिमत्त्व. मी तेव्हा ‘मराठा’चा छोटा वार्ताहर होतो. राहत होतो गोरेगावला... बापू मुंबईत. पण माझ्याशी त्यांचे काय ऋणानुबंध होते, माहिती नाही... बापू आिण त्यांचे मित्र डॉ. पांडे  गोरेगावला माझ्या एका खोलीच्या घरात ५० वेळा आले असतील. चहा पिऊन निघायचे. त्यामुळे बापू आिण त्यांचे गाव हा माझा एकदम िजव्हाळ्याच्या विषय. बापूंनी याच वाळव्याच्या दुष्काळी माळावर ‘वाळवा सहकारी साखर कारखाना’ उभा केला. तेव्हा बापूंना कारखाना दिला जावू नये म्हणून अगदी यशवंतराव चव्हाण, वसंतदादा, यशवंतराव मोहिते या सगळ्यांचा विरोध होता. कारण दादांचा शेतकरी कारखाना बाजूलाच, पलिकडे मोहिते यांचा कृष्णा कारखाना... पण त्यावेळचे कृषीराज्यमंत्री आण्णासाहेब िशंदे  हे बापूंना थेट इंिदरा गांधीकडेच घेवून गेले आिण कारखाना मंजुरीच्या फाईलवर थेट इंिदरा गांधींनीच सही केली. सूतगिरणीची सुरुवातही बापूंनीच केली. अॅसिटोन प्रकल्पाची सुरुवातही बापूंनीच केली. त्याचे उद्घाटन करायला त्यांनी  वसंतदादा यांना बोलावले. लोकांना वाटायचे दादा-बापूंचे भांडण आहे... दादा उद्घाटनाला आले आिण म्हणाले की, ‘विकास कामात दादा-बापू एक आहेत...’ या मोठ्या माणसांच्या भांडणाची आपण छोटी माणसे चवीने चर्चा करतो... पण, ही आकाशातील ताऱ्यांची भांडणे आहेत. आपण काजवे आहोत, हे आपल्या लक्षातही येत नाही. भांडणं लक्षात ठेवतो... या मोठ्या माणसांनी उभी केलेली कामे लक्षात ठेवत नाही. मला तर नेहमी असे वाटते की, ‘बापू, यशवंतराव मोहिते आिण मधुकरराव चौधरी हे तीन नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, इतका त्यांचा आवाका होता. त्यांना संधी िमळाली नाही. १९८० साली इंदिराजी पुन्हा सत्तेत आल्यावर त्यांनी बापूंना फोन केला होता... तो फोन जयंतरावांनी उचलला... पण बापूंनी बोलायचे टाळले. तेव्हा बापू जनता पक्षात होते. पण मला आजही असे वाटते, बापूंनी काँग्रेस सोडायला नको होती. काँग्रेसमध्येच एक िदवस बापू मुख्यमंत्री झाले असते.’ 
बापूंचे आणखी काही गुणविशेष आहेत. बापूंनी ते ज्या संस्थांचे प्रमुख होते त्या वाळवा कारखान्याच्या जनरल बॉडीने बापूंचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता... वाळवा  सहकारी साखर कारखाना या एेवजी  ‘राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना’ असे नाव द्यायचे ठरले. बापूंनी तो ठराव हाणून पाडला. व्यक्तिस्तोम करू नका, असे ते सांगायचे. त्यांनी कारखान्याला स्वत:चे नाव देवू िदले नाही. एकाही नातेवाईकाला त्यांनी त्यांच्या संस्थांमध्ये नोकरी िदली नाही. योग्यता असूनही. इतके ते करारी आिण विचारी होते. वाळवा कारखान्याचा ‘राजारामबापू कारखाना’ झाला... तो बापू गेल्यावर. तोही सर्वांच्या आग्रहामुळे. आजही  जयंतराव पाटील बापूंच्याच सार्वजनिक िशस्तीत काम करत आहेत आिण त्यांनी बापूंच्या कार्याचा पसारा वाढवला. बापूंनी ज्या नेत्यांवर विश्वास टाकला होता.... मग ते शामराव आण्णा असतील..., बी. आर. दादा असतील... किंंवा सूतगिरणीचे अध्यक्ष दिलीपराव पाटील असतील...  या सर्वांवर तेवढाच विश्वास टाकून जयंतराव यांनी सहकारातील हे काम खूप मोठे केले. त्यांचा सूत ते कापड प्रकल्पातील कारखाना पाहण्यासारखा आहे. ५०० मुलींना एका छताखाली त्यांनी काम िदले आिण त्या रोज ३ टी शर्ट  िशवतात. हे सगळे काम बापूंच्याच वाटचालीने पुढे नेले आहे. त्यामुळे ५० वर्षांपूर्वीचे इस्लामपूर आता राहिले नाही. त्या गावात रौनक आहे. त्याचे श्रेय बापू आिण जयंतराव यांना आहे. शिवाय महाराष्ट्रात िकंबहुना देशात-विनोबांनंतर पदयात्रा करणारा एकमेव नेता म्हणून राजाराम बापूंचेच नाव आहे. मी ३० वर्षांचा असताना बापूंच्या सोबत ६५ मैलाची पदयात्रा केली आहे. बापूंना पािहल्यावर नैराश्य दूर होवून जायचे, असा प्रस्ान्न चेहऱ्याचा हा नेता होता. 
अशा बापूंच्या गावात एका चांगल्या कार्यक्रमाला श्री. सचिन ईटकर यांच्यामुळे जाता आले. हा एक पुण्यातला चांगला सामािजक कार्यकर्ता आहे. ज्या कार्यक्रमाला गेलो त्या संस्थेचे नाव ‘माणुसकीचं नातं प्रतिष्ठान... इस्लामपूर’ जगात अनेक प्रतिष्ठाने असतील... आहेतही पण, माणुसकीच्या नात्याशी प्रतिष्ठान शब्द जोडला गेलेले हे प्ाहिले प्रतिष्ठान. शिवाय यात पुढाकार कोणाचा? कोणत्याही पुढाऱ्याचा नाही. आश्चर्य वाटेल. इस्लामपूर पोलीस ठाण्याचे ज्येष्ठ पोलीस िनरीक्षक कृष्णा पिंंगळे यांच्या प्रयत्नाने प्रतिष्ठान उभे राहिले. त्यांच्यासोबत एक २५ जणांची भलीमोठी टीम आहे. आपले नेहमीचे व्यवसाय, नोकऱ्या सांभाळून हे सर्वजण या प्रति्ाष्ठानचे काम जीव लावून करतात. कोरोनाच्या काळात या प्रतिष्ठानने घरोघरी जावून मािहती जमा केली. ज्यांच्या घरी कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाला... त्यांच्या घरी अनेक महिने धान्य पुरवणे, ज्यांच्या घरातील लोक रुग्णालयात आहेत त्यांना मदत करणे अशा प्रकारची सेवा हे प्रतिष्ठान दोन वर्षे करत आहे. त्यात सर्जेराव यादव, प्रा. अशोक शिंदे, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, उद्योजक संतोष पाटील, देवीचंद आेसवाल, अॅड. अमित बाढकर आदी अनेक तरुणांचा सहभाग आहे.  गरीब विद्यार्थ्यांसाठी या ‘माणुसकीचं नातं प्रतिष्ठानने’ ५० हजारांची पुस्तके वाटली. आजच्या बरबटलेल्या राजकारणात अशा सामािजक संस्था हा फार मोठा सामािजक िनतिमत्तेचा आधार आहे. अशा स्ांस्थांमुळे ‘सगळेच काही िबघडले आहे’ ही िनराशा दूर होते. म्हणून अशा कार्यक्रमांना जाण्यात सुद्धा मोठा आनंद वाटतो. कडक उन्हातसुद्धा प्रवासाचा त्रास अिजबात वाटत नाही. त्याच भावनेने कार्यक्रमाला गेलो.  याच प्रतिष्ठानने ३ व्याख्यानांचे आयोजन केले होते. दुसरे व्याख्याने अमोल यादव यांचे होते. ज्यांनी विमान बनवण्यात मोठा पुढाकार घेतला. व्याख्यान उत्तम झाल्याचे समजले. यूट्यूबवर ऐकलेही. खूप छान बोलले. अशा तरुणांना गावोगाव िफरवले पाहिजे. मी आिण सचिन ईटकर यांनी ठरले आहे की, ‘अमोलला महाराष्ट्रभर िफरवायचे...’ महाराष्ट्रात जे जे चांगले आहे, ते ते डोक्यावर घेवून नाचले पाहिजे. तरुणांपर्यंत पोहोचवले पाहिजे. त्यामुळे सगळेच अमंगल आहे, सगळेच भ्रष्ट आहे, सगळेच एकमेकांच्या अंगावर िपचकाऱ्या टाकणारे आहेत, अशा वातावरणातून महाराष्ट्रातील तरुण िपढीला बाहेर काढता येईल. म्हणून हे काम फार महत्त्वाचे आहे. त्यासाठी पदरचे पैसे खपले तरी हरकत नाही. पण  अमाेल च्या व्याख्यानांचे आयोजन करायचे ठरवले आहे. ज्या संस्थांना अशा तरुणाला बोलवावे, असे वाटेल त्यांनी मुद्दाम संपर्क करावा. मी त्यात  पुढाकार घ्यायचे ठरवले आहे. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी काळात (२०१२-१३) महाराष्ट्रात आिण देशात ११६ व्याख्याने मी िदली. चव्हाणसाहेब जे मला पहायला मिळाले ते तरुणांना सांगावेत, यात भावनेने. महाराष्ट्राने खूप मोठा प्रतिसाद िदला. जोधपूरच्या डॉक्टर गोवर्धनलाल पाराशर यांनी माझ्या पाठीतील दबलेली नस दहा िमनीटांत बाहेर काढून मला मोठ्या आजारातून बाहेर काढले. गेले वर्षभर त्यांच्या अॅस्टीओपॅथी विद्येचा पाठपुरावा करतो आहे. जे जे चांगले आहे ते ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. जे चांगले ऐकले ते लोकांना ऐकता आले पािहजे, जे चांगले पािहले ते लोकांना पाहता आले पाहिजे, त्यात फार मोठा आनंद आहे. आपण वर जाताना काय घेवून जाणार आहोत? 
इस्लामपूरच्या तिस्ाऱ्या  व्य्ााख्यानासाठी मला िनमंत्रण होते. खचाखच भरलेल्या राजारामबापू नाट्यगृहात ‘महाराष्ट्र काल-आज-उद्या’ या विषयावर बोलताना याच परिसरातील अनेक मोठ्या नेत्यांचे चेहरे मला दिसत होते. त्यात यशवंतराव चव्हाण होते, वसंतदादा पाटील होते... बापू होते... यशवंतराव मोहिते होते... जयंतआप्पा होते... क्रांतीिसंह नाना पाटील होते.... क्रांतिसंह जी. डी. लाड होते... यांनाही बापूच म्हणत. आजच्या िपढीला मािहती नाही. बापू लाड आिण नागनाथ नायकवडी केवढे मोठे स्वातंत्र्यसैनिक होते. वसंतदादांनी तर छातीवर गोळी झेलली होती. प्रख्यात कादंबरीकार ना. सि. फडके यांच्या ‘झंझावात’ या कादंबरीतील जो नायक होता तो नायक जी. डी. बापू लाड यांच्याच कर्तृत्वावर बेतलेला होता. असं खुद्द फडके यांनीच लिहून ठेवले आहे. ते बापू लाड कुंडलचे... एन. डी. पाटील याच भागातले. कराडचे पी. डी. पाटील, काका उंडाळकर हे सगळे मोठे राजकीय नेते याच महान िजल्ह्यातील. ज्या जिल्ह्याने स्वातंत्र्याच्या चळवळीत पत्री सरकार स्थापन केले ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासोबत मला वावरता आले... आचार्य अत्रे यांच्याकडे ते आले की, त्यांच्या मुलाखती घेण्याचे काम माझ्याकडे होते. व्याख्यानाला उभा राहिल्यावर हे सगळे चेहरे समोर दिसत होते. राजकारणातीलच नव्हे तर साहित्यातील वालि्मकी ग. दि.मा याच भागातील.  साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे असतील.... त्यांच्या कादंबऱ्या, त्या कादंब्ाऱ्यांवर गाजलेले चित्रपट. हा महान लेखक उच्चभ्रू साहित्यिकांनी उपेक्षित ठेवला. पण आण्णा खूप महान होता. महाकवी पी. सावळाराम येडेिनपाणीचे. त्यांचे बंधू हिंदूराव पाटील वसंतदादा यांच्यासोबत स्वातंत्र्य चळवळीत गोळीबारात शहीद झाले होते. पी. सावळाराम यांचे मूळचे नाव पंढरीनाथ पाटील. पण पोस्टात नोकरी करताना कविता छापून आणायला तेव्हा बंदी होती. म्हणून त्यांचे वर्गमित्र वि. स. पागे साहेबांनी त्यांचे नाव ‘सावळ्या तांडेल’ ठेवले. पहिल्या काही कविता त्याच नावाने छापून आल्या. मग नोकरी सोडल्यावर त्यांनी पाटील मधला ‘पी’ ठेवला आिण सावळ्याचा ‘सावळाराम’ झाला. ठाणे नगरपरिषदेत जेव्हा अध्यक्षाची िनवडणूक थेट मतदानाने झाली तेव्हा पी. सावळाराम उभे राहिले आिण मोठ्या मतांनी िनवडून आले. ते राजकारणी नव्हते. पण ‘जा मुली जा, िदल्या घरी तू सुखी रहा’ या एका गिताने ठाण्यातील सगळ्या भगिनींनी त्यांनाच मते टाकली. काहीवेळा ही अशी माणसं केवढी कामं करून जातात.  बाळासाहेब देसाई ठाण्याला त्यांच्या घरी आले. कारण बाळासाहेब हे पाटण तालुक्याचे. त्याला म्हणाले, ‘तुला काय हवे आहे?’ तेव्हा बाळासाहेब महसूलमंत्री होते. पी. सावळाराम म्हणाले, ‘या छोट्याशा गावात मला महाविद्यालयासाठी जागा द्या. (तेव्हा ठाण्याची लोकसंख्या ३० हजार होती आिण गावात टांगे होते.)’ बाळासाहेबांनी ताबडतोब अर्ज घेतला आिण आज ठाण्याचे सतीश प्रधान यांचे ‘ज्ञाानसाधना महाविद्यालय’  ज्या जागेवर उभे आहे ती जागा पी. सावळाराम यांनी बाळासाहेब देसाईंकडून मिळवून दिली आहे. माणसं काळाच्या कराळ दाढेत निघून जातात. पण त्यांची कामे मागे राहतात.... महाराष्ट्रावर बोलायला उभे राहिलं की, असे वाटतं... किती कामं.... किती माणसं.... आिण िकती मोठा महाराष्ट्र.... कोणी केला?.... कसा केला...? नवीन िपढीला काहीच मािहती नाही. इस्लामपूरमध्ये पाउल ठेवल्यापासून इस्लामपूर सोडेपर्यंत अशी अनेक चित्रं डोळ्यांसमोर येत होती. जेवढे आठवले तेवढे बोललो... अजून िकतीतरी बोलायचे आहे. खूप काही सांगायचे आहे... वेळ कमी आिण कामं जास्त आहेत. या जुन्या लोकांनी केवढी प्रचंड कामं उभा करून महाराष्ट्राची बांधणी केली. तो पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आज आरोप-प्रत्यारोपांत आरोपीसारखा पिंजऱ्यात उभा रािहल्यासारखा वाटतोय. त्यामुळे ५० वर्षांपूर्वीचा महाराष्ट्र एवढा श्रीमंत नसला तरी... लखलखाट, झगमगाट नसला तरी, प्रत्येकाच्या हातात मोबाईल नसला तरी... मनाने, विचाराने खूप मोठा हाेता. आज तो महाराष्ट्र हरवल्यासारखा वाटतो. त्या हरवलेल्या महाराष्ट्राचे जे मोठे प्रतिनिधी होते. त्यांचेच चेहरे अशावेळी समोर येतात. आता एकच आशा आहे. ती म्हणजे, शरद पवारसाहेब... महाराष्ट्राला पुन्हा वळणावर आणणणारा हा एकच नेता आता आपल्याजवळ राहिला आहे. 
- मधुकर भावे

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*