चिंतन कमी, ‘चिंता’ जास्त...! - मधुकर भावे
पाच राज्यांतील विधानसभा िनवडणूक पराभवाच्या कारणांसाठी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. िचंतन नेमके काय झाले? उद्या होणारे पराभव टाळण्यासाठी काय केले पाहिजे? यासाठी काय कार्यक्रम ठरला....? याची मािहती बाहेर आलेली नाही. पराभव झालेल्या पाच राज्यांतील प्रदेश काँग्रेस अध्यक्षांनी राजीनामे द्यावेत, असे त्यांना सोिनयाजींनी सुचविले आहे. हे सुचवावे लागते, इथपासून या शोकांतिकेची सुरुवात आहे. याला कारण कार्यकारिणीतील सर्व श्रेष्ठ नेतेही आहेत. खुद्द सोिनया गांधी, राहुल गांधी यांचे काही निर्णय चुकलेले आहेत. राज्यातील नेत्यांना जो काही दोष द्यायचा तो द्या, त्यांना हवे तर दूर करा... नवीन तरुणांना अध्यक्ष करा... अगदी साधा कार्यकर्ता असला तरी चालेल... तेच ते चेहरे अिजबातच नकोत. पण पाच राज्यांतील पराभवापैकी पंजाब आिण गोव्यातील पराभवाला काँग्रेसचे पक्षश्रेष्ठीच कारणीभूत आहेत, याची चर्चा त्या बैठकीत झाली की नाही, याची कल्पना नाही. या दोन्ही राज्यांत जो पराभव झाला, त्याची जबाबदारी श्रेष्ठींनीच घ्यायला हवी. विजय िमळाला असता तर त्यांनीच हार-तुरे स्वीकारले असते. पंजाबमध्ये तर कारण नसताना कॅप्टन अमरेंद्र िसंह यांना मुख्यमंत्रीपदावरून बदलण्याची चूक झाली. त्या िदवशी याच जागेवर ‘पक्षश्रेष्ठी घोडचूक करत आहेत... विदूषकाच्या हाती सत्ता देवू नका...’ असे मी िलहीले होते. माझ्या िलहीण्याने फरक पडेल, असे म्हणण्याइतका मी मूर्ख नाही. मी जे लिहीतो ते माझ्या समाधानाकरिता... पण, जी गोष्ट सामान्य माणसांना समजत होती, ती पक्षश्रेष्ठींना का समजत नव्हती, हे गूढच आहे. कोण चुकीचे सल्ले देतो... आिण का ऐकले जातात..? जो िसद्धू िनवडून येवू शकला नाही.... तो राज्य कसे जिंकून देणार होता? कॅप्टनला बदलण्याचा िनर्णय कोणाचा? मला तर असे वाटते की, िसद्धूला काँग्रेसमध्ये पाठवण्याची भाजपाचीच योजना होती. त्यातून काँग्रेसचे नुकसान झाले. कॅप्टन अमरेंद्रसारखा एक चांगला मुख्यमंत्री कारण नसताना विरोधात गेला. एक राज्य हातातून गेले. भाजपाला त्या राज्यात सत्ता िमळणार नव्हतीच... पण, ‘आप’ मध्येच घुसला आिण सत्ता िमळवून बसला. ज्या पंजाबच्या शेतकरी आदाेलनात केंद्र सरकारने रस्त्यावर िखळे ठोकलेले पत्रे अंथरले होते, त्या राज्यात भाजपा साफ होणार हे सांगायला जोितषी नको होता. तसेच झाले. पण काँग्रेसने आपल्या चुकीच्या निर्णयामुळे सत्ता गमावली. गोव्यातही तेच झाले. रमाकांत खलपसारख्या जेष्ठ नेत्याला डावलले गेले. तिकीटही िदले नाही. काँग्रेसच्या पराभवाच्या विश्लेषणात श्रेष्ठींनी पहिल्या आपल्या चुका कबूल करून मग इतरांना दोष द्यावा. देशात एकूणच काँग्रेसची परिस्थिती अवघड आहे. उत्तर प्रदेशमध्ये अिखलेश यादवने चांगली झुंज दिली. तिथे त्याला ितघांशी लढायचे होते. मुख्य शत्रू भाजप... आिण त्या भाजपाला आतून सामील झालेले मायावती, बसपा... आिण ओवेसी... प्रत्यक्षात दाखवायला ते भाजपाचे विरोधक म्हणून दिसत होते. पण आतून ते सामील होते. आिण हे सामील होणे भाजपा नेत्यांनी ‘अर्थ’पूर्ण चर्चेने बरोबर जमवून घेतले होते. मायावतींना त्यामुळे ईडी... बीडी... सीडी... काडी... या कशाची भीती नव्हती. असे फितूर झालेले लोक भाजपाला मदतच करतात. तरीसुद्धा विजयाचा जल्लोष करणाऱ्या भाजपाने २०१७ च्या िनवडणुकीत ३१२ जागा मिळवल्या होत्या. जागांपैकी ५७ जागा गमावलेल्या आहेत, याची चर्चाच झाली नाही. अिखलेश यादव आिण सपाने त्यावेळी फक्त ४७ जागा िमळवल्या होत्या. आता ते १११ वर पोहोचले. कार्यकर्ते एकहाती लढले. एक मुख्य शत्रू भजपा, दोन िफतूर आिण प्रचंड पैसा... अशी ही लढाई होती. यात १११ पर्यंत अिखलेशने जागा िजंकल्या... विजय िमळाल्याबद्दल भाजपाने जल्लोष केला हे खरे.... देशातील सगळे प्रश्न ५०-१०० वर्षे मागे गेले असताना मतदार भाजपाला मते टाकतात... लोकांचा तो कौल स्वीकारायलाच हवा. आता काँग्रेस नेमके काय करणार?
सोिनया गांधी यांच्याकडे पुन्हा एकदा अध्यक्षपद िदले... २००९ च्या सोिनया गांधी, ज्यांनी ६५ हजार िकलोमीटर प्रवास करून प्रचारसभा गाजवल्या होत्या. राज्य मिळवून िदले होते... त्यांच्या आजारामुळे त्या आता थकलेल्या आहेत. तीन-तीन कौटुंबिक आघात पचवून, डोक्यावर पदर घेवून त्या भारतीय संस्कृतिच्या प्रतिनिधी म्हणून उभ्या आहेत... पण आजाराने थकल्या आहेत. गुजरातच्या िवधानसभा निवडणुकीत राहुल गांधींनी जी चमक दाखवली होती, ती आता त्यांच्याकडे राहिली नाही. जे कोणी २३ लोक ‘अध्यक्ष बदला’ म्हणून सांगतात, त्यातील कोणालाही काँग्रेसचे अध्यक्ष केले तरी परिस्थिती सुधारणे शक्य नाही. कारण यातील एकही जण लोकांमधला नेता नाही. मला तर एक िचत्र असे िदसते अाहे की, काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत बसलेले गुलामनबी आझाद २५ जुलै २०२२ च्या राष्ट्रपती पदाच्या िनवडणुकीत भाजपाचे उमेदवारही होवू शकतील आिण तसे झाले तर फार मोठा धक्का बसेल, असे अिजबात नाही. भाजपाचे नेते त्यांच्याशी संपर्कात आहेत.
काँग्रेस आज कुठे कमी पडते आहे? याचे िचंतन होत नाही. िशवाय भाजपा विरोधात जेव्हा सर्व विरोधी पक्षांनी एक होण्याची चर्चा होते, तेव्हा काँग्रेसला वगळून एक व्हावे, असा विचार मांडणारे बंगालपासून ते तेलंगणापर्यंत आहेत. आिण महाराष्ट्रातही सत्तेत बसलेले त्यांचे भाऊबंद अाहेत. काँग्रेस आज जवळपास कुठेच सत्तेत नाही. पण ‘काँग्रेस पक्ष संपला’, असा त्याचा जो अर्थ काढला जातोय, तोच अर्थ देशाचा घात करेल... काँग्रेस हा पक्ष नाही. एवढ्या प्रचंड देशाला-सर्व जाती-धर्मांना एकत्र ठेवून देश चालवण्याचा विचार म्हणजे काँग्रेस आहे. या मूळ विचारधारेपासून काँग्रेस पक्ष दूर गेला, की काँग्रेसचे नेते दूर गेले, याचे िचंतन होतच नाही. सत्तेसाठी जे धडपड करतात ते लोकांमध्ये दिसत नाहीत. काँग्रेसला वगळून जेव्हा भाजपाच्या विरोधात आघाडीची चर्चा होते, तेव्हा ती आघाडी अिधक दुबळी होते. भाजपाला तेच हवे आहे. मतांची िवभागणी हीच भाजपाची मुख्य शक्ती आहे. उत्तर प्रदेशात ५७ जागा गमावल्यावर, भाजपा सत्तेवर आला, त्याचे मुख्य कारण मायावती आिण ओवेसी यांच्यात झाल्ोली विभागणी... महाराष्ट्रातही तेच करण्याचा प्रयत्न होईल.
बाकी देशाचे काय होईल ते होईल... महाराष्ट्रातील आघाडीत काँग्रेस दुय्यम स्थानी आहे.... काँग्रेसचे मंत्री सत्तेच्या वळचणीला उभे आहेत, असे आजचे िचत्र आहे. सेना आिण राष्ट्रवादी यांच्या हातात सगळे लगाम आहेत. त्यातही राष्ट्रवादी अधिक प्रभावी आहे. काँग्रेसचे मंत्री- एक -दोन अपवाद सोडले तर- असून नसल्यासारखे आहेत. िशवाय ते त्यांच्या मतदारसंघापुरते आहेत. महाराष्ट्रात काँग्रेसला उभी करण्याकरिता त्यांचे मंत्रीपद अिजबात कामाला येणार नाही. अशी काँग्रेसच्या ७० टक्के मंत्र्यांची स्थिती आहे. मतदारसंघाच्या बाहेर ते नाहीतच. आज विलासराव असते तर गोष्ट वेगळी होती. त्याचे नेतृत्त्व महाराष्ट्राने स्वीकारले होते. आज तसा नेता कोण? राष्ट्रवादीजवळ शरद पवार यांच्यासारखा देशव्यापी तगडा नेता आहे. या स्थितीत २०२४ च्या निवडणुकीत आघाडीत राहिलेल्या काँग्रेसच्या वाट्याला िकती जागा येतील? आज सत्तेत असलेल्या सेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तिघांची आघाडी ठामपणे होईल आिण तिघांना समान जागा िमळतील, अशी हमी कोण देणार आहे? सरकारात सामील होताना काँग्रेसने तशी हमी घेतली आहे का? मला तर शंका अशी वाटते आहे की.... आज सरकारला बहुमतासाठी काँग्रेसची गरज असल्यामुळे प्रत्येक जाहिरातीत बाळासाहेब थोरात यांचे नाव सरकारच्या गरजेपोटी येत आहे. काँग्रेसच्या प्रेमापोटी नाही. उद्या असेही होण्याची िभती आहे की, होणारी आघाडी शिवसेना आिण राष्ट्रवादी यांचीच होईल. हे काल्पनिक भय नाही. सरकार ज्या पद्धतीने चाललेले आहे त्याच्या खाणाखुणा त्याच पद्धतीने िदसत आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आिण त्या प्रदेश काँग्रेसची २५० जणांची कार्यकरिणीची ‘जत्रा’ याचा विचार करण्या इतपततरी गंभीर अाहे का? अशी कोणत्या पक्षाची कार्यकारिणी असते? त्यातील िकती सदस्यांना काँग्रेसचे विचार मािहती आहेत? राज्यसभा आिण िवधान परिषदेचे काँग्रेसचे जे आमदार आहेत, ते पक्षासाठी महाराष्ट्रभर एकदा तरी िफरले आहेत का? िकती मेळाव्यांना त्यांनी हजेरी लावली? त्यांच्या सहभागामुळे कार्यकर्ता पेटून उठला, असा एकतरी आमदार-खासदार सांगा? याचे अॅािडट होणार की नाही? काँग्रेसचे जे मंत्री सरकारात आहेत, त्यांनी काँग्रेस पक्षासाठी, महाराष्ट्राचा प्रत्येक जिल्हा घुसळून काढला, प्रत्येक िजल्ह्याचा दौरा केला- फक्त पक्षाच्या कार्यक्रमासाठी केला- प्रत्येक िजल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांचे मेळावे झाले का? त्याला िकती मंत्री हजर राहीले? राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी आठवड्यातील एक वार जनता दरबारासाठी राखून ठेवला आहे. राज्याच्या सरकारात बसलेल्या काँग्रेसच्या िकती मंत्र्यांनी िजल्हावार मेळावे केले? प्रदेश काँग्रेसने या मेळाव्यांचे आयोजन केले? िकती कार्यकर्त्यंाना मंत्री नावाने ओळखतात? िजल्हा काँग्रेस अध्यक्षांचे फोन तरी मंत्री घेतात का? िजल्ह्यात दौऱ्यावर गेल्यावर मंत्री आधी सर्किट हाउसला जातात, की िजल्हाध्यक्षांच्या घरी जातात...?
काँग्रेसला आज यश िमळाले नसले तरी, काँग्रेसचा विचार, काँग्रेसचा कार्यकर्ता, काँग्रेसचा झेंडा आिण काँग्रेसचा मतदार गावागावात आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचणारा नेता नाही. काँग्रेसची मुख्य अडचण तीच आहे. पद िमळाले की, मंत्री खूष आहेत. पक्षासाठी झोकून देवून काम करणारे िकती आहेत? मागचा संदर्भ सांगायचा तर १९६७ साली वसंतदादांनी मंत्रीपद घेतले नाही... काँग्रेसचे अध्यक्षपद घेतले... आिण देशातील ९ राज्यांत काँग्रेसची सरकारे पराभूत झाली असताना महाराष्ट्रात काँग्रेसचे २०२ आमदार िनवडून आले. आज आमच्या नना पटोलेंनी विधानसभेचे अध्यक्षपद सोडून िदले. पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारले. नानाकडून खूप अपेक्षा होत्या... पण काहीतरी चुकते आहे. काही चुकीचे लाेक त्यांना घेरून बसले आहेत. त्यांची काही निवेदने चुकत आहेत. पण, सांगणार कोण? ऐकणार कोण? सरकारातले काँग्रेस मंत्री तरी खूष आहेत का? मुख्यमंत्र्यांपर्यंत त्यांना पोहोचता येत आहे का? राज्यमंत्र्यांची काय िस्थती आहे....? काँग्रेसच्या मंत्र्याला कोणत्या वृत्तपत्रात पहिल्या पानावर जागा मिळते? गोष्टी बारीक बारीक आहेत... पण महत्त्वाच्या आहेत. गरज आहे म्हणून काँग्रेसला सत्तेत वाटेकरी केले आहे... अशा स्थितीत आज महाराष्ट्रातील काँग्रेस आहे. माझे तर स्पष्ट मत आहे, अशा सत्तेचे कुंकू लावण्यापेक्षा काँग्रेस पक्षाने आघाडी सरकारला बाहेरून पािठंबा द्यावा... सरकार पडू देवू नये.... पण त्यात सामीलही होवू नये... रस्त्यावर उतरावे... लोकांच्या प्रश्नांवर लढावे... लोकांचे ढीगभर प्रश्न पडले आहेत... त्या प्रश्नांना वृत्तपत्रांत जागा नाही... त्या प्रश्नांना नेता नाही... त्यासाठी मोर्चा नाही... आवाज नाही... आरोप-प्रत्यारोपांनी वृत्तपत्रांची पाने भरलेली आहेत.... विधानसभेतील सगळी चर्चा आरोप-प्रत्यारोप, पेनड्राईव्ह यावर खर्च होते आहे. सामान्य माणसांच्या प्रश्नांची चर्चा आहे का? त्यासाठी सभागृहात कोणी आवाज उठवतोय, असे दिसते का? महाराष्ट्र असा कधीही नव्हता... वैचारिकदृष्ट्या महाराष्ट्राचा कडेलोट झालेला आहे आिण या महाराष्ट्राला सावरू शकेल, असा नेता काँग्रेसमधे कोण आहे? सत्ता हवी, सत्तेकरिता राजकारण असते... हे सगळे मान्य केल्यावर महाराष्ट्रातील काँग्रेसवर आज जी वेळ आलेली आहे, ती बघताना या राज्यातील काँग्रेस अशी कधीच नव्हती. सत्तेत राहून वळचणीला उभे राहण्याची वेळ येते तेव्हा, िनर्णय करावा लागतो... तो िनर्णय करण्याची वेळ अालेली अाहे... हातात िदवस कमी आहेत... महाराष्ट्राला मान्य होईल, असा नेता काँग्रेसजवळ आज नाही... त्यामुळे परिस्थिती बिकट आहे. या स्थितीत सामान्य कार्यकर्त्यांच्या खांद्यावर हात टाकून, त्याला विश्वास देणारे जे कोणी नेते असतील, त्यांनी सत्तेची पर्वा न करता, रस्त्यावर उतरावे... लोकशाहीच्या मार्गाने लाेकांचे प्रश्न लढवावेत... बाळासाहेबांनी यात पुढाकार घ्यावा... िनतीन राऊत यांना सोबत घ्यावे. काँग्रेसच्या मागे लोक येतात की नाही ते पहा... आजचे महाराष्ट्रातील िचत्र नेमके उलटे आहे... काँग्रेस दुय्यम भूिमकेत जावून सत्तेच्या मागे लागली आहे. काँग्रेसच्या मागे बाकी पक्ष येत आहेत, असे िचत्र नाही... आघाडीची चर्चा करताना नव्याने पुढारी झालेले आिण स्वत:ला नेते समजणारे सरळ सांगतात..., ‘काँग्रेसला आघाडीत घेवू’ जणू मेहरबानीच करत आहेत. आघाडी काँग्रेससकट नव्हे.... काँग्रेसने आघाडी केली पाहिजे... मुख्य भूिमका काँग्रेसची असली पाहिजे. आज तसे िदसत नाही. एक शरद पवारसाहेब सोडले, जे ठामपणे सांगताहेत, काँग्रेस बरोबरच आघाडी होईल. पण बाकी सत्तेतील पक्ष आज काँग्रेसची गरज आहे म्हणूनच काँग्रेसला जवळ करत आहेत.
एक ठाम विश्वास आहे की, सत्तेचा विचार करा िकंवा न करा... जसा महात्त्मा गांधीिशवाय या देशात दुसरा मोठा नेता नाही... त्याचप्रमाणे काँग्रेसच्या मुलभूत विचारांिशवाय देश उभा राहू शकत नाही. कसेही गणित मांडले तरी, सर्व जाती-धर्मांना बरोबर घेवूनच हा देश मोठा होईल. संिवधान मान्य असणाऱ्यांनाच देश मोठा करता येईल... आज संिवधानावरच संकट आहे. आणीबाणीला विरोध करणारे जे होते, ते वेगळ्या मार्गाने संविधानाऐवजी एका वेगळ्या राष्ट्राचा विचार करत आहेत. जो विचार घातक ठरेल... काँग्रेसला त्याविरुद्ध आवाज उठवावा लागेल... सत्तेच्या वळचणीला उभे राहून हा आवाज उठवता येणार नाही. म्हणून निर्णायक भूमिका घ्यावी लागेल.
काहींची मागणी अशी आहे की, गांधी घराण्याच्या बाहेर अन्य केणाला अध्यक्ष करा... ही मागणी यापूर्वीही होती. जो २३ जणांचा गट म्हणून म्हटला जातो... त्या गटातील सगळे, जेव्हा काँग्रेसला यश िमळत होते.... सत्ता मिळत होती. तेव्हा इंिदरा, राजीव, सोिनया यांच्यावर फुले उधळत होते आिण स्वत:ला सत्ता कशी िमळेल, हे पाहात होते. आता जेव्हा सत्ता िमळत नाही तेव्हा २३ जण एक झाले. यातला एकही जण देशातील काँग्रेस पक्ष सांभाळू शकणार नाही. या २३ मधील गुलामनबी आझाद असे आहेत की, कदािचत २५ जुलै २०२४ च्या राष्ट्रपती निवडणुकीचे ते भाजपाचे उमेदवारही असू शकतील. इतके त्यांचे भाजपाशी मैत्र जमलेले आहे. हे काल्पनिक नाही. त्यांचे भले झाले तर फारच चांगले आहे. त्याच्याबद्दल आनंदच आहे. भाजपाला सगळीकडे उसनवारीच करावी लागत आहे. प्रश्न वेगळा आहे. दोन संदर्भ असे आहेत की, जेव्हा गांधी घराण्याच्या बाहेरचा नेता काँग्रेसचा अध्यक्ष होता... त्यात िसताराम केसरी होते. ते म्हणजे दुसरे सिद्धू. विदूषकच. दुसरे १९९१ चे आदरणीय पंतप्रधान नरसिंहराव साहेब... हा माणूस फार मोठा.. पंतप्रधान म्हणून कठीण काळात त्यांनी देश आिण राज्य चांगले चालवले.. मनमोहनसिंग हा िहरा त्यांनी शोधून काढला. पण त्यांना पक्ष सांभाळता आला नाही. आता सोिनया नकोत, राहूल नकोत, तर काँग्रेस पक्ष सांभाळेल, देश सांभाळेल, असा नेता कोण? आज तरी एकही नाव समोर नाही... त्यामुळे आजचा काँग्रेसमधला मुख्य प्रश्न पर्यायी नेतृत्त्वाचा आहे. इंिदरा गांधींना ‘गंुगी गुडीयाँ’ म्हटले होते... पण त्यांनाच खुद्द वाजपेयींनी ‘रणचंडिका, दुर्गा’ म्हटले. आज तसे नाव कोणते आहे? या िस्थतीत प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बदलून फार फरक पडेल, अशी िस्थती नाही. महाराष्ट्रात तर नेतृत्त्वाची वानवाच आहे. सत्तेत राहून काँग्रेस महाराष्ट्रात पुन्हा उभी राहील, याची शक्यता त अिजबात नाही. सध्याचे िचत्र तर असेच आहे. उद्याचे काय होईल, सांगता येत नाही. सध्या एवढेच.... !
- मधुकर भावे
Patrakar sahebh manapasun tumche abhar barabar bolalat parantu rajkaran anhi patrakar yanchyat asmancha fharak ahe aj tumhijo alekh dilela ahe to tumhi patrakar ahe kontahi paksh aso tyabadal bolayla tumhalach sandhi ahe kongreshla bolala gharane shyahi chalat nahi pratekala sandhi pahije aplya Chatrapati Shivaji Maharaj yanchya mahastramadhye asa paksha dakhva ki gharane shyahi sodun samajik karykartyala samhaun ghyetlaly
ReplyDelete