1मार्च ला माझा वाढदिवस

*सर्वांचे मन:पूर्वक भार*
१ मार्च…
हा दिवस माझ्यासाठी नेहमीच इतर दिवसांसारखाच साधा असायचा. आयुष्याच्या ४७ वर्षांच्या प्रवासात स्वतःचा वाढदिवस साजरा करण्याचा योग कधी आला नाही. जीवनाच्या धावपळीत स्वतःसाठी वेळ काढणं, स्वतःचा दिवस जपणं तर दूरच — वाढदिवस कधी येतो आणि कधी निघून जातो, हेही अनेकदा कळलं नाही.
*पण यंदाचा १ मार्च वेगळा ठरला*…
सकाळी नेहमीप्रमाणे कामात व्यस्त असताना सर्वप्रथम माझ्या चिरंजीव आदित्यने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्या क्षणी मन अक्षरशः भरून आलं. यावर्षी कोणालाही काही सांगायचं नाही, हा दिवस शांततेत श्री स्वामी समर्थ मठ येथे घालवायचा, स्वामींच्या चरणी अर्पण करायचा असा निश्चय केला होता. मात्र बहिणीच्या सासूबाईंच्या रक्षा विसर्जन कार्यक्रमामुळे पूर्ण दिवस तिथे राहता आलं नाही; तरीही स्वामींचं दर्शन घडून दिवस धन्य झाला.
*आणि मग स्वामींची कृपा अनुभवायला मिळाली*…
दिवसभर शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव होत राहिला. भावांनी, भावजयींनी प्रेमाने दिलेल्या शुभेच्छा, आईचे आशीर्वाद — आईच्या आशीर्वादासारखं मोठं वरदान या जगात दुसरं कोणतं? मित्र, वरिष्ठ, पैलवान, पत्रकार, संपादक यांनी फोन, संदेश, लेख आणि कॉलममधून व्यक्त केलेलं प्रेम माझ्यासाठी अमूल्य ठरलं.
आयुष्यात कदाचित पैसा फारसा कमावला नसेल; पण पैशांपेक्षा कितीतरी मौल्यवान अशी माणसं कमावता आली — आणि ती टिकवण्याची शक्ती स्वामी समर्थांनी दिली, यासाठी मी त्यांच्या चरणी सदैव कृतज्ञ आहे.
*यंदा प्रकर्षाने जाणवलं* — वाढदिवस हा केवळ दिनदर्शिकेतील एक दिवस नसतो; तो नाती अधिक घट्ट करणारा, मनं जवळ आणणारा एक सुंदर सोहळा असतो.
माझ्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य मित्रांनी कॉलम लिहून, बॅनर लावून, प्रत्यक्ष भेटून जे आपुलकीचं दर्शन घडवलं, ते शब्दांत मावणार नाही. 
आमदार *सत्यजित देशमुख* साहेबांनी पत्र पाठवून शुभेच्छा दिल्या. माजी सभापती, तालुका पंचायत सदस्य *सम्राटसिंग नाईक* भैय्यांनी स्वतः फोन करून आशीर्वाद दिले. माजी मंत्री *शिवाजीराव नाईक* साहेबांनीही शुभेच्छा दिल्या. युवा नेते कृष्णा नलवडे, विकास शिरसाट, रोहित भाऊ आणि इतर मित्रांनी केक आणून वाढदिवस साजरा केला. 
हॉटेल साई निसर्ग चे मालक अर्जुन सावंत, स्नेहा सावंत, आमच्या हॉटेलचा संपूर्ण स्टाफ, मोरेवाडीचे सरपंच अशोक डीगे तसेच असंख्य मित्रपरिवार यांनी दिलेल्या शुभेच्छांनी मन कृतज्ञतेने भरून आलं. माझे गुरुवर्य *शिवाजी रसाळ* सर आणि *कृष्णात पडवळ* मामा यांनी दिलेले शुभाशीर्वाद हे माझ्यासाठी अमूल्य ठेवा आहेत. त्याचबरोबर कुस्ती हेच जीवन टीमने दिलेल्या शुभेच्छा मन प्रसन्न करणाऱ्या होत्या.
*परंतु एक गोष्ट मनाला सर्वाधिक स्पर्शून गेली*…
माझ्या दोन्ही भावांनी दिलेला जिव्हाळा, हृदयाशी जोडलेलं नातं, त्यांनी दिलेला मान आणि वडिलांसारखा सन्मान — त्या क्षणी आयुष्यातील सर्व सुखांचा अनुभव मला मिळाला.
आपण सर्वांनी दिलेल्या लाखमोलाच्या शुभेच्छा, प्रेम आणि आशीर्वादामुळे मी खरोखर भारावून गेलो आहे. हे प्रेम, हा विश्वास आणि ही साथ अशीच अखंड राहो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.
पुन्हा एकदा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद आणि आभार!
आपला,
*मनोज मस्के – मांगरूळ* 🙏

Comments

Popular posts from this blog

शिरशी गावच्या लोकनियुक्त पहिल्या सरपंच – सौ. स्मिताताई बापूराव भोसले

*शिराळा उत्तरच्या मातीत दोन दिवसांपूर्वी जे घडलं, ते फक्त निवडणूक नव्हतं*… *तो विश्वासाचा, नात्याचा आणि घराण्याच्या संस्कारांचा विजय होता*.

*सोंडोलीमध्ये रंगणार दोन महाराष्ट्र केसरींची तुफानी दंगल देवा थापा स्पर्धेचे खास आकर्षण*