*शिराळा उत्तरच्या मातीत दोन दिवसांपूर्वी जे घडलं, ते फक्त निवडणूक नव्हतं*… *तो विश्वासाचा, नात्याचा आणि घराण्याच्या संस्कारांचा विजय होता*.

*शिराळा उत्तरच्या मातीत दोन दिवसांपूर्वी जे घडलं, ते फक्त निवडणूक नव्हतं*… *तो विश्वासाचा, नात्याचा आणि घराण्याच्या संस्कारांचा विजय होता*.
*मनोजकुमार मस्के, मांगरूळ*

शिराळा उत्तर भागातून माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या थोरल्या सुनबाई राजेश्वरी रणधीर नाईक या प्रचंड मतांनी जिल्हा परिषदेत निवडून आल्या आणि गावोगावी एकच चर्चा रंगली – “साहेबांची सून आली, आणि मन जिंकून गेली!”
घरात राजकारणाचा गाडा अभ्यास… पण पाय मात्र मातीत घट्ट रोवलेले. रणधीर नाईक यांचा अभ्यासू स्वभाव आणि सासरे साहेबांचा दीर्घ अनुभव – या दोन्हींची शिदोरी घेऊन राजेश्वरीताई मैदानात उतरल्या. महिला आरक्षण पडलं आणि पहिल्यांदाच त्या जिल्हा परिषद उत्तर विभागातून उभ्या राहिल्या. पण खरं सांगायचं तर, त्या उभ्या राहिल्या त्या फक्त निवडणुकीला नाही… तर लोकांच्या आशांना, अपेक्षांना आणि विश्वासाला.
पहिल्यांदाच निवडणूक लढवणं म्हणजे साधी गोष्ट नाही गं बाई… गावोगावी फिरायचं, दारोदार जायचं, प्रत्येकाचं ऐकून घ्यायचं. पण ताईंनी मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला. कुणाच्या शेतात उभं राहून गप्पा मारल्या, कुणाच्या ओसरीवर बसून चहा घेतला, तर कुणाच्या डोळ्यातलं पाणी शांतपणे ऐकत पुसलं.
त्यांच्या बोलण्यात मोठेपणा नव्हता… आपलेपणा होता.
त्यांच्या शब्दात राजकारण नव्हतं… समाजकारणाची ऊब होती.
“साहेबांची सून आहे” म्हणून लोकांनी मत दिलं नाही…
“ही आपलीच मुलगी आहे” म्हणून मत दिलं.
गावातल्या अनेक महिलांना आजवर निवडणूक म्हणजे भीती वाटायची. “आपल्याकडचं काम नाही” असं म्हणत त्या मागे राहायच्या. पण राजेश्वरीताईंना पाहून अनेकांच्या मनात धाडस आलं.
“ती करू शकते तर आपण का नाही?” असा सवाल मनात उठला.
हीच तर खरी कमाई आहे!
नाईक घराण्याचा वारसा राजकारणाचा असला तरी पाया समाजकारणाचाच आहे. गरजूंना मदत, विकासकामांचा पाठपुरावा, लोकांच्या अडचणीत धावून जाणं – हे रक्तातच आहे. त्या घरातल्या संस्कारांच्या सावलीत राजेश्वरीताई आपले राजकारणाचे धडे गिरवत आहेत. सासरे साहेबांचं मार्गदर्शन, पतीचं खंबीर साथ आणि स्वतःचा अभ्यासू दृष्टिकोन – या तिन्ही गोष्टींनी त्यांना बळ दिलं.
आज त्या जिल्हा परिषद प्रचंड मतांनी जिंकल्या, हे नक्कीच मोठं यश आहे. पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी लोकांची मनं जिंकली.
मतं तर पाच वर्षांनी बदलू शकतात…
पण मनात बसलेलं नाव कायम राहतं.
उद्या काळाने जर आमदारकीची हाक दिली, तर त्या सुद्धा सहज उभ्या राहतील – असा विश्वास आज लोकांच्या मनात निर्माण झालाय. कारण त्या खुर्चीसाठी नाही, तर कामासाठी पुढे आल्या आहेत.
त्यांना सत्तेची चमक नको… तर विकासाचा उजेड हवा आहे.
शिराळा उत्तरची माती आज अभिमानाने सांगते –
“आपली मुलगी जिंकली!”
आणि खऱ्या अर्थाने, हा विजय आहे विश्वासाचा…
हा विजय आहे संस्कारांचा…
आणि हा विजय आहे त्या साध्या, शांत पण ठाम स्त्रीशक्तीचा!

Comments

Popular posts from this blog

अभ्यास करून पोराला IAS, IPS बनवायचं अन् कराड-खोक्याभाई त्याची नियुक्ती करणार?, मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र व्हायरल

शिरशी गावच्या लोकनियुक्त पहिल्या सरपंच – सौ. स्मिताताई बापूराव भोसले