*मुंबईत रंगणार ३२ वी अखिल भारतीय महापौर केसरी कुस्ती स्पर्धा*

*मुंबईत रंगणार ३२ वी अखिल भारतीय महापौर केसरी कुस्ती स्पर्धा*

*मनोजकुमार मस्के, मांगरुळ*
बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई शहर तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ३२ वी अखिल भारतीय मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२६ चे आयोजन करण्यात आले असून, देशभरातील नामांकित मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ही प्रतिष्ठेची स्पर्धा १४ व १५ मे २०२६ रोजी भारतीय क्रीडा मंदिर, नारायण क्रॉस रोड, वडाळा, मुंबई येथे रंगणार आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमुळे मुंबईतील कुस्तीप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्पर्धेमध्ये विविध वजन गटांमध्ये सामने होणार असून विजेत्या मल्लांना आकर्षक रोख बक्षिसे, चषक व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहेत.
महापौर केसरी गटात ८२ किलोपेक्षा अधिक वजन गटासाठी प्रथम क्रमांकाला तब्बल १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. तसेच द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांकासाठी अनुक्रमे ५१ हजार, ३२ हजार आणि २२ हजार रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. ५० ते ६० किलो वयोगटातील (१७ वर्षांखालील) मल्लांसाठीही स्वतंत्र गट ठेवण्यात आला असून त्यात प्रथम क्रमांकासाठी २५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
याशिवाय कोकण विभागातील (मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, कल्याण, पालघर, रायगड) कुस्तीगीरांसाठी विशेष गट राखीव ठेवण्यात आले आहेत. ५५ ते ६२ किलो, ६२ ते ७२ किलो आणि ७२ ते ८२ किलो अशा विविध वजन गटांमध्ये स्पर्धा होणार असून विजेत्यांना रोख पारितोषिकांसह चषक व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
स्पर्धेचा उद्घाटन सोहळा १४ मे रोजी सायंकाळी ६ वाजता होणार असून त्यानंतर कुस्ती सामने रंगणार आहेत. १५ मे रोजी सकाळपासून अंतिम सामने व बक्षीस वितरण समारंभ पार पडणार आहे.
स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे नियम लागू राहणार असून सहभागी स्पर्धकांनी आधारकार्डाची मूळ प्रत व चार फोटो सोबत आणणे बंधनकारक करण्यात आले आहे. १७ वर्षांखालील कुमार गटातील स्पर्धकांसाठी वयोमर्यादा ३१ मे २०२६ पर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
स्पर्धकांच्या निवास व भोजनाची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. अधिक माहितीसाठी मुंबई शहर तालीम संघाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

शिरशी गावच्या लोकनियुक्त पहिल्या सरपंच – सौ. स्मिताताई बापूराव भोसले

*शिराळा उत्तरच्या मातीत दोन दिवसांपूर्वी जे घडलं, ते फक्त निवडणूक नव्हतं*… *तो विश्वासाचा, नात्याचा आणि घराण्याच्या संस्कारांचा विजय होता*.

*सोंडोलीमध्ये रंगणार दोन महाराष्ट्र केसरींची तुफानी दंगल देवा थापा स्पर्धेचे खास आकर्षण*