सम्राटसिंग नाईक भैया

शिराळा तालुक्याच्या राजकारणात आपली वेगळी छाप उमटवणारे, मैत्री आणि माणुसकी जपणारे नेतृत्व म्हणजे सम्राटसिंग नाईक भैय्या. आज पुन्हा एकदा शिराळा पंचायत समितीच्या सभापतीपदी त्यांची निवड झाली आणि तालुक्यातील कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि नागरिकांमध्ये आनंदाची लाट पसरली.
गेल्या तब्बल पंधरा वर्षांपासून सभापती, उपसभापती अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पंचायत समितीत आपली मजबूत पकड निर्माण केली आहे. राजकारणात एवढी वर्षे टिकून राहणे सोपे नसते, पण सम्राटसिंग नाईक भैय्यांनी ते आपल्या कामाच्या जोरावर सिद्ध करून दाखवले आहे.
भैय्यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांची मैत्री. एकदा माणूस त्यांच्या नजरेत बसला की तो कायमचा भैय्यांचा मित्रच होतो. म्हणूनच शिराळा तालुक्यातील प्रत्येक गावात त्यांचे असंख्य मित्र आहेत. विशेष म्हणजे इतक्या लोकांमध्येही प्रत्येकाला नावाने हाक मारणारा हा नेता लोकांच्या मनात घर करून बसला आहे.
राजकारणात मोठेपणा, दिखावा किंवा अहंकार न ठेवता साधेपणाने वागणारा नेता म्हणून भैय्यांची ओळख आहे. गावात एखादा वृद्ध माणूस भेटला की खाली वाकून नमस्कार करणारा, तरुणांशी खांद्याला खांदा लावून उभा राहणारा आणि सर्वसामान्य माणसाचे प्रश्न मनापासून ऐकणारा असा त्यांचा स्वभाव आहे.
सम्राटसिंग नाईक यांची अजून एक खास गोष्ट म्हणजे ते शिराळा तालुक्यातील कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवली तरी प्रचंड मतांनी निवडून येतात. यामागे कारण एकच — त्यांची काम करण्याची वेगळी पद्धत. एखाद्या व्यक्तीने काम सांगितले तर “करतो, बघतो” अशी उगीच आश्वासने देणारा नेता ते नाहीत. काम होणार असेल तर ठामपणे “होईल” म्हणणारा, आणि अवघड असेल तर स्पष्टपणे “प्रयत्न करूया” असे सांगणारा प्रामाणिक स्वभाव त्यांचा आहे.
याच स्पष्टवक्तेपणामुळे आणि मनमिळावू स्वभावामुळे ते युवकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. अनेक वेळा वेगवेगळ्या मतदारसंघातून प्रचंड मतांनी निवडून येत त्यांनी आपली लोकप्रियता सिद्ध केली आहे.
आज पुन्हा एकदा शिराळा तालुक्याची मानाची समजली जाणारी पंचायत समिती सभापती म्हणून काम करण्याची संधी सम्राटसिंग नाईक भैय्यांना मिळाली आहे. हा सन्मान त्यांच्या कामाचा, त्यांच्या मैत्रीचा आणि त्यांनी जपलेल्या माणुसकीचा आहे.
अशा या माणुसकी जपणाऱ्या, मित्रांना जीव लावणाऱ्या आणि गावोगावी आपुलकीची नाती निर्माण करणाऱ्या सम्राटसिंग नाईक भैय्यांचा पुढचा राजकीय प्रवास नक्कीच मोठा असेल, याबद्दल शिराळा तालुक्यातील जनतेला पूर्ण विश्वास आहे.

*मनोजकुमार मस्के, मांगरूळ* 

Comments

Popular posts from this blog

शिरशी गावच्या लोकनियुक्त पहिल्या सरपंच – सौ. स्मिताताई बापूराव भोसले

*शिराळा उत्तरच्या मातीत दोन दिवसांपूर्वी जे घडलं, ते फक्त निवडणूक नव्हतं*… *तो विश्वासाचा, नात्याचा आणि घराण्याच्या संस्कारांचा विजय होता*.

*सोंडोलीमध्ये रंगणार दोन महाराष्ट्र केसरींची तुफानी दंगल देवा थापा स्पर्धेचे खास आकर्षण*