पी.बी. खांडेकर ( आण्णा ) विचारमंच हॉलचे उद्घाटन कवी संमेलनाने पार पडले...

.पी.बी. खांडेकर ( आण्णा ) विचारमंच हॉलचे उद्घाटन कवी संमेलनाने पार पडले...
मांगरूळ वार्ताहर :
 कसा विसरू मी माझ्या कष्ट करणाऱ्या बापाला... अशा अनेक कविता सादर करण्याचा प्रत्येय आला तो मांगरुळ येथील विवेकानंद माध्यमिक व सैनिकी प्रशिक्षण महाविद्यालय  संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित केलेल्या  कै.पी.बी. खांडेकर ( आण्णा ) विचारमंच हॉलचा उद्घाटन सोहळ्यातील कवी संमेलनात. या महाविद्यालयातील प्राध्यापक व इतर कर्मचारी असे अभिनव उपक्रम राबवून विद्यार्थ्याची साहित्यविषयक अभिरुची घडविण्याचा प्रयत्न करत असतात. याचाच एक भाग संपन्न झालेले पहिले कवी संमेलन हे होय. 
शिराळा वाळवा तालुका परिसरातील मान्यवर कवीच्या उपस्थित हे कवी संमेलन पार पडले. या कवी संमेलनास वरिष्ठ पोलिस अधिकारी - न्यूयॉर्क सिटी अमेरिकेचे युनूस अत्तार यांनी कै.पी.बी. खांडेकर ( आण्णा ) विचारमंच हॉलचे उद्घाटन  केले व कवी संमेलनात आपली बहारदार कविता सादर केली. 

 कवी संमेलनात विक्रम,जाधव,भारती पाटील,महादेव हवालदार, सुनील नायकल,नथुराम कुंभार,संजय नायकवडी,भीमराव कुंभार,विनायक कुलकर्णी,विद्या पाटील, हिम्मतराव पाटील,  दिलीप गिरीगोसावी, विजय शिंदे,तानाजी नांगरे,मेहबूब जमादार,गणेश चोरगे,संकेत इंगळे,शिराळा वाळवा तालुक्यातील ३० हुन अधिक कवींनी आपल्या बहारदार कविता सादर केल्या.
या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी श्री. आनंद हरी सर होते. त्यांनी आपल्या मनोगतात कवीता हि खरोखरच दैवी देण आहे आणि ती कुणाही ऐऱ्यागैऱ्याला साध्य होत नाही. कवितेच्या नावाखाली नुसती शब्दांची जुळवाजुळव करणाऱ्यांना कवी म्हणता येत नाही. कविता हे व्यक्त होण्याचे साधन आहे. तुम्ही व्यक्त होत चला. आपल्या भावना मांडा. आपल्याकडे अनुभवाचा खजिना आहे. तो कवितेतून येऊदे. असेही आवाहन केले.
काव्यसंमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध समाजसेवक बंटी नागरे पाटील उपस्थित होते. मुख्य अधिक्षक आणि गगनगिरी उद्योग समूहाचे संस्थापक अभिजीत खांडेकर तसेच यनआयएस कोच राहुल खांडेकर , युवा नेते निलेश मस्के पाटील  व पत्रकार मनोज मस्के, चंद्रकांत पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. या कवी संमेलनास विविध शाखेचे २०० विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे  सूत्रसंचलन कवयित्री विद्या पाटील व प्राध्यापक प्रदीप जाधव यांनी केले. तर आभार जगदीश पाटील यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य - सुवर्णसिंग मस्के, प्रसिद्ध कवी विक्रम जाधव, गणेश चोरगे, राहुल खांडेकर, देशभक्त करिअर संकुल चे सर्व प्राध्यापक व इतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

फोटो - पी.बी. खांडेकर ( आण्णा ) विचारमंच हॉलचे उद्घाटन करताना युनूस अत्तार (वरिष्ठ पोलीस अधिकारी न्यूयॉर्क अमेरिका) , ज्येष्ठ कवी आनंद हरी, गगनगिरी उद्योग समूहाचे संस्थापक अभिजीत खांडेकर, राहुल खांडेकर, प्राचार्य सुवर्णसिंग मस्के व इतर मान्यवर

Comments

Popular posts from this blog

अभ्यास करून पोराला IAS, IPS बनवायचं अन् कराड-खोक्याभाई त्याची नियुक्ती करणार?, मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र व्हायरल

शिरशी गावच्या लोकनियुक्त पहिल्या सरपंच – सौ. स्मिताताई बापूराव भोसले

*शिराळा उत्तरच्या मातीत दोन दिवसांपूर्वी जे घडलं, ते फक्त निवडणूक नव्हतं*… *तो विश्वासाचा, नात्याचा आणि घराण्याच्या संस्कारांचा विजय होता*.