मा भिमराव पाटील (सरपंच) वाढदिवस विशेष लेख*.....*.........................

*मा भिमराव पाटील (सरपंच) वाढदिवस विशेष लेख*.....
*......................... 
  शाहुवाडी तालुक्यातील सोंडोली गावचे सुपुत्र, संजय गांधी निराधार योजना समितीचे तालुका अध्यक्ष *मा. भिमराव पाटील* यांचा आज वाढदिवस
 ................................. 
✍️लेखन- पै अशोक सावंत -पाटील* 
..........सोंडोली ................
शाहूवाडी तालुक्यातील युवा नेतृत्व म्हणून भीमराव पाटील यांच्याकडे पाहिले जाते अगदी कमी वयातच राजकारणात आपली छाप पाडणारे, आपले अस्तित्व निर्माण करणारे *राजकीय कर्ण म्हणजे भिमराव पाटील होय*....... 
       लहानपणापासूनच भिमराव पाटील यांना शिक्षणाची भारी आवड, पहिले ते दहावी पर्यंत आम्ही एकञच शिक्षण घेतले त्या नंतरचे उच्च शिक्षण त्यांनी कोकरूड येथे घेतले. त्यांच्या बरोबर शिक्षण घेत असताना आम्हाला बरेच अनुभव आले. 
          भिमराव पाटील यांना राजकारणात आणण्याचे खर्या अर्थाने कोणाचे काम असेल तर ते म्हणजे त्यांच्या एकदम जवळचे, जिव्हाळ्याचे सोंडोली गावचे  *दिवंगत नेते कै. मारुती सावंत यांचा*...... त्यांना राजकारणातला किंगमेकर बनवण्यात मारुती सावंत यांचे मोठे योगदान आहे खर्या अर्थाने त्यांना कै.मारुती सावंत यांच्या रूपाने राजकारणातला गुरु मिळाला आणि इथेच त्यांना राजकारणातली खरी दिशा मिळाली.
     आपल्या कार्य कौशल्याच्या जोरावर  अल्पावधीतच लोकप्रिय झाले *आणि गावाने त्यांना २०१० साली उपसरपंच म्हणून निवडून दिले* आणि इथेच खर्या अर्थाने त्यांच्या राजकीय कारकिर्दीस सुरवात झाली आणि त्यानंतर *लगेच २०१५ साली त्यांच्या पत्नी अश्विनी पाटील यांना सरपंच म्हणून निवडून दिले*. आणि आता सलग दुसर्यांदा सुद्धा त्यांच्या पत्नी *सौ अश्विनी भिमराव पाटील या 'सरपंच' म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.* 
भिमराव पाटील हे  मा.आ.सत्यजित पाटील (आबा) यांचे कट्टर समर्थक आहेत. जनतेला केंद्रबिंदू समजुन व सेवा हेच साधन मानुन केलेल्या कामाची पोचपावती म्हणून *मा.सत्यजित आबांनी 'संजय गांधी निराधार योजना समितीचे' शाहुवाडी तालुका अध्यक्ष म्हणून त्यांची निवड केली*. 
आणि योजना समितीची तालुक्याची धुरा त्यांच्या खांद्यावर आहे. खरंच सांगतो मार्च २०२१ साली त्यांची निवड झाली आणि अवघ्या पाच महिन्यात तालुक्यातील १८४ पात्र लाभार्थींना त्यांनी त्याचा लाभ मिळवून दिला*. खरंच खुप चांगले काम त्यांनी केले आहे. स्वतःच्या हातुन जेव्हा एखाद्या गरजवंताचे काम होतं, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं, तोच आपल्या जीवनातील सर्वांत मोठा सन्मान असतो हे भिमराव पाटील यांनी जाणले आहे. 
    राजकारणात एन्ट्री केल्या नंतर त्यांचा एवढा काही मित्र समुह नव्हता, पण आता मित्रांचे लोंढे च्या लोंढे तयार झाले आहेत. कोणीही सामान्य कार्यकर्ता असेल तरीही त्याच्याशी मनमुराद गप्पा मारणे, हे एखाद्या अनुभवी राजकारण्यांना लाजवेल असंच भिमराव पाटील यांचे काम आहे. 
         आपल्या कार्य कर्तृत्वाने फार मोठे नाव करणारे, सामान्य माणसातील असामान्य व्यक्ति मत्व, कधी कुस्ती न खेळलेले पण कुस्ती सारख्या रांगड्या खेळावर वर्षाला लाखो रुपये खर्च करणारे एक दानतदार व्यक्ति मत्व आहे.
         असे म्हणतात ना की खर्या सोन्याची पारख आणि किंमत सोनारच जाणतो, या उक्तीप्रमाणे, *मा आमदार सत्यजित पाटील यांनी या व्यक्तिला २०१६ साली पक्षाकडून शित्तुर वारुण मतदार संघातून पंचायत समितीचे तिकीट दिले.* पण या निवडणुकीत त्यांना अगदी थोडक्या मताने म्हणजे  हाताच्या बोटावर मोजण्या इतपत मताने विजयाने हुलकावणी दिली.राजकारणात विजय-पराजय हा असतोच  आणि पराभवाने खचून न जाता तेवढ्याच जिद्दीने ते पुन्हा कामालाही लागले. 
           नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करुन बघु म्हणत केलेली सुरुवात म्हणजे यशस्वी होण्याचे पहिले पाऊल आहे. आज भिमराव पाटील यांनी राजकारणात यशस्वी पाऊल टाकले आहे, किंबहुना यशस्वी आहेत. 
     स्वताच्या गावच्या यात्रेत एक मोठे कुस्ती मैदान भरवण्यासाठी ते अग्रेसर असतात, गेली दोन वर्षे कोरोणा मुळे कुस्ती मैदान झाले नाही यावर्षी सोंडोली गावचे कुस्ती मैदान भरवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. 
        अशा या बहुगुणी, बहुआयामी व्यक्ति मत्वाचा आज वाढदिवस......मुळातच हा वाढदिवस नसुन भिमराव पाटील यांच्या कार्य कर्तृत्वाचा गौरव सोहळाच आहे. 
        त्यांना *कुस्ती हेच जीवन महासंघाकडुन वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा.
        ••••••••••••••••••••••••••••
धन्यवाद
*पै अशोक सावंत/पाटील* कुस्ती संघटक
*कुस्ती हेच जीवन महासंघ महाराष्ट्र राज्य* 
अध्यक्ष शाहुवाडी तालुका
मो.9702984006

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*