राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सांगलीच्या संकेत सरगर पुरूषांच्या ५५ किलो गटात रौप्य पदक पटकविले
सांगली, : इंग्लंडच्या बर्मिंगहम मध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games 2022 ) भारताला पहिले पदक सांगलीच्या संकेत महादेव सरगर यांनी वेटलिफ्टींगमध्ये पुरूषांच्या ५५ किलो गटात रौप्य पदक पटकवून मिळवून दिले. संकेत सरगर हा सांगली जिल्हा वेटलिफ्टींग संघटनेचा खेळाडू असून त्याने सन 2013-14 पासून गुरूवर्य कै. नाना सिंहासने यांच्या सांगलीतील दिग्वीजय वेटलिफ्टींग इन्स्टिट्युटमध्ये वयाच्या 13 व्या वर्षापासून वेटलिफ्टींगचे धडे घ्यावयास सुरूवात केली. नाना सिंहासने यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाचा पाया भक्कम झाल्यावर संकेतने सन 2017 पासून शिवछत्रपती पुरस्कार विजेते मयुर सिंहासने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील धडे घेतले. त्यांनी संकेतच्या ट्रेनिंगची दिर्घकालीन योजना आखली. ट्रेनिंग, डायट, रेस्ट व इंज्युरी मॅनेंजमेंट याचा योग्य ताळमेळ घालत संकेतचा सराव सुरू होता. त्याने 2018 पासून राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेण्यास सुरूवात केली. ऑफ सिझनमध्ये दिवसातून तीन वेळाही त्याचे ट्रेनिंग असायचे. या मेहनतीमुळे 2019 ते 2020च्या दरम्यान त्याची कामगिरी उंचावली. सं...