शेडगेवाडी पासून जवळच कराड कोकरूड रोडवरच ,आपल्या सेवेसाठी सज्ज आहे आपलं हक्काचं हॉटेल साई निसर्ग .....
शेडगेवाडी पासून जवळच कराड कोकरूड रोडवरच ,
आपल्या सेवेसाठी सज्ज आहे आपलं हक्काचं हॉटेल साई निसर्ग ..... हॉटेलला आज तीन वर्ष पुर्ण झाली.
दि. 11/07/2021 ग्राहकांच्या सेवेसाठी सुरू झाले. साई निसर्ग हाॅटेल या हाॅटेलचे पहिले ग्राहक ठरले नाशिकचे शारंग वाघ त्यांच्या पत्नी साईली वाघ व लोकेश देवडे. खरं पाहता ते शिर्डीहुन रत्नागीरीसाठी चालले होते. पाऊसाची रिमझीम असल्याने चहाचा स्वाद घेण्यासाठी साई निसर्ग हाॅटेलवर थांबले. चहा घेतला व साईबाबांचा प्रसाद आम्हा सर्वांना दिला. चक्क साईबाबांचा आशिर्वाद आम्हाला लाभला. आम्हा सर्वांना शुभेच्छा दिल्या व पुढील प्रवासासाठी गेले. हाॅटेल साई निसर्ग परीवारातर्फे त्यांचे आभार आज तीन वर्ष पूर्ण झाले त्यांनी दिलेला आशीर्वाद आणि साईबाबांचा प्रसाद कदाचित याचमुळे आम्ही तीन वर्ष व्यवस्थित विना तक्रारी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडले. या वाघ कुटुंबीयांचा आम्ही शतशः आभारी आहे. त्याचबरोबर साई खुशबू धाब्याचे मालक राजेंद्र आप्पा यांचेही परिवाराने आम्हा सर्वांना मोठी साथ दिली. प्रत्येक गोष्ट समजून सांगितली, शिवाय साई निसर्ग वास्तू उभा करण्यासाठी मोठे प्रोत्साहान त्यांनी दिले. त्यांचे आम्ही नेहमीच ऋणी आहोत. त्याचबरोबर असंख्य मित्रपरिवार तसेच लाईट फिटिंग केलेले शंकर पाटील किंवा बांधकाम केलेले बाजीराव मोरे यांचे या निमित्ताने आम्ही सारे ऋणी आहोत. आज तीन वर्षे पूर्ण होत असताना ज्या ज्या लोकांनी या साई निसर्गाच्या वाढीसाठी काम केलं प्रोत्साहन दिलं. त्या सर्वांचा आम्ही साई निसर्ग परिवार नेहमीच ऋणी आहे. आपण दाखवलेला विश्वास आणि आपली आमच्याबद्दल असणारी आत्मीयता हीच आमच्यासाठी मोठी प्रेरणा आहे. सर्व ग्राहक राजाचे प्रेम नेहमी साई निसर्ग परिवारावरती असावे एवढीच इच्छा धन्यवाद !
संपर्क :- अर्जुन सावंत, ९७०२७७१९३९
संपूर्ण पत्ता : हॉटेल साईनिसर्ग ढाबा , मोरेवाडी शेडगेवाडी कोकरूड रोड, मोरेवाडी
Comments
Post a Comment