१ अॅागस्टला काय होणार?
१ अॅागस्टला काय होणार?
अॅागस्ट महिना क्रांतीकारी आहे. ९ अॅाग्ास्ट, १५ अॅागस्ट हे या देशाच्या क्रांतीचे आणि स्वातंत्र्याच्ो दिवस अाहेत. ९ अॅागस्ट हा क्रांती िदन आहे. ‘चले जाव’, ‘छोडो भारत’, ‘जय हिंद’... जगात दोन शब्दांनी देश स्वतंत्र झाल्याचे एकमेव उदाहरण म्हणजे भारत आहे. हे दोन्ही दिवस राष्ट्रीय सण आहेत. या दोन दिवशी देशाबद्दलच्या सर्व अत्यंतिक आदराच्या भावना व्यक्त व्यायला पाहिजेत. पण, १५ अॅगस्ट हा या देशात ‘सुटीचा दिवस’ म्हणून समजला जातो. या वर्षी तर १५ अॅागस्ट सोमवारी आला आहे. म्हणजे शनिवार, रविवार, सोमवार या िदवशी खंडाळा, लोणावळा, महाबळेश्वर येथे मुंबईकरांची तुफान गर्दी. १५ अॅगास्टचे कोणाला काय पडले आहे? ‘हर घर तिरंगा....’ ही ‘मोहीम’ करावी लागते. असा एक स्वातंत्र्यदिन सांगा की, ज्या दिवशी प्रत्येक घरावर झेंडा फडकला गेला.... प्रत्येक घराने आपल्या अंगणात राष्ट्रगीत म्हटले? प्रत्येक मुंबईकराने आपल्या चाळीत, आपल्या गॅलरीत आपल्या घराच्या दारात झंेडा फडकवला? त्यावेळचा त्याग आणि समर्पण आम्ही सगळेच विसरलो आहोत. आज त्याची गरजही नाही. ५०-६० वर्षांत देश कसा उभा राहिला... एका खंडाएवढी लोकसंख्या असलेला हा देश.... सगळा युरोपसुद्धा स्ाव्वाशे कोटींचा नाही. हा एक देश एवढा प्रचंड.... अनेक जाती, धर्म, पंथ, पक्ष, दारिद्र्य, बेकारी, अज्ञाान, अंधश्रद्धा.... काय नव्हते.... ? पण एक जबरदस्त जमेची बाजू आहे... ती म्हणजे या देशाच्या िवविधतेमागे दडलेली ठाम एकता. त्या ऐक्याच्या जोरावरच या देशातील लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधूभाव टिकला.... कायम राहीला... आणि िकतीही प्रयत्न केले तरी िजथपर्यंत या देशातील सामान्य माणूस घटनेवर विश्वास ठेवणारा आणि सर्व धर्म समभावावर विश्वास ठेवणारा आहे, तिथपर्यंत कितीही आणि कशीही भ्रम निर्माण करण्याची परिस्थिती निर्माण केली तरी हा देश असाच अखंड राहील... सर्व जाती-धर्म गुण्या गोविंदानेच नांदतील. तोड-फोड करून मने नासवण्याचे काम यशस्वी होणार नाही. अाजपर्यंत ते झालेही नाही. प्रय्ात्न खूप सुरू आहेत. पण ज्या दिवशी हा सामान्य माणूस पेटून उठेल त्या दिवशी असे प्रयत्न करणारे उघडे पडतील. देशाच्या आस्मितेची जाणीव होवू देणारा हा अॅागस्ट महिना आहे. नवीन पिढीला
‘९ अॅागस्ट’ हा क्रांती िदन माहिती नाही. देशातील सारे पुढारी आगाखान पॅलेसमध्ये कोंडून ठेवल्यानंतरही- त्यात महात्मा गांधी हेही होते. - एक २० वर्षांची तरुणी अॅागस्ट क्रांती मैदानावर पोलवर चढून तिरंगा झेंडा फडकवते... पोलिसांच्या लाथा-बुक्यांचा मार खाते... त्या अरुणा असफअली िकतीजणांना लक्षात आहेत? ते गफार खान... गांधी... नेहरू.... पटेल... सुभाष... राजेंद्रबाबू... मालवीय... मौलाना आझाद... वीर नरिमन... किती नावं... किती नेते... िकती धर्माचे नेते... देशासाठी हातात हात घालून लढायला उभे राहिले. तीच खरी राष्ट्रीय संस्कृती. त्या संस्कृतिचे स्मरण म्हणजेच अॅागस्ट क्रांतीचे स्मरण.
अशा या अॅागस्ट म्ाहिन्यात ९ अॅागस्ट आणि १५ अॅागस्ट चर्चेऐवजी सध्या चर्चा आहे ती १ अॅागस्टला काय होणार याची.... २० दिवसांपूर्वी चर्चा होती, ११ जुलैला काय होणार? सर्वोच्च न्यायालयाने त्या दिवशी निर्णय दिला... पण, महाराष्ट्रातल्या नवीन सरकारचा गाडा अजूनही चिखलात रूतलेलाच अाहे. पुढे सरकतच नाही. अजूनही मंत्रिमंडळ अस्तित्वात येत नाही. अनेक जिल्हे महापुरात होते. पिके वाहून गेली... महागाई वाढत चालली. गॅस सिलिंडर आणखी महाग झाले... कष्टकरी आणि गरीब माणसांना जेवू घालणाऱ्या खाणावळी बंद पडू लागल्या. भाव परवडत नाहीत, हे त्याचे कारण. त्यामुळे या खाणावळीत जेवण थोडे स्वस्त मिळायचे बंद झाले. सामान्या हाॅटेलमधील राईसप्लेटही आता २५० रुपये झाली आहे. कितीजणांना परवडणार? सामान्य माणसांची सर्वबाजुंनी कुचंबणा आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आहेत.... पण प्रश्नांना कोणीच भिडत नाहीत. रस्त्यावर खड्डे पडले आहेत... वाहतूककोंडी होत आहे... तिकडे अनेक िजल्ह्यात महापुराने शेती उद्धवस्त झाली... ना मुख्यमंत्री दौऱ्यावर गेले.... ना उपमुख्यमंत्री दौऱ्यावर गेले. उद्योगपती रतन टाटा यांच्या वाढदिवसाला एकनाथजी, तुम्ही त्यांच्या घरी जावून अिभनंदन केलेत ते अितशय चांगले केलेत. कारण टाटा उद्योग घराणे हा देशाच्या अभिमानाचा विषय आहे. अंबानी, अदानीचे अिभनंदन करण्याची गरज नाही. तुम्ही आता गावच्या शेताच्या बांधावर जा... शेतकऱ्यांच्या घरात जा.... इकडे अिभनंदन झाले... तिकडे सांत्वनाला जा... त्यांच्या मदतीला जा.... ३० िदवस झाले, मंत्रिमंडळ नाही. अर्थात मंित्रमंडळ झाल्यामुळे फार मोठा कमाचा उरक होईल, असे कोणी मानत नाही. कारण तुमच्याजवळ जी टीम आहे त्यात कोणीही यशवंतराव मोहिते, राजारामबापू पाटील, मधुकरराव चौधरी, प्रतिभाताई पाटील नाही.... आवाका असलेली ती माणसं होती. राज्याचे प्रश्न समजून घेणारी ती माणसं होती. महाराष्ट्र समजणारी ती माणसं होती. आता मतलब साधणारी माणसं आहेत. पण, जे आहेत त्यातूनही मंत्रिमंडळ होत नाही... राज्य ठप्प झाल्यासारखे आहे.
अशा स्थितीत १ अॅागस्टला काय होणार? दोन विषयांचे िनर्णय सर्वाेच्च न्यायालयाला द्यायचे आहेत. एक म्हणजे ४० आमदारांना अपात्र ठरवायचे की नाही? पक्षतील फूट ३/४ (तीन चतुर्थांश) असेल तर त्या गटाला दुसऱ्या पक्षात विलीन व्हावे लागेल की नाही? आणि दुसरा विषय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची नियुक्तीच बेकायदा आहे... या याचिकेवरही निर्णय द्यायचा आहे. दोन्ही विषय वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मांडले जात आहेत. सामान्य माणसांना यात फार काही कळत नाही. पण, कायदेतज्ञा वेगवेगळी मते मांडत आहेत. पण, सगळ्यांचा लघुत्तम साधारण विभाजक काढला तर, कोणताही निर्णय झाला तरी, तो भाजपाच्या फायद्याचाच आहे. समजा, सर्वाेच्च न्यायालयाने सरकारच बेकायदेशीर ठरवले तर राष्ट्रपती राजवट येणार... दुसरा कोणताही पक्ष सरकार स्थापन करू शकणार नाही. राष्ट्रपती राजवट आली तरी ती राजवट भाजपाच्या फायद्याचीच आहे. मग इथे जो प्रशासक बसेल... ज्याला राज्यपाल नेमतील तो भाजपवालाच असेल. विधान परिषदेच्या ज्या १२ आमदारांची यादी राज्यपालांकडे पडली आहे तीही झटकन मंजूर होईल. ती नावेही भाजापावाल्यांचीच असतील. समजा शिंदे गटांच्या बाजूंनी निर्णय लागला, शिंदेनी कितीही म्हटले तरी, ते मुख्यमंत्री असले तरी, वर्चस्व भाजापाचेच राहणार... फडणवीसांना दुय्यम भूमिका घ्यावी लागली त्यात त्यांचा अपमान आहे... पण भाजापाचा काही तोटा नाही. कारण भाजापाला शिवसेनेची तोडफोड करायची आहे. आणि हे काम मोदी-शहांच्या पातळीवर ठरलेले आहे. फडणवीस ते करू शकत नाहीत. शिंदेच करू शकतात. त्यासाठी शिंदे यांना वापरून घ्यायचे आहे. शिंदे यांच्या अिभनंदनाच्या पोस्टर्सवर मोदी-शहा- नड्डा यांचे मोठे फोटो आहेत... बाळासाहेब ठाकरे, आनंद िदघे अाणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटो पोस्टाच्या स्टँपएवढेच आहेत. काही दिवस हे फोटो लावले जातील आणि एकदा का शिंदे आणि त्यांचा गट भाजापाच्या पूर्ण ताब्यात आला की, तेही फोटो हटवले जातील. सध्या एकच काम आहे.... ते म्हणजे शिवसेनेची तोडफाेड... सागराला भरती येते ती काही काळ टिकते. या तोडफोडीचेही असेच आहे. या महाराष्ट्रात कोणत्याही राजकीय पक्षाच्या माणसाला विचारा.... मुंबई, ठाणे, औरंगाबाद या िठकाणच्या कोणत्याही पक्षाच्या किंवा पक्षीय विचार न करणाऱ्या व्यक्तीला विचारा.... त्यांचे स्पष्ट मत असे अाहे की, ‘शिवसेना हवीच... आणि ती ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालीच हवी...’
आजच्या राजकीय स्थितीत कोणत्याही िनवडणुकीत वडा-पाव खावून जिद्दीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची एकच संघटना आहे... ती म्हणजे शिवसेना. बाकी राजकीय पक्षांना माणसं जमवताना काय फे फे होते.... किती गाड्या... आणि कार्यकर्त्याला किती पैसे द्यावे लागतात.... सगळ्यांना सगळा हिशेब खुलेपणाने मािहती आहे. निवडणुकीच्या काळात सभांचे दिवस सोडले तर, शेवटचे दोन दिवस ‘िनयाेजना’चे मानले जातात. कार्यक्रम पत्रिकेत स्पष्ट लिहिले जाते... नियोजन.... म्हणजे काय? तर ‘वाटप’... कसले वाटप...? सगळ्यांना ‘वाटप’ म्हणजे काय ते मािहती आहे. जीव ओतून िनवडणूकीत काम करणारी संघटना ही शिवसेनेजवळच आहे. त्यामुळे शिवसेना राहिली पाहिजे. काही टक्के राजकीय माणसांचा विषय सोडून द्या... राजकारणाशी ज्यांचे देणे-घेणे नाही त्यांना शिवसेना सत्तेत आहे की, नाही हा ही विषय नाही... पण त्यांना मनापासून असेच वाटते की, शिवसेना असली पाहिजे. आणि ती ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालीच असली पाहजे. आज शिवसेनेतून सगळे फुटले तरी निवडणुकीच्या मतपेट्या फुटतील तेव्हा अंतरमनाचा आवाज हेच सांगेल.... माझ्या घरातीलच गंमत सांगतो.... ‘मी नेहमी काँग्रेसच्या उमेदवाराला मत टाकले... माझ्ाी पत्नी मंगला हिने कोणाला मत टाकले, हे मी तिला कधी विचारले नाही.... पण एका निवडणुकीत ती म्हणाली.... ‘आज मी शिवसेनेला मत टाकलं...’ ‘मी म्हटलं, का गं?’ ती म्हणाली, ‘उद्या रस्त्यावर राडा झाला तर, शिवसेनेचे तरुण आधी धावून येतील.... तुमचे काँग्रेसवाले रस्त्यावर उतरतील का? दंगा होवून गेल्यावर शांतता समितीच्या बैठकीला येतील. ’
मंगलाने व्यक्त केलेली भावना ही सामान्य माणसाच्या मनातील भावना आहे. आज ती हयात नाही. पण, ही भावना अजूनही अनेकांच्या मनात हयात आहे. त्यामुळे १ अॅागस्टला कोर्टाचा निर्णय काय होतो, हे महत्त्वाचे आहेच... तो कसाही झाला तरी त्याचा तात्पुरता भाजपालाच फायदा आहे. पण, हे बंड िकंवा हे सरकार तात्पुरतेच आहे.... एकदा कामाला सुरुवात होऊद्या... मंित्रमंडळ होऊद्या... प्रश्नांना सामोरे जायची वेळ येऊद्या... मग कशी त्रेधातिरपीट होते बघा.... आणि हे ही बघायला भाजपाला मजाच वाटणार आहे... कारण त्यांना सध्या ही जी फाटाफूट झालेली आहे.... ती राजकीयदृष्ट्या वापरून घ्यायची आहे. याच्यामागे कोणतेही तत्वज्ञाान नाही. कधी राम वापरला.... कधी गंगा वापरली.... भावनात्मक मुद्दे वापरायचे... आता शिंदे गटाला वापरत आहेत... एकनाथजी, आजच मी लिहून ठेवतो... पुढेही असेच घडणार आहे. तुमचा हुशारीने वापर करून घेणार. नंतर काय होईल, याची कल्पना तुम्हाला येईलच. दिल्लीतील जे भाजापाचे धुरीण आहेत, ते धर्मादाय आयुक्त नाहीत. राजकीय हिशेब करून तुम्हाला मुख्यमंत्री केलेले आहे. त्यामुळे एक महिना विना मंत्रिमंडळाचा गेला. पुढचे चार-पाच महिने किंवा वर्ष- दोन वर्ष मंित्रमंडळासह जातील. तिथपर्यंत तुमचा माईक फडणवीसांनी खेचून घेतला म्हणून िदल्लीचे नेते बोलणार नाहीत.... आणि उपमुख्यमंत्री केले म्हणून फडणवीसही त्रागा करणार नाहीत. नाटकाचे पुढचे दोन अंकही लिहून झालेले आहेत... एक अंक पार पडला आहे. पुढचे दोन अंक कसे असतील याच्यासाठी फार मोठा विचार करण्याची गरज नाही. २०२४ च्या लोकसभेच्ाा हिशेब मोदी-शहा या जोडीने करून ठेवलेला आहे. आणि नंतर त्यांना तुम्ही किती जवळचे आहेत की नाही, याचा हिशेबही ते नंतर करतील. त्यामुळे १ अॅागस्टला काही निर्णय झाला तरी भाजपा घाट्यात जाणार नाही.... महराष्ट्रातला पहिला अंक झाल्यावर आता हाच अंक बंगालसाठी वापरला जाणार आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आली तरीही ते खूशच होतील. तुमच्या बाजूने िनर्णय झाला तरी त्यांचे नुकसान नाही. महाराष्ट्रातील जनतेचे काय होईल, याची चिंता कोणालाही नाही. लोकांच्या प्रश्नांचे आज काय खोबरे झालेले आहे, याचीही िचंता कोणाला नाही. ही परिस्िथती जेव्हा असते तेव्हा मानसशास्त्र असे सांगते की, लोक शांतपणे हे सगळं सहन करत असतात. आणि जेव्हा लोकांचा दिवस उगवतो त्या दिवशी सत्ताधाऱ्यांच्या भोवतीची ही गर्दी, हार-तुरे, अिभनंदनाचे फलक यापैकी काहीही कामाला येत नाही. सध्या एवढेच....
- मधुकर भावे
Comments
Post a Comment