रामदास देसाई वाढदिवस




रामदास देसाई वाढदिवस
ज्यांच्याजवळ आयुष्यातील सगळी गुपित उघडी करावीत,समोर कितीही दुःखाचे डोंगर असले तरी ज्यांच्याशी बोलल्यावर त्या अवघड डोंगराची चढण सोपी व्हावी;* दाट धुक्यात वाट हरवल्यावर क्षणातच कुणीतरी बोट धरून मी आहे रे सोबत...! असं हक्काने म्हणावं; अगदी असचं आजचं व्यक्तिमत्त्व आहे. आमचे मित्र कुस्ती हेच जीवन चे संस्थापक  अध्यक्ष मा. रामदास देसाई सर, असं  त्यांचं नाव... कोणताही माणूस जवळ आल्यावरच समजतो. मी सरांना फोन केला आणि त्यांच्या कामाबाबत विचारणा केली असता. अत्यंत जिव्हाळीने आणि मनापासून कुस्ती वाढावी यासाठी प्रयत्न करत असल्याचे जाणवले.
        सन 2017 फेसबुक पेज 'कुस्ती हेच जीवन ' नावाने सुरू करण्यात आले. कुस्ती विषयी माहिती,  खुराका विषयी माहिती, पैलवान कसा घडला जातो या विषयावर माहिती, अनेक पैलवानांचे कुस्तीचे व्हिडीओ या माध्यमातून अनेक देशात 'कुस्ती हेच जीवन ' पोहचले.  पण म्हणतात ना चांगले काम करत असताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्याच प्रमाणे रामदास सरांच्या या कार्यात अनेकांनी काटे पेरण्याचा प्रयत्न केला.  पण सत्याच्या पाठीशी नेहमी भगवंत असतो. त्याच प्रमाणे  सरांच्या प्रामाणिक प्रयत्नांना परमेश्वराने हात दिला. आणि त्याही परिस्थितीतून कुस्ती हेच जीवन सावरण्याची ताकद दिली.
       काही वाईट विचारांनी देसाई सरांचे फेसबुक आकाऊंट व युट्यूब चॅनेल बंद पाडले. 'पण हारेल तो रामदास कसला' रामदास सर हरले नाहीत पुन्हा कामाला लागले. केलेले लिखाण, बनविलेले व्हिडीओ सगळ गेलं होतं. सरांनी पुन्हा सुरवात केली.  पुन्हा फेसबुक आकाऊंट चालू केले , आणि आपल्या प्रामाणिक लेखनातून समाजाच्या समोर आले. अवघ्या तिन महीन्यात 25000 लाईक मिळाले. ही असते खऱ्या सोन्याची पारख. एवढ्यावरच सर थांबले नाहीत, तर त्यांच्यातला समाजसेवक जागा झाला. व 25000 लाईक मिळाल्याबद्दल सरांनी 25 झाडांचे  वृक्षारोपण केले. याला म्हणतात खरी सेवा.  *कुस्ती हेच जीवन* एक छोटंसं रोपटं होतं आता त्याचं वटवृक्ष झालेले आहे .   
 कुस्ती हेच जीवन फेसबुक पेज वरती 50,000 फॉलोअर्स चा टप्पा पूर्ण झाला असुन, अवघ्या एक वर्षांपूर्वी अर्थातच २० एप्रिल २०१९ रोजी लाल मातीची सेवा सुरू करण्यासाठी सुरू केलेल्या "कुस्ती हेच जीवन फेसबुक पेज" ला आज पाच वर्षे पूर्ण झाली आणि बघता बघता लाखो सबस्क्राईब झाले. एवढेच काय तर युट्युब तर्फे सिल्वर बटन सुद्धा प्राप्त झाले. याच कुस्ती हेच जीवन या संघटनेने कोरोना ग्रस्थासाठी पंतप्रधान साह्यक निधीमध्ये 12000 रूपयेचा धनादेश दिला. त्यानंर अनेक पैलवानांना खुराकासाठी मदत केली.  पुरग्रसतांच्या साठी सुद्धा ही संघटना मदतीसाठी धाऊन गेली होती. त्याच बरोबर साके ता. कागल येथे  एक  ऐतीहासिक कुस्ती मैदान पार पाडले. तसेच तुरूकवाडी येथे देशातील पहिले आॅनलाईन कुस्ती मैदान पार पाडले.  तसेच आत्तापर्यंत झालेले हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी व विविध डावांचे फोटो प्रदर्शन सुद्धा घेण्यत आले.  असे अनेक चांगले ऊपक्रम या संघटनेच्या माध्यमातुन राबवले जातात.
देसाई सर  कोणाचंही कौतुक  पैशे घेऊन करत नाहीत, तर कौतुकास पात्र असणाऱ्या व्यक्तीला स्वताः फोन करून त्याची माहिती घेतात. आणी विना मोबदला त्या व्यक्तीचे कार्य समाजासमोर आणतात.
       आज खेडोपाडी होणारी मैदाने जगासमोर आणने ही सोपी गोष्ट नाही.  त्यासाठी निस्वार्थीपणाने  कुस्तीला जिवन मानुन काम करणाऱ्या व्यक्तींची गरज आहे. आणी हे काम रामदास देसाई सर मोठ्या हिमतीने करत आहेत
            कागल तालुक्यातील एक तुफानी वादळ म्हणून सरांची ओळख आहे. राम सारंग सरांच्या हाताखाली शिकलेला हा दास खऱ्या अर्थाने गुरूच्या नावातील राम आणि रामाचा दास झाला. आणि त्या शिष्याचा रामदास देसाई झाला. रामदास सर आज सुद्धा गुरूच्या विचारांनिच चालतात. कुठेही ऊतमीत नाही, कसलीही लबाडी नाही, सहज साधी राहणीमान,  स्पष्ट बोलण यामुळे हा आपला हक्काचा माणूस वाटतो. रामदास देसाई सर हे कुस्तीसाठी आहोरात्र काम करत आहेत.  अनेक मैदानांना भेटी देत आहेत. जुन्या पैलवानांच्या गाटी घेत आहेत.  स्वतःच्या खिशातील पैशे घालून कुस्तीसाठी काम करणाऱ्या या महान पैलवानाचा आज वाढदिवस आहे त्या निमित्ताने ही छोटी शुभेच्छा!

संकलन -: *मनोज मस्के*, 
 पत्रकार दै. पुण्यनगरी
फोनः- 9529309640  / 9890291065







Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*