डी आर जाधव आण्णा यांची महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद कार्यकारी समितीवर निवड
मा.डी आर जाधव आण्णा यांची महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद कार्यकारी समितीवर निवड झाली आणि तमाम पैलवानांच्या मनात एक आनंदचा उत्साह निर्माण झाला.
आण्णांनी आजपर्यंत अनेक मित्र बनविले, नाती जपली संघर्षाचं बाळकडू तर लहानपणीच मिळाल्याने परिस्थितीची जाण असणारे आण्णां आज महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या कार्यकारणीपर्यंत पोहचले. गरीबी चे चटके सहन करत मी पाहिलेले दिवस कुणाच्याही नशिबी येऊ नये अशी आण्णांची भावना आहे. अगदी कर्णाप्रमाणे आपल्याकडे आहे ते दुसर्याला देणे यातच ते आपले भाग्य समजतात.
आज आण्णा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सदस्य आहेत. आण्णांचे कार्य फार मोठे आहे. सदस्य पदाची एवढीमोठी धुरा आण्णा लिलया पेलत आहेत. गरीबीमुळे कुस्ती खेळता आली नाही. पण आण्णांच्या दानशुरपणामुळे महाराष्ट्रात कुस्तीला दिवस चांगले आलेत. आण्णांनी अनेकांना सर्व प्रकारची मदत केली आहे. अनेक पैलवानांचा खुराकाचा खर्च आण्णा स्वत: करतात. भागातील प्रत्येक मैदानात आण्णा खास मुंबई वरून अवर्जून उपस्थित असतात. अनेक गावांना आण्णांनी कुस्ती अखाडे बांधून दिले. अनेकांना घर बांधन्यासाठी मदत, लग्नासाठी मदत अशा अनेक प्रकारच्या मदती आण्णांनी लोकांच्यासाठी केल्या . त्याच बरोबर कुस्ती टिकावी म्हणून सतत प्रयत्न केले.
आण्णा काही राजकारणी नाहीत पण राजकारण्यांना लाजवेल एवढं मोठ काम त्यांच आहे. समाजात पैेसे कमवणारी माणसं, माणूसपण विसरतात हे आम्ही पाहिले आहे. पण आण्णांच्या बाबतीत पैसा आणि सत्ता ही आवळाच्या पाणावरल्या पाण्याच्या थेंबासारखी आहे. ते कधीही जाऊ शकते. पण कमवलेली माणसं शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या बरोबर राहू शकतात असं आण्णांचं ठाम मत आहे.
आज महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने अण्णांची कार्यकारणीवर निवड केली. आणि खऱ्या अर्थाने योग्य व्यक्तीला कार्यकारणीवर घेतले. कुस्ती वाढावी आणि टीकावी यासाठी काम करणाऱ्या एका दानदार व्यक्तीला कार्यकारणीवर घेऊन तमाम पैलवानांची मने परीषदेने जिंकली. डी. आर. जाधव (अण्णा) यांना पुढील वाटचालीसाठी तमाम पैलवानांच्या कडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
मनोजकुमार मस्के - मांगरूळ
अध्यक्ष शिराळा तालुका
कुस्ती हेच जीवन महाराष्ट्र राज्य,
9890291065

Comments
Post a Comment