*मा डी आर जाधव (आण्णा) यांची महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या कार्यकारिणी समिती सदस्य पदी निवड
*मा डी आर जाधव (आण्णा) यांची महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या कार्यकारिणी समिती सदस्य पदी निवड*.....
---------------------------
✍️ *पै अशोक सावंत /पाटील*
--------सोंडोली-------
नुकतीच भारतीय कुस्ती महासंघाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त केली आहे, आणि नवीन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद स्थापना झाली आहे त्यामधे सर्व नवीन चेहर्यांना संधी देण्यात आली आहे. त्यामध्ये अध्यक्ष म्हणून *आदरणीय रामदास तडस सर यांची नियुक्ती तर सरचिटणीस अर्जुनवीर काकासाहेब पवार तर वरिष्ठ उपाध्यक्ष मा विजय बराटे सर यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर कार्याध्यक्ष म्हणून धवलसिंह मोहिते पाटील यांची वर्णी लागली आहे*.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या या नव्याने स्थापन झालेल्या कार्यकारिणीत सदस्य म्हणून मुळचे सांगली जिल्ह्य़ातील शिराळा तालुक्यातील चिंचोली गावचे पण कर्मभूमी ठाणे असणारे मा डी आर जाधव आण्णा यांची ठाणे जिल्ह्यातुन ठाणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आदरणीय सुरेशभाई ठाणेकर यांनी राज्याच्या कुस्तीगीर परिषदेच्या कार्यकारिणी समिती सदस्य पदी त्यांचे नाव पुढे केले आणि त्यांची त्याठिकाणी निवड करण्यात आली आहे आणि कुस्ती क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
खर्या अर्थाने कुस्तीगीरांचे आश्रयदाते, कुस्ती क्षेत्रातील एक दानशूर व्यक्तीमत्व मा डी आर जाधव आण्णा यांच्या रुपाने खरंच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्य़ातील कुस्तीगीरांना चांगले दिवस येतील यात शंका नाही.. अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून गेली कित्येक वर्षे आण्णा काम पाहत आहेत. पोलीस खात्यातील पोलीस उपनिरीक्षक म्हणून आणि पोलीस खात्यातील राष्ट्रपती पदक प्राप्त असणारे आण्णा आपल्या वैयक्तिक व्यस्त जीवनात कुस्तीला गतवैभव मिळावे, कुस्तीला नव्याने उभारी मिळावी म्हणून नेहमी झटत असतात किंबहुना ते झटत आहेत.
कुस्ती वाढवण्यासाठी मनापासून धडपड करणारे आदरणीय आण्णा यांना आपण केलेल्या या प्रामाणिक कामाची पोचपावती म्हणून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या कार्यकारिणी समिती सदस्य पदी त्यांची वर्णी लागली आहे.
▪️ *ठाणे जिल्हा कुस्तीगीर संघाकडून मा डी आर जाधव आण्णा यांचा विशेष सन्मान*...
नुकतीच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या *कार्यकारिणी समिती सदस्य पदी* निवड झालेबद्दल आदरणीय आण्णा यांचा ठाणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आदरणीय सुरेशभाई ठाणेकर, यांच्या हस्ते त्यांचा *ठाणे जिल्हा कुस्तीगीर भवन येथे विशेष सन्मान करण्यात आला*..
यावेळी मा रमाकांत पाटील मा तुकाराम खुटवड सर, ऑल इंडिया चॅम्पियन पै रंगराव पाटील पेरीडकर, मा पोपट निकम सर असे अनेक ठाणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे पदाधिकारी उपस्थित होते..
पोलीस उपनिरीक्षक, राष्ट्रपती पदक विजेते, अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष व नूतन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या कार्यकारिणी समितीचे सदस्य *आदरणीय डी आर जाधव (आण्णा)* यांना व सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी *'कुस्ती हेच जीवन' कडुन भरभरून शुभेच्छा*.......
- - - - - - - - - - - - - - -
धन्यवाद
*पै अशोक सावंत - पाटील*
कुस्ती हेच जीवन महासंघ महाराष्ट्र राज्य,
अध्यक्ष शाहूवाडी तालुका
मो 9702984006
Comments
Post a Comment