अंत्री येथील स्वामी धाम मंदिरात गुरुपौर्णिमा साजरी....


अंत्री येथील स्वामी धाम मंदिरात गुरुपौर्णिमा साजरी....
,.....,.,........,...............................................................
मनोजकुमार मस्के -मांगरूळ
,.....,.,........,...............................................................
गुरुपौर्णिमेनिमित्त शिराळा तालुक्यातील अंत्री येथील श्री स्वामी धाम येथे मठाधिपती शिवाजी रसाळ सर यांनी अनेक भक्तांसमवेत गुरु स्वामींचे पूजन करून गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला.
      आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा हा दिवस संपूर्ण देशभरात मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. गुरूंनबद्दल प्रेम व्यक्त करण्याच्या या दिवसाला भारतात विशेष महत्त्व आहे. विविध क्षेत्रातील शिष्य मंडळी या दिवशी आपल्या गुरुचे पूजन करतात.
      अंत्री येथील नव्यानेच झालेल्या स्वामी धाम मध्ये आजूबाजूच्या परिसरातील भाविक मोठ्या श्रद्धेने येतात व  स्वामी धाम मधील स्वामी समर्थांचे दर्शन घेतात. 
         सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्याला मिळालेल्या हिश्यातील थोडा हिस्सा बाजूला काढून स्वामी धाम चे काम चालू करणारे शिवाजी रसाळ यांनी स्वामी धाम उभारण्याचा संकल्प केला. त्या संकल्पाला भक्तांचा प्रतिसाद मिळाला. बघता बघता स्वामींचे मंदिर उभा राहिले. आणि याच मंदिरात अनेक कार्यक्रम ही होऊ लागले असे हे पवित्र समजले जाणारे स्वामीधाम मंदीर. गुरुपौर्णिमे दिवशी हे मंदीर भक्तांनी नाहून निघाले होते. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून स्वामींचे गुरुचरित्र 21 अध्यायाचे पठण करण्यात आले. गुरु पौर्णिमे दिवशी सर्वांना महाप्रसादाचेही नियोजन करण्यात आले होते.
       त्याच बरोबर त्त्वृत्तपत्र विक्रेते गणेश बोंगाणे इस्लामपूर यांच्या प्रामाणिकपणाचा सन्मान गुरुपौर्णिमे दिवशी अंत्री बुद्रुक येथील स्वामी धाम मठात शेकडो भाविक भक्तांच्या उपस्थितीत महाधीपती आणि श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी रसाळ गुरुजींच्या हस्ते रोख रुपये एक हजार एकवीस, चांदीची फुले, शाल, श्रीफळ देऊन करण्यात आला. बोंगाणे यांनी त्यांना सापडलेली पैशाची पर्स पोलीस स्टेशनमध्ये जमा केली. त्यांच्या प्रामाणिकपणाला दात देत प्रसाद सरांनी आपल्या पेन्शन मधील काही भाग बोंगाणे यांना बक्षीस म्हणून दिला. यावेळी संस्थेचे सचिव उषा रसाळ, प्रकाश पाटील, एन. डी. पाटील इस्लामपूर इत्यादी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*