*नॅशनल पैलवान संजय खांडेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*
*नॅशनल पैलवान संजय खांडेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*
कुस्ती ही गरीब कुटुंबातील मुलं आवडीने खेळतात. हे जरी खरं आसलं तरी गरिबाला न्याय नसतो हे सुद्धा तितकंच खरं आहे.
मांगरूळ गावचे एकेकाळचे तुफानी मल्ल म्हणुन ओळखला जाणारा एक अंतरराष्ट्रीय पै. संजय बाळू खांडेकर. सांगली जिल्ह्य़ातील शिराळा तालुक्यातील एक छोटेसे खेडेगाव मांगरूळ. या गावाला पुर्विपासुनच पैलवानकीचा वारसा आहे. अनेक मल्ल या मांगरूळच्या मातीत तयार झालेत. अनेकजन नॅशनल झालेत, अनेकजण शिवछत्रपती पुरस्कार विजेते झालेत. याच मांगरूळचा एक तुफाणी मल्ल पै. संजय खांडेकर.
संजयला लहानपणापासून तालमीचा नाद होता. पण घरी दुध म्हटलं तर प्यायला नसायचे. काय असेल ती भाजी भाकरी खाऊन तो तालमीत मेहनत करत असे. शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये तो विभागा पर्यंत लढला. साई स्पोर्ट्स च्या माध्यमातून संजय नॅशनल चॅम्पियन्स सुद्धा झाला. आणी त्याने नोकरी साठी रेल्वेला आपली प्रस्ताव फालईल पाठवली. पण गरीबीतून आलेल्या खेळाडूच्या पाठीशी कोण उभा राहणार ज्याचा वशिला ताठ तोच नोकरी मिळवू शकतो. त्यामुळे रेल्वेच्या सर्व अटी पूर्ण करून प्रस्ताव दिला तरी तो एकाद्या कस्पटासमान बाहेर काढण्यात आला. आणी तिथेच संजय खचला .
खरंच शासकीय यंत्रणेने जर आन्याय केला नसता तर संजय आपले कुटुंब सुखी ठेऊ शकला असता. याला शासकीय यंत्रणा कारणीभूत आहे. असे अनेक पैलवान या महाराष्ट्रात अढळतील. माझी विनंती आहे शासनाला अशा नॅशनल झालेल्या पैलवानांना शोधून त्यांना भले नोकरी नाही देता आली, पण पेन्शन स्वरूपात काही मानधन द्यावे त्यामुळे त्याच्या कुटूंबाला निदान वाटेल तरी, कुस्तीने आमची वाट नाही लावली तर आम्हाला जगवले !
संजय खांडेकर मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्र काम करत आहे आणि मिळणाऱ्या मानधनावरच आपलं कुटुंब चालवत आहेत अशा या महान पैलवानाचा आज वाढदिवस नॅशनल पैलवान संजय यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा !
पै. मनोज मस्के (पत्रकार)
9890291065
Comments
Post a Comment