Posts

Showing posts from November, 2021

*चालु वर्षी सोंडोली गावची यात्रा छोट्या प्रमाणात पण उत्साहात संपन्न*...

Image
*चालु वर्षी सोंडोली गावची यात्रा छोट्या प्रमाणात पण उत्साहात संपन्न*...  -----------------------------      सोंडोली ता शाहुवाडी येथील नाईकबा देवाची यात्रा सोमवार दि २९ नोव्हेंबर रोजी *छोट्या प्रमाणात का होईना पण उत्साहात पार पडली*.    यावर्षी मंदिर सुशोभीकरणाचे काम चालू असल्यामुळे छोट्या प्रमाणात यात्रा घ्यायची असे ग्रामस्थांनी ठरवले.   आदल्या दिवशी रविवारी रात्री ११ वाजता *नाईकबा देवाचा छबिना अगदी सर्व गावातील सर्व लोकांच्या साक्षीने अगदी दिमाखात पार पडला*.       कुस्ती मैदान मंदिर सुशोभीकरणाचे कामामुळे रद्द करण्यात आले होते, पण *गावातील ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन छोटे कुस्ती मैदान घेऊन सोंडोली गावची कुस्ती परंपरा अखंडित ठेवली*. प्रशस्त अशा आखाड्यात १५ ते २० चटकदार अशा कुस्त्या मैदानावर पार पडल्या.     गावातील सर्व ग्रामस्थांनी चालु वर्षी मंदिर सुशोभीकरणाला प्राधान्य देऊन एक मोठे काम केले आहे. मंदिर परिसर सुसज्ज करुन नाईकबा देवाच्या परिसराची जागा सुद्धा सुसज्ज होणार आहे.. नाईकबा देवस्थान हे नवसाला पावणारे ...

उसतोड लेकरांना शोधावा लागत नाही कशाचा आधार

Image
चिखली - मनोजकुमार मस्के  कधी पावसाच्या ढगांनी दाटलेलं .. तर कधी उन्हाच्या तडाख्याने फाटलेलं ...डोक्‍यावर नेहमी उभा असलेलं आभाळ... गारठ्याची उठलेली लहर... उसाच्या पालात थाटलेला संसार.. दिवसभर कोयता घेऊन थकलेल्या हातांना एक क्षणभरही विश्रांती न देता आपली लेकरं उसाचं खोपट करून त्याच्या आडोशाला ठेवून त्यांची माय लगबगीने ऊस तोडायला सुरुवात करते.          पोटाची खळगी भरण्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, मुलीच्या लग्नासाठी म्हणून अनेक कुटुंब मराठवाडा विदर्भ येथून ऊस तोडण्यासाठी शिराळा तालुक्‍यात दाखल झाली आहेत. दिवाळीच्या अगोदर आलेली ही कुटुंब रानावणातच आपली खोपट घालून मुलाबाळांना घेऊन राहत असतात. अशाच एका उसाच्या फडात पावसाच्या सरी पासून आणि वाऱ्यापासून आपली लेकरं वाचावीत म्हणून एका मायने ऊसाचं आणि वाड्याचं उभारलेले हे खोपटं. हे चित्र आहे शिराळा तालुक्यातील सागाव आणि मांगले परिसरातील. आठ दिवसापुर्वीच दिवाळी हा आनंदाचा सन झाला. पण या कष्टकऱ्यांच्या वाट्याला मात्र दिवाळीचा आनंद आलेला नाही. उसाच्या फडातच त्यांची दिवाळी साजरी होत आहे.      ...

उध्दवराव, भाजपाला पराभूत करता येते.. ही हिंमत तुम्ही दिलीत हेच तुमच सगळ्यात मोठ यश...

Image
मधुकर भावे उध्दवरावांच्या सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली. लोकशाहीमध्ये कोणतेही सरकार पाच वर्षाकरीता असते. हे सरकारही पाच वर्षाकरिता आहे. दोन वर्षे यशस्वी झाली. प्रशासनाचा तसा फारसा अनुभव उध्दवरावांजवळ नव्हता. मुंबई, औरंगाबाद, ठाणे, या महानगरपालिका त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला सातत्याने जिंकून दिल्या. त्यामुळे त्यांचे राजकीय नेतृत्व-कौशल्य सिध्द झालेच होते. मुंबई महापालिकेच्या एका निवडणुकीत तर त्यावेळचे मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांचे अख्खे सरकार, वाघाच्या जबड्यात हात घालण्याची भाषा करत होते. पण त्यांची ती हिंमत नव्हती, नुसती भाषणबाजी होती. मुंबई महापालिका त्यावेळी फडणवीस सरकारच्या विरोधात उभे राहून  उध्दवरावांनी शिवसेनेला जिंकून दिले. ५0 वर्षापूर्वी बाळासाहेब नेतृत्व करीत असताना शिवसेनेला त्यांनी महापालिका जिंकून दिली आणि डॉ. हेमचंद्र गुप्ते हे शिवसेनेचे पहिले महापौर झाले. प्रमोद नवलकर, वामनराव महाडिक शिवसेनेचे पहिले आमदार झाले. त्याला आता ५0 वर्षे झाली. बाळासाहेब सत्तेपासून दूर राहीले. त्यांनी म्हटल असतं तर पहिले महापौर तेच होवू शकले असते. उध्दवरावांनी ठरवलं अ...

ती २४ वर्षे... ही २४ वर्षे....

Image
मधुकर भावे बघता-बघता २४ वर्षे झाली. बाबूजींचा आज २४ वा स्मृतीदिन. बाबूजींच्या सोबत - दिवस उगवल्यापासून दिवस मावळेपर्यंत- २४ वर्षे वावरलो. माणूस म्हणून बाबूजी किती मोठे आहेत. हे त्या २४ वर्षांतील प्रत्येक दिवशी अगदी सहजपणे समजत होते. त्यांच वागण्यातल मोठेपणं त्यांनी कधी स्वत:हून सांगितलं नाही, त्यांनी मदत केलेली शेकडो माणसं समोर आहेत, त्यांच्यामुळे घरकुल मिळालेली कित्येक माणसं आहेत, त्यांच्यामुळे बॉम्बे हॉस्पिटलसारखया दर्जेदार रुग्णालयात उपचार घेवून बरे झालेले शेकड्यांनी आहेत. पण त्यांनी डाव्या हाताच, उजव्या हाताला कळू दिलं नाही. अस बाबूजींचं हे मनाचं मोठेपण २४ वर्षे पाहिलं अगदी शेवटच्या दिवसापर्यंत. प्रत्येकाला एक दिवस जायचे आहे. मृत्यू हा महोत्सव आहे असे विनोबा सांगत आणि बाबूजी त्याचाच उच्चार करतं. मी ज्या २४ वर्षांत बाबूजींना पाहिलं, त्या २४ वर्षांत लोकमतचा वटवृक्ष झाला. त्याच्या पारंब्या महाराष्ट्रभर पसरल्या. बाबूजी मंत्री म्हणून सगळ्याच मुख्यमंत्र्यांना हवे होते. त्या काळात त्यांनी केलेल्या कामाची यादी एवढी मोठी आहे. आज अशी काम होत नाहीत. कार्यकर्त्यांच्या खांद्यावर कोण...

सुसंस्कृत नेतृत्व विजय पाटील मांगले गावचे सुपुत्र उच्च शिक्षित शांत व संयमी सामान्य माणसाबद्दल आपुलकी व मदत करायची भावना असणारे उदयोन्मुख नेतृत्व म्हणजे विजय पाटील (आबा )होय

Image
सुसंस्कृत नेतृत्व विजय पाटील मांगले गावचे सुपुत्र उच्च शिक्षित  शांत व संयमी सामान्य माणसाबद्दल आपुलकी व मदत करायची भावना असणारे उदयोन्मुख नेतृत्व म्हणजे   विजय पाटील (आबा )होय                     राजकारण समाजकारण उद्योग व्यवसाय सार्वजनिक क्षेत्रात    समाजाचा आरसा व कष्ट धडपड ध्येय वेडे व्होऊन  ग्रामदैवत श्री मंगलनाथाचा आर्शिवाद व पुण्याईची शिदोरी बरोबर घेऊन आबांची सर्व क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती ची घोडदौड सुरु आहे.  यश उतुंग डोंगराएवढे प्राप्त केले तरी माणुसकीची साखळी पर्वताएवढी आहे .           स्वच्छ चेहरा निर्व्यसनी पण जिद्दी असणाऱ्या आबांनी मांगले गावचे सरपंच म्हणून एक वर्षाच्या कालावधीत गाव विकासासाठी सहकाऱ्यांच्या व माजी राज्य मंत्री शिवाजीराव नाईक साहेबांच्या  माध्यमातून भरीव योगदान देऊन  आदर्श  सरपंच म्हणून काम केले आहे . कोरोना काळात आर्सेनिक अलबम औषधी गोळ्या मोफत वाटप केल्या.त्याचबरोबर कोविड काळात जिवाची बाजी लावुन कमी मानधनात काम केलेल्...

*जनसामान्यांचे युवा नेतृत्व!*

Image
*शिराळा तालुक्यातील युवा आणि अभ्यासु व्यक्ति मत्व असणारे, सर्व सामान्यांचे नेते मा. सत्यजित (भाऊ) देशमुख  वाढदिवस विशेष* *********** ✍️ *पै मनोज मस्के*- मांगरुळ  .................  उच्च शिक्षित, शांत व संयमी, सामान्य माणसांबद्दल आपुलकी व मदत करण्याची भावना असणारे युवा नेते म्हणजे *मा.'सत्यजित देशमुख भाऊ'.* आणि त्यांचा आज वाढदिवस आहे....            नेहमी हसत मुख असणारे भाऊ, कोणताही तणाव चेहर्‍यावर नाही. वडीलांच्या निधनानंतर थोडेच दिवसात आईचे ही छत्र हरपले, तरीही आईवडीलांच्या दुःखद निधनानंतर जनताच आपले कुटूंब समजून भाऊंनी आपले वैयक्तिक दुःख बाजूला ठेऊन *समाजसेवेच्या नविन पर्वाला सुरवात केली*.  सर्वसामान्य लोकांना भेटून त्यांच्या अडीअडचणी समजावून घेणे, त्यांना आपल्याकडून होत असणारी मदत करणे या गोष्टीकडे त्यांनी सातत्याने लक्ष दिले.  अनेकांच्यावर आदरणीय देशमुख साहेबांनी केलेले उपकार कित्येक कार्यकर्ते विसरले, भाऊंचा पडता काळ नजरेत येताच  त्यांनी भाऊंची साथ सोडली, पण भाऊ त्यामुळे थांबले नाहीत. वडीलांच्या पश्चात त्यांनी आ...

चालु वर्षी २९ नोव्हेंबर २०२१ रोजी होणार्या सोंडोली गावची यात्रा नाईकबा देवाच्या सुशोभिकरणासाठी छोट्या प्रमाणात घेण्याचा ग्रामस्थांचा निर्णय*..

Image
*चालु वर्षी २९ नोव्हेंबर २०२१ रोजी होणार्या सोंडोली गावची यात्रा नाईकबा देवाच्या सुशोभिकरणासाठी छोट्या प्रमाणात घेण्याचा ग्रामस्थांचा निर्णय*.. .............................  ✍ *लेखन पै अशोक सावंत/ पाटील*- सोंडोलीकर ..............       या वर्षी सोंडोली गावची नाईकबा देवाची यात्रा नाईकबा देवाच्या अनेक वर्षे *प्रलंबित सुशोभीकरणाच्या कामासाठी* छोट्या प्रमाणात करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. *गावातील लोकांच्या उपस्थितीत रविवार दिनांक २८ डिसेंबर २०२१ रोजी रात्री ११ वा नाईकबा देवाचा छबिना निघणार आहे*.     सोंडोली गावच्या *नाईकबा देवाच्या सुशोभिकरणासाठी अंदाजे ४ ते ५ लाख रुपये* खर्च अपेक्षित आहे, आणि मंदिर सुशोभीकरणाला लोकांनी चालु वर्षी प्राधान्य देऊन यात्रेसाठी येणारा दुसरा खर्च टाळण्यासाठी कुस्ती मैदान तसेच तमाशा रद्द करण्यात आला आहे..   मंदिराच्या सुशोभिकरणाच्या कामाची सुरुवात झाली आहे, आणि लवकरच मंदिर परिसर सुसज्ज होणार आहे. या कामासाठी सढळ हाताने देणगी सुद्धा येत आहे, देणगीदारांचे ग्रामस्थांच्या वतीने मनापासून आभार......

ढग आले दाटून! वैरण घे झाकुन...

Image
ढगाळ वातावरणामुळे शेतकरी धास्तावले कामे झाली ठप्प पिके धोक्यात... चिखली -मनोजकुमार मस्के महापुराचे सावट दूर झाले पाठोपाठ सुगीची लगबग सुरू असतानाच पावसाळी वातावरण तयार झाले आहे. ग्रामीण भागात शनिवार पासून दिवसभर ढगाळ वातावरण होते यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली पिकांचा बचाव करण्यासाठी शेतकर्‍यांना कसरत करावी लागली. सुगीच्या कामांना ब्रेक लागत असून दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. हवेतील उष्णता वाढ होऊन दमट वातावरण पसरले आहे.        चार दिवसांपासून ग्रामीण भागात उन्हाळी वातावरण तयार झाल्याने तालुक्यातील शेतकरी सुगीच्या कामांमध्ये गुंतले आहे. भात कापणी ची कामे त्याचबरोबर ऊस तोडणी ची कामे या मध्ये पावसाने मध्येच खो घातला आहे. गेली तिने दिवस झाले ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. पावसाच्या तुरळक सरी काही भागात हजेरी लावली यामुळे भात कापून टाकलेल्या शेतकऱ्यांचे धाबे दणाणले. कापून टाकलेल्या पिकाचा पावसापासून बचाव करण्यासाठी कसरत करावी लागेल शेतकरी कुटुंबियांचा पहाटेपासून शिवारात दाखल झाले होते पसरलेले पिंजार एकत्र करून गंजी घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. क...

वसंतदादांना महाराष्ट्र विसरला!

Image
मधुकर भावे आज वसंतदादांची १0४ वी जयंती. वसंतदादांचा जन्म १९१७. यशवंराव चव्हाणांचा जन्म १९१३, वसंतराव नाईकांचा जन्म १९१३, शंकरराव चव्हाण यांचा जन्म १९२0 महाराष्ट्राचे चारही मोठे नेते असे पाठोपाठ होते. यशवंतराव चव्हाणांची जयंती-मयंती... शरद पवारसाहेबांमुळे साजरी होते. वसंतराव नाईक साहेबांचा कार्यक्रम पुसदपुरता मर्यादित होतो. शंकररावांचा नांदेडपुरता.. वसंतदादाची जयंती किंवा स्मृतीदिन यशवंत हाप्पे यांच्या निष्ठेमुळे साजरा होतो, दहा माणसं जमत नाहीत. यावर्षी माजी राज्यपाल डी.वाय.दादा आले. विधानसभेचे सचिव भागवत आले. पण दादांना महाराष्ट्र नक्कीच विसरलाय. शहरं विसरली, ग्रामीण भागही विसरला. सत्तेवर असतानाच उदोउदो करावा.. ज्या नेत्यंनी महाराष्ट्र घडवला, त्यांच विस्मरण महाराष्ट्राल खूप लवकर झालं. दादा तर सगळ्यात उपेक्षित, पण सगळ्यात शहाणा माणूस. सातवीपर्यंत शिकलेला. पण या फार न शिकलेल्या माणसालाच लक्षात आलं की,  महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातली मुलं उच्च शिक्षणाकरीता मुंबई, पुणे, नागपूरात पोहोचू शकत नाहीत. त्यांचे आई-बाप श्रीमंत नाहीत, त्यामुळे त्या मुलांना मणिपालला पाठवता येत नाही....

*ऑल इंडिया चॅम्पियन पै रंगराव पाटील(पेरीडकर) वाढदिवस विशेष लेख*....

Image
..........................  *लेखन- पै अशोक सावंत/पाटील* सोंडोलीकर .............................  माणसाचं व्यक्तिमत्व त्याच्या कर्तृत्वाने उठून दिसत असतं.आपल्या कृतीतून ही मंडळी आपली सहृदयता जपत असतात . *असेच एक सहृदयी व्यक्तिमत्व म्हणजे रंगराव पाटील पेरीडकर*. आज त्यांचा वाढदिवस. *त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक लाख लाख शुभेच्छा*.  वाढदिवसाच्या निमित्ताने एखाद्या व्यक्ती बद्दल चांगलं बोलावं असा अलिखित शिरस्ता. मात्र याला छेद देऊन मी रंगराव पाटील यांच्या विषयी बोलणार आहे. वय ६० च्या आसपास,आणि उच्च शिक्षण  .पण मोठ्या लोकांच्या उठण्या बसण्यातून त्यांना चांगलीच सामाजिक जाण आली आहे. एक मात्र नक्की की एखादी गोष्ट खटकली की ते आजूबाजूला कोण आहे हे बघत नाही. त्यांच्यातील आक्रमक स्वभाव लगेच जागा होतो. *कुठल्याही गोष्टींची तमा न बाळगणारे व्यक्तिमत्व,पण तितकेच हळवे सुद्धा*...    पेरीड म्हटलं की पाटील घराणे, आणि पाटील म्हटलं की त्या घरात पैलवान.....  लहानपणापासूनच अंगात कुस्तीची रग, आणि आवड... बालपणातील काही वर्षे गावाकडे गेली, *मग त्यांनी १९८० साली मठ ताल...

कोणती पुण्ये येती फळाला....

Image
मधुकर भावे ६१ वर्ष झाली असतील. तारीख आठवत नाही.  मार्च १९६२ च्या विधानसभा अधिवेशनाचा तो काळ. विधानसभेच्या निवडणुका होवून गेल्या होत्या. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाल्यामुळे १९५७ च कॉंग्रेस विरोधातल वातावरण यशवंतरावांच्या नेतृत्वामुळे निवळलं होतं. कॉंग्रेसला बहुमत मिळालं होतं. एकूण २६४ जागांपैकी कॉंग्रेसला २१५ जागा मिळाल्या. यशवंतराव पुन्हा मुख्यमंत्री झाले. बाळासाहेब भारदे विधानसभा अध्यक्ष. कृष्णराव धुळप विरोधी पक्षनेते. एदलाबाद मतदारसंघातून (आताचा मुक्ताईनगर) श्रीमती प्रतिभाताई पाटील प्रथमच आमदार म्हणून निवडून आल्या होत्या.    त्या पदवीधर झाल्यानंतर त्यावेळचे नेते सोनूूसिंगआण्णा पाटील यांनी त्यांना राजकारणात येण्याच आग्रह केला  (पुढे हेच सोनूसिंगअण्णा मोरारजी देसार्इंच्या मंत्रीमंडळात गृहराज्यमंत्री झाले होते.) सोनूसिंगआण्णानीच प्रतिभातार्इंना निवडणूक लढविण्यापूर्वी यशवंतरावांची भेट घ्यायला सांगितलं होते. यशवंतरावांची भेट झाल्यावर या सुविद्य भगिनीला यशवंतरावांनी कॉंग्रेस संबंधात काही प्रश्न विचारले, जवळपास दहा मिनीटे प्रश्न विचारत होते. ताई सांगत होत्य...

हा ‘निकाल’ कशाची सुरुवात...

Image
मधुकर भावे लोकसभेच्या ३ आणि विधानसभेच्या २९ जागांच्या पोटनिवडणुकीचे निकाल लागले. भाजपासाठी ते धक्कादायक आहेत. हवा बदलते आहे. देशपातळीवर मोदी, शहा, महाराष्ट्राच्या पातळीवर देवेंद्र फडणवीस आणि चंपा यांचे खिसे कितीही मोठे असले तरी, त्यात आता हे निकाल मावत नाहीत. महाराष्ट्रात देगलूरची जागा ४0 हजार मतांच्या फरकाने जिंकली. महाराष्ट्र भाजपाची सगळी ताकद आणि सगळी आर्थिक शक्ती देगलूरात ओतली गेली. ‘देगलूरचं पंढरपूर करु’ अशी भाषा होती. झाल उलट.. अशोक चव्हाण आणि त्यांच्या टीममुळे मोठा विजय मिळाला. भाजपाचे हरलेले उमेदवार दाभणे २0१९ च्या निवडणुकीत शिवसेनेकडून उभे होते, तेव्हा कॉंग्रेसच्या अंतापूरकर यांनी त्यांना पराभूत केले होते.  सेना सोडून ते भाजपामध्ये गेले. मध्यंतरी आमदार अंतारपूरकर कोरोनामुळे स्वर्गवासी झाले. त्यांच्या मुलाने भाजपामध्ये गेलेल्या दाभणेंना  पराभूत केले आहे. आता चंद्रकांत पाटील म्हणू शकतील की, ‘अशोक चव्हाणसारखे माझ्या खिशात आहेत...’ या लोकांचे खिसे किती मोठे आहेत याची कल्पना नाही. महाराष्ट्रात देगलूर पोटनिवडणुकीत कॉंगे्रस जिंकणारच होती, कारण नांदेडवर अशोक चव्हा...