*ऑल इंडिया चॅम्पियन पै रंगराव पाटील(पेरीडकर) वाढदिवस विशेष लेख*....
..........................
*लेखन- पै अशोक सावंत/पाटील* सोंडोलीकर
.............................
माणसाचं व्यक्तिमत्व त्याच्या कर्तृत्वाने उठून दिसत असतं.आपल्या कृतीतून ही मंडळी आपली सहृदयता जपत असतात . *असेच एक सहृदयी व्यक्तिमत्व म्हणजे रंगराव पाटील पेरीडकर*. आज त्यांचा वाढदिवस. *त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक लाख लाख शुभेच्छा*.
वाढदिवसाच्या निमित्ताने एखाद्या व्यक्ती बद्दल चांगलं बोलावं असा अलिखित शिरस्ता. मात्र याला छेद देऊन मी रंगराव पाटील यांच्या विषयी बोलणार आहे. वय ६० च्या आसपास,आणि उच्च शिक्षण .पण मोठ्या लोकांच्या उठण्या बसण्यातून त्यांना चांगलीच सामाजिक जाण आली आहे. एक मात्र नक्की की एखादी गोष्ट खटकली की ते आजूबाजूला कोण आहे हे बघत नाही. त्यांच्यातील आक्रमक स्वभाव लगेच जागा होतो. *कुठल्याही गोष्टींची तमा न बाळगणारे व्यक्तिमत्व,पण तितकेच हळवे सुद्धा*...
पेरीड म्हटलं की पाटील घराणे, आणि पाटील म्हटलं की त्या घरात पैलवान.....
लहानपणापासूनच अंगात कुस्तीची रग, आणि आवड... बालपणातील काही वर्षे गावाकडे गेली, *मग त्यांनी १९८० साली मठ तालीम कोल्हापूर येथे प्रवेश घेतला,शिक्षण आणि कॉलेज चा त्यांनी अगदी बरोबर मेळ बसवला*.. कोल्हापूर मध्ये शाहु महाविद्यालय येथे त्यांनी शिक्षण घेतले आहे, *आणि विद्यापीठामार्फत ते ऑल इंडिया चॅम्पियन सुद्धा झाले आहेत.त्यानंतर १९८५ साली त्यांची ५२ किलो वजनी गाटातुन राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती*...
आणि महाराष्ट्राला अहमदनगर येथून त्यांनी कांस्य पदक सुद्धा पटकावले आहे. *सर्जेराव पाटील, शिवछत्रपती विजेता, राष्ट्रीय विजेता, कर्णेल सिंग, गजानन हाकमोडे सारख्या तगड्या मल्लांना त्यांनी आस्मान दाखवले आहे*.
*हे सर्व करत असताना कुस्तीत आपला दबदबा निर्माण केला* रंगराव पाटील हे उंचीने लहान पण कुस्तीत धरील तिथे डाव,डोक्यात डावाचे चॅनेल असणारा पैलवान म्हणून त्यांची पंचक्रोशीती ख्याती होती.त्यानंतर रंगराव पाटील मुंबईला रवाना झाले, मुंबईत पण कुस्तीचे प्रॅक्टिस कायम होते, *अनेक स्पर्धा त्यांनी निर्विवाद लढल्या आहेत आणि त्यातूनच पाटील नावाचा दबदबा कायम ठेवला आहे*..
कालांतराने कुस्ती थांबली. *ऑल इंडिया चॅम्पियन असणारे हे पैलवान मुंबईत ठाणे महापालिकेने दत्तक म्हणून रंगराव पाटील यांना घेतले*. त्यानंतर ते ठाणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे कुस्ती कोच म्हणून कार्यरत आहेत शिवाय *ठाणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे मार्गदर्शक म्हणून ते कार्यभार सांभाळत आहेत*.. शिवाय ठाणे महापौर कुस्ती स्पर्धेचे तगडे नियोजन आपल्या जिवाभावाच्या लोकांच्या बरोबर रंगराव पाटील यांच्याकडे असते. तसेच ते उत्तम कुस्ती कोचिंग सुद्धा करतात. मैदानी कुस्तीतले तर आरपार पंच म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. एखाद्या मैदानावर त्यांची पंच म्हणून नियुक्ती झाली तर ते दोन्ही पैलवानांना न थांबता कुस्ती करा म्हणून वारंवार समज देत असतात.. वरील मोठ्या कुस्तीत त्यांची सरपंच म्हणून नेमणूक असते.
अशा या मुर्ती लहान पण किर्ती महान असणार्या सहृदयी व्यक्ती मत्वाचा आज वाढदिवस त्यांना *कुस्ती हेच जीवन महासंघ महाराष्ट्र राज्य* कडून वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा....
--------------------------------
धन्यवाद
*पै अशोक सावंत/पाटील* कुस्ती संघटक
*कुस्ती हेच जीवन महासंघ महाराष्ट्र राज्य*
अध्यक्ष शाहुवाडी तालुका
मो. 9702984003
Comments
Post a Comment