चालु वर्षी २९ नोव्हेंबर २०२१ रोजी होणार्या सोंडोली गावची यात्रा नाईकबा देवाच्या सुशोभिकरणासाठी छोट्या प्रमाणात घेण्याचा ग्रामस्थांचा निर्णय*..

*चालु वर्षी २९ नोव्हेंबर २०२१ रोजी होणार्या सोंडोली गावची यात्रा नाईकबा देवाच्या सुशोभिकरणासाठी छोट्या प्रमाणात घेण्याचा ग्रामस्थांचा निर्णय*..
............................. 
✍ *लेखन पै अशोक सावंत/ पाटील*- सोंडोलीकर
.............. 
     या वर्षी सोंडोली गावची नाईकबा देवाची यात्रा नाईकबा देवाच्या अनेक वर्षे *प्रलंबित सुशोभीकरणाच्या कामासाठी* छोट्या प्रमाणात करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. *गावातील लोकांच्या उपस्थितीत रविवार दिनांक २८ डिसेंबर २०२१ रोजी रात्री ११ वा नाईकबा देवाचा छबिना निघणार आहे*. 

   सोंडोली गावच्या *नाईकबा देवाच्या सुशोभिकरणासाठी अंदाजे ४ ते ५ लाख रुपये* खर्च अपेक्षित आहे, आणि मंदिर सुशोभीकरणाला लोकांनी चालु वर्षी प्राधान्य देऊन यात्रेसाठी येणारा दुसरा खर्च टाळण्यासाठी कुस्ती मैदान तसेच तमाशा रद्द करण्यात आला आहे.. 

 मंदिराच्या सुशोभिकरणाच्या कामाची सुरुवात झाली आहे, आणि लवकरच मंदिर परिसर सुसज्ज होणार आहे. या कामासाठी सढळ हाताने देणगी सुद्धा येत आहे, देणगीदारांचे ग्रामस्थांच्या वतीने मनापासून आभार... 
       सोंडोली गावची यात्रा म्हणजे पंचक्रोशीतील लोकांना एक पर्वणीच असते. आदल्या दिवशी  देवाचा रुबाबदार असा छबिना निघत असतो, आणि सासनकाठी नाचवण्यासाठी तरुण वर्गाची झुंबड ऊडत असते. दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवार हा नाईकबा यात्रेचा मुख्य दिवस असतो. 

    खासकरून सोंडोली गावच्या यात्रेला गावातील मुंबईवाले ८० टक्के उपस्थित असतात गाववाले , मुंबई वाले एकत्रित पणे कोणतेही राजकारण मद्ये न आणता यात्रा पार पाडत असतात 
आजुबाजूच्या परिसरातील लोकांना दिवाळी नंतर येणारी सोंडोली गावची यात्रा याची चाहुल असते, कुस्ती शौकिन एकमेकांना विचारपुस  करतात कधी आहे सोंडोली गावची यात्रा.. कारण या यात्रेपासुन भागातील सर्व यात्रेंना प्रारंभ होत असतो. *पण चालू वर्षी मंदिर सुशोभीकरणाचे काम करायचे असल्याने त्यावर थोडे विरझन पडणार आहे*. 
पण मंदिराचा सुशोभीकरणाचा पण विषय महत्त्वाचा आहे, हेच योग्य समजून गावातील सर्व लोकांनी या विषयावर चर्चा करुन हा निर्णय घेतला आहे. 
चालु वर्षी जरी कुस्ती चे मैदान रद्द झाले असले तरी *पुढील वर्षी मोठे कुस्ती मैदान होईल अशि अपेक्षा करू. हिच नाईकबा चरणी प्रार्थना*.
•••••••••••••••••••••••••
धन्यवाद
*पै अशोक सावंत/ पाटील* कुस्ती संघटक
*कुस्ती हेच जीवन महाराष्ट्र राज्य*
अध्यक्ष शाहुवाडी तालुका
९७०२९८४००६

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*