*चालु वर्षी सोंडोली गावची यात्रा छोट्या प्रमाणात पण उत्साहात संपन्न*...
*चालु वर्षी सोंडोली गावची यात्रा छोट्या प्रमाणात पण उत्साहात संपन्न*...
-----------------------------
सोंडोली ता शाहुवाडी येथील नाईकबा देवाची यात्रा सोमवार दि २९ नोव्हेंबर रोजी *छोट्या प्रमाणात का होईना पण उत्साहात पार पडली*.
यावर्षी मंदिर सुशोभीकरणाचे काम चालू असल्यामुळे छोट्या प्रमाणात यात्रा घ्यायची असे ग्रामस्थांनी ठरवले.
आदल्या दिवशी रविवारी रात्री ११ वाजता *नाईकबा देवाचा छबिना अगदी सर्व गावातील सर्व लोकांच्या साक्षीने अगदी दिमाखात पार पडला*.
कुस्ती मैदान मंदिर सुशोभीकरणाचे कामामुळे रद्द करण्यात आले होते, पण *गावातील ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन छोटे कुस्ती मैदान घेऊन सोंडोली गावची कुस्ती परंपरा अखंडित ठेवली*. प्रशस्त अशा आखाड्यात १५ ते २० चटकदार अशा कुस्त्या मैदानावर पार पडल्या.
गावातील सर्व ग्रामस्थांनी चालु वर्षी मंदिर सुशोभीकरणाला प्राधान्य देऊन एक मोठे काम केले आहे. मंदिर परिसर सुसज्ज करुन नाईकबा देवाच्या परिसराची जागा सुद्धा सुसज्ज होणार आहे.. नाईकबा देवस्थान हे नवसाला पावणारे देवस्थान म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. *पंचक्रोशीतुन अनेक लोकांचा नाईकबा देवाच्या दर्शनासाठी ओघ असतो*.
............................
धन्यवाद
Comments
Post a Comment