*जनसामान्यांचे युवा नेतृत्व!*
*शिराळा तालुक्यातील युवा आणि अभ्यासु व्यक्ति मत्व असणारे, सर्व सामान्यांचे नेते मा. सत्यजित (भाऊ) देशमुख वाढदिवस विशेष*
***********
✍️ *पै मनोज मस्के*- मांगरुळ
.................
उच्च शिक्षित, शांत व संयमी, सामान्य माणसांबद्दल आपुलकी व मदत करण्याची भावना असणारे युवा नेते म्हणजे *मा.'सत्यजित देशमुख भाऊ'.* आणि त्यांचा आज वाढदिवस आहे....
नेहमी हसत मुख असणारे भाऊ, कोणताही तणाव चेहर्यावर नाही. वडीलांच्या निधनानंतर थोडेच दिवसात आईचे ही छत्र हरपले, तरीही आईवडीलांच्या दुःखद निधनानंतर जनताच आपले कुटूंब समजून भाऊंनी आपले वैयक्तिक दुःख बाजूला ठेऊन *समाजसेवेच्या नविन पर्वाला सुरवात केली*.
सर्वसामान्य लोकांना भेटून त्यांच्या अडीअडचणी समजावून घेणे, त्यांना आपल्याकडून होत असणारी मदत करणे या गोष्टीकडे त्यांनी सातत्याने लक्ष दिले. अनेकांच्यावर आदरणीय देशमुख साहेबांनी केलेले उपकार कित्येक कार्यकर्ते विसरले, भाऊंचा पडता काळ नजरेत येताच त्यांनी भाऊंची साथ सोडली, पण भाऊ त्यामुळे थांबले नाहीत. वडीलांच्या पश्चात त्यांनी आपले व्यवसाय संभाळले असते तरीसुद्धा बक्कळ पैसा मिळवला असता. परंतू तसे काही न करता भाऊंनी साहेबांच्यावर प्रेम करणार्या लोकांच्यासाठी या सर्वच सुखसोयी बाजूला सारून समाज सेवेचे व्रत अखंडीतपणे सुरू ठेवले. *काही कट्टर कार्यकर्त्यांनी भाऊंचा हात घट्ट पकडला व मजबूतीने त्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला*. अनेक दु:खाचे डोंगर बाजूला सारत भाऊंनी पुढे चालायचे मनाशी ठरवले. येईल त्या संकटाला तोंड देऊन पुढे चालायचे ठरविले. आपले काम चांगले असले की यश नक्की मिळते हे *साहेबांचे वाक्य भाऊंच्या मनासी पक्के होते*.
भाऊ काँग्रेस सोडून जरी भाजपात गेले तरी नवीन पक्ष प्रवेशाने खचून गेले नाहीत. काँग्रेस पक्षातल्या काही चुकीच्या वागणुकीमुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागला असं त्यांचं मत आहे. काहींना हा निर्णय चुकीचा वाटला असेल परंतू पुर्ण विचार करून घेतलेल्या निर्णयावर लोकांनी विश्वासाने साथ दिली. एकामागून एक असे दुःखाचे डोंगर पार करत भाऊंनी आपल्या *असंख्य कार्यकर्त्यांसोबत वाटचाल चालू ठेवली*
बदललेल्या युगाप्रमाणे बदलणे जरी गरजेचे असले तरी आदरणीय देशमुख साहेबांनी घालून दिलेल्या विचारांच्या बाहेर जायचे नाही हे भाऊंनी मनाशी पक्के ठरविले होते. आपला कार्यकर्ता आजही आपल्या सोबत ठामपणे विश्वासाने उभा असल्यामुळेच देशमुख साहेबांच्या नंतर आपण राजकारणात उभा राहू शकलो *हे सांगायला भाऊ संकोच करत नाहीत*.
भाऊ तसे इतिहासाचे अभ्यासक आहेत. त्यांना इतिहास हा विषय खूपच आवडीचा आहे. माणूस कितीही मोठा झाला तरी त्याने मागे वळून पाहणे तितकेच गरजेचेे आहे अशी त्यांची धारणा आहे.
आज सत्यजित भाऊ जिल्हा बँकेचे संचालक झाले उद्या ते आमदारही होतील यात तिळमात्र शंका नाही, कारण भाऊंच्यावर प्रेम करणारे मावळे हे मागे हटणारे मावळे नसून ते कट्टर देशमुखप्रेमी मावळे आहेत. कट्टरता त्यांच्या रक्तातच आहे. त्यातच अगदी देशमुख साहेबांच्या प्रमाणेच भाऊंचे वागणे असल्याने *देशमुख साहेब आपल्यातून गेले असे कार्यकर्त्यांना वाटत सुद्धा नाही*. प्रत्येक गावात किमान पाच- पंचवीस कार्यकर्त्यांना भाऊ अचूक नावाने हाक मारतात, त्यांच्या खांद्यावर हात ठेवतात, त्यांची विचारपूस करतात. प्रत्येक कार्यकर्त्याच्या परिस्थितीचा भाऊंना बरोबर अंदाज असतो. भाऊ गाडीतून जात असताना सुद्धा समोरच्या काचेतून कार्यकर्ता दिसला तरी दोन्ही हात वर करून त्याला नमस्कार करतात, अगदी साहेबांच्या प्रमाणे भाऊ पोत्यावर सुद्धा बसून गरीबाच्या घरातील मीठभाकर आवडीने खातात. भाऊ शेतात तर शेतात जाऊन कार्यकर्त्यांना भेटतात. त्यामुळे *जिल्हा बँकेची निवडणूक तर जिंकलीच पण येणारी आमदारकीची निवडणूक ही भाऊ सहज जिंकतील* असा कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. कारण कार्यकर्ता हाच भाऊंचा श्वास आहे. कार्यकर्त्यांच्या खांद्यावर हात टाकणारा आणि मित्राप्रमाणे बोलणारा, प्रत्येक गोष्ट ऐकून आणि समजून घेणारा हा नेता भावी आमदार असावा असे प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आहे. आणि सर्वांची ही ईच्छा लवकरच पूर्णत्वास जाईल एवढीच माफक अपेक्षा..... सत्यजित भाऊंना येणारे आयुष्य शतायुषी आणि निरोगी मिळो याच त्यांना वाढदिवसाच्या शब्दरुपी शुभेच्छा*......
"" "" "" "" "" "" """"" "" "
*पै मनोजकुमार मस्के* -
9890291065
Comments
Post a Comment