ढग आले दाटून! वैरण घे झाकुन...

ढगाळ वातावरणामुळे शेतकरी धास्तावले कामे झाली ठप्प पिके धोक्यात...

चिखली -मनोजकुमार मस्के

महापुराचे सावट दूर झाले पाठोपाठ सुगीची लगबग सुरू असतानाच पावसाळी वातावरण तयार झाले आहे. ग्रामीण भागात शनिवार पासून दिवसभर ढगाळ वातावरण होते यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली पिकांचा बचाव करण्यासाठी शेतकर्‍यांना कसरत करावी लागली. सुगीच्या कामांना ब्रेक लागत असून दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. हवेतील उष्णता वाढ होऊन दमट वातावरण पसरले आहे.
       चार दिवसांपासून ग्रामीण भागात उन्हाळी वातावरण तयार झाल्याने तालुक्यातील शेतकरी सुगीच्या कामांमध्ये गुंतले आहे. भात कापणी ची कामे त्याचबरोबर ऊस तोडणी ची कामे या मध्ये पावसाने मध्येच खो घातला आहे. गेली तिने दिवस झाले ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. पावसाच्या तुरळक सरी काही भागात हजेरी लावली यामुळे भात कापून टाकलेल्या शेतकऱ्यांचे धाबे दणाणले. कापून टाकलेल्या पिकाचा पावसापासून बचाव करण्यासाठी कसरत करावी लागेल शेतकरी कुटुंबियांचा पहाटेपासून शिवारात दाखल झाले होते पसरलेले पिंजार एकत्र करून गंजी घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही शेतकऱ्यांनी भात पिकांची मळणीची कामे सुरू केली होती त्यांनाही पावसापासून पिकांचा बचाव करताना कसरत करावी लागेल. प्लास्टिक चा वापर करून पिकांचा बचाव करण्यात आला. बहुतांशी भात पिके कापणीला आली आहेत पावसाळी वातावरण तयार झालेने शेतीची कामे खोळंबली आहेत. पावसाने हजेरी लावल्या याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे भात पीक झडण्याची शक्यता आहे. परिणामी शेतकऱ्यांकडून धावपळ करण्यात येत आहे पश्चिम भागात शेतीची कामे चालू असतानाच पावसाने हजेरी लावल्याने पिकाला फटका बसण्याची शक्यता शेतकर्‍यांतून वर्तवण्यात येत आहे. पावसाच्या उघडीपीची प्रतीक्षा शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

चौकट
तालुक्यातील वातावरण शुक्रवारी पहाटेपासून पूर्णपणे बदललेली आहे. ढगाळ वातावरण निर्माण झाले असून दिवसभर सूर्याची दर्शन झालेले नाही. कमी होऊन हवेत गारवा निर्माण झाला याचा फटका चुकीच्या कामांना बसला आहे शेतीची कामे झाली आहे.




Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*