शेतीला शेतमजूर मिळेनात.....
मनोजकुमार मस्के पूर्वीपासूनच शिराळा तालुका कोकण पट्टा व प्रामुख्याने भात शेतीचा भाग असं म्हटलं जातं. सागाव, चिखली, नाटोली यासह संपूर्ण वारणा पट्ट्यात प्रामुख्याने भात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. जुन्या काळापासून शिराळा येथील भात जगप्रसिद्ध आहे पूर्वी तालुक्यात जलसिंचनाची प्रभावी सुविधा नव्हती. त्यामुळे पावसाच्या जोरावर येणारे भात पीक घेण्यास शेतकऱ्याचा जोर होता. परंतु अलीकडे शेतकऱ्यांना भात शेती करण्यास खूप त्रास होऊ लागलाय. शेती बि-बियाणे, खत यांच्या वाढलेल्या किमती, भात शेती करण्यासाठी लागणारे मजूर मिळणे कठीण झाल्याने अनेक शेतकऱ्यांना शेती करणे परवडनासे झाले आहे. खऱ्या अर्थाने भातशेती करण्यासाठी नांगरणी, पेरणी, लावणी, कापणी, मळणी,व झोडपणी ही कामे करण्यासाठी शेतमजुरांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. त्याचबरोबर बी-बियाणे संकरित वापरल्यास जवळपास १०० रुपये किलोने घ्यावी लागते. खत वापरावे लागते. युरिया खत सरकारी दराने मिळते पण शेतीला अनेक वर्षापासून अनेक विविध खतांची सवय लावल्याने जमिनीचा कस वाढविण्यासाठी मिश्रण दाणेदार खते वाप...