*ज्यावर्षी पक्ष स्थापन त्याचवर्षी पक्ष सत्तेत*... *देशातला पहिला पक्ष आणि देशातला पहिला नेता*...

*ज्यावर्षी पक्ष स्थापन त्याचवर्षी पक्ष सत्तेत*...  
*देशातला पहिला पक्ष आणि देशातला पहिला नेता*... 

मधुकर भावे/उत्तर-दक्षिण

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आज (१० जून) 
२२ वाढदिवस आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातून गेल्या २२ वर्षांत कोणालाही राष्ट्रावादीला वगळता आलेले नाही. १० जून १९९९ रोजी शरद पवार साहेब यांनी या पक्षाची स्थापना केली आणि १ नोव्हेंबर १९९ रोजी हा पक्ष महाराष्ट्रात सरकारात सत्तेत आला. पक्ष स्थापन झाल्यापासून सत्तेत येईपर्यंतचा काळ फक्त ४ महिन्यांचा आहे. ज्यावर्षी पक्ष स्थापन झाला, त्याचवर्षी पक्ष सत्तेत आला! हे महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण आणि देशातलसुध्दा. जनता पक्ष १९७७ साली स्थापन झाला आणि त्याचवर्षी सत्तेत आला. पण तो ‘एक पक्ष’ नव्हता १० पक्ष एकत्र होते. अडीच वर्षांत ते सर्व पक्ष फुटले. राष्टÑवादी कॉंग्रेस पक्षाचे विशेष असे की, २२ वर्षांत जवळपास १६ वर्षे हा पक्ष सत्तेत आहे. १९९९ ते २००४ , २००४ ते २००९ आणि २००९ ते २०१४ अशी सलग १५ वर्ष हा पक्ष सत्तेत राहिला. २०१४ ते २०१९ ही पाच वर्ष वजा केली तर. २२ वर्षांपैकी १६ वर्षे या पक्षाला सत्ता मिळवता आली आहे. भले ते आघाडीचे सरकार असेल, मुख्यमंत्रीपद या पक्षाला मिळालेल नसेल, तरीही सरकारातलं पक्षाच वर्चस्व तेव्हाही निर्विवादपणे राष्ट्रवादीतच होतं आणि गेल्या दीड वर्षांत (२८ डिसेंबर २०१९ पासून १० जून २०२१ पर्यंत) जे महाआघाडीचं सरकार आहे. त्या सराकारतही दबादबा असलेला पक्ष राष्ट्रवादीच आहे. कॉंग्रेस हा महान पक्ष आहे, देशातल्या स्वातंत्र्याचा लढा कॉंग्रेसने लढवला. पण पक्षाची स्थापना 
२८ डिसेंबर १८८५ झाल्यावर सत्तेत येण्याकरीता (प्रांतिक सरकार मर्यादित अधिकाराची) १९३७ सालं उजाडावे लागले म्हणजे ५२ वर्षे लागली. द्रमुक पक्ष तामिळनाडूमध्ये (जुन्या मद्रास राज्यात) 
१७ सप्टेंबर १९४९ साली स्थापन झाला. करुणानिधींचे पहिला द्रमुक सरकार यायला  १८ वर्षे (१९६७) लागली. आंध्रमधला तेलगु देसम पक्ष २९ मार्च १९८२ रोजी स्थापन झाला. एन.टी.रामाराव यांना १६ आॅगस्ट १९८४ दोन वर्षे लागली. इतिहासाची पानं उलटली तर असे अनेक संदर्भ मिळतील. राष्टÑवादी कॉंगे्रेसच वैशिष्ट्य हेच आहे की, ज्या वर्षी स्थापना त्यावर्षी सत्ता. असं उदाहरण सापडायचं नाही. 
संघटना बांधण, नवीन पक्ष स्थापन करणं, पक्ष चालविणारी यंत्रणा निर्माण करणं, सत्ता मिळाल्यानंतर सत्तेमध्ये जबाबदारीनं आणि प्रभावीपणे प्रशासन चालवता येईल अशी टीम तयार करणं ही सगळी कामं एकाचवेळी एका प्रचंड नेतृत्वानं करुन दाखवली, त्या नेत्यांच नाव श्री. शरद पवार. छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना या २० वर्षांत शरद पवार साहेबांनी घडवले, सत्तेत बसवले आणि त्यातून प्रभावी नेतेही निर्माण केले. काही माणसं त्यांना सोडून गेली. काही नव्याने आली, येणारे-जाणारे अदलत बदलत राहीले तरी पवारसाहेबांच्या पक्षाला सत्ता मिळविण्यापासून  कोणालाही रोखता आले नाही. जे पवारसाहेबांसोबत राहीले तोच फौजफाटा घेऊन पवारसाहेबांनी हा करीष्मा करुन दाखवलेला आहे. १९९९ साली विधासभा निवडणुकीत कॉंग्रेसची त्यांच््या पक्षाची  आघाडी झाली नव्हती. १९९९ ची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे दोन पक्ष एकत्र आले. विलासराव मुख्यमंत्री झाले. २००४ आणि २००९ या दोन विधानसभा निवडणुकीत आघाडी झाली, दोघांचं सरकार पुन्हा स्थापन झालं. विलासराव पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले. या सर्ववेळी उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे होत.  २०१४ ला आघाडी न करण्याची चूक दोघांनीही केली. दोघांचे मिळवून ६७ उमेदवार ५०० ते  १००० मतांच्या फरकाने पडले. पुरोगामी महाराष्ट्राच सरकार भाजपाच्या घशात गेलं. २०१९ ला केवळ आणि केवळ पवारसाहेबांच्या नेतृत्वामुळे महाआघाडीचं सरकार आज स्थापन झालेलं आहे. शिवसेनेशी राजकीय सलोखा नसतानाही, केवळ ‘भाजपा नको’ याच एका मुद्यावर तीन पक्ष एकत्र आले. भाजपाने कितीही आदळआपट केली तरी त्यांना महाआघाडीतले आमदार फोडला आलेले नाहीत आणि केंद्रात भाजपाचे सरकार असताना महाराष्टÑातलं महाआघाडीचं सरकार पाडायची त्यांची हिंमत झालेली नाही. याच शे्रयही मोठ्या प्रमाणात शरद पवार यांना आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मोदी-शहा महाराष्टÑात जिथेजिथे प्रचाराला गेले तिथे तिथे भाजपाला आपटी मिळाली. पावसात भिजणाºया सह्याद्रीने महाराष्टÑातल फडणीसांच्या मागे १०४ आमदार असताना हात चोळीत बसावे लागले, सत्तेपासून त्यांना दूर रहावं लागलं. या सर्व राजकीय बुध्दीबळाच्या डावाचे सूत्रधारही शरद पवार हेच होते. कर्नाटक असेल किंवा मध्यप्रदेश असेल, भाजपाने आमदार फोडून तिथे आपली सरकारं आणली. महाराष्टÑात तो प्रयोग यशस्वी होत नाही, त्याच कारणं महाराष्टÑाला माहित आहे, देशाला माहित आहे शरद पवार हेच आहेत. 
शेवटचा मुद्दा
८२ वर्षांचे शरद पवार ६५ वर्षे राजकारणात आहेत. ताठ कण्याने उभे आहेत. कॉंग्रेसशी त्यांचा संघर्ष झाला तरी,  कॉंग्रेसचा ते द्वेष करत नाहीत. विरोधी पक्षातल्या नेत्यांचा द्वेष त्यांनी कधी केला नाही. यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्टÑातील सुसंस्कृत राजकारण पवारसाहेबांनीच महाराष्टÑात पुढे नेलं. जे त्यांच्यासोबत नाहीत, त्यांनाही त्यांचे आधार शरद पवार हेच वाटतात, शरद पवारांचे मोठेपण यातच दडलेलं आहे.  आता पुढची तीन वर्ष हे सरकार चालवून महाराष्टÑात पुन्हा भाजपाला सत्तेवर येऊ न देण्याची जबाबदारी जशी तिन्ही पक्षांवर आहे. या तिनही पक्षांच्या या भूमिकेचे कर्णधारही शरद पवार हेच आहेत. पुरोगामी महाराष्टÑात भाजपाचा पुन्हा शिरकाव होता कामा नये म्हणून शरद पवार यांनाच पुन्हा नेतृत्व करावं लागेल. 
त्यांच्या पक्षाला आणि त्यांना शुभेच्छा... 
सध्या ऐवढेच. 


साल १९९९
लोकसभा विधानसभा
राष्टÑवादी ६ राष्टÑवादी ५८
कॉंग्रेस १० कॉंग्रेस ७५

साल २००४
लोकसभा विधानसभा
राष्टÑवादी ९ राष्टÑवादी ७१
कॉंग्रेस १३ कॉंग्रेस ६९

साल २००९
लोकसभा विधानसभा
राष्टÑवादी  ८ राष्टÑवादी ६२
कॉंग्रेस १७ कॉंग्रेस  ८२

साल २०१४
लोकसभा विधानसभा
राष्टÑवादी ४ राष्टÑवादी ४१
कॉंग्रेस २ कॉंग्रेस ४२

साल २०१९
लोकसभा विधानसभा
राष्टÑवादी ४ राष्टÑवादी ५४
कॉंग्रेस १ कॉंग्रेस ४४

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*