काय होतीस तू काय झालीस तूलाल परीचा प्रवास दुरावस्थेच्या वळणावर

काय होतीस तू काय झालीस तू

लाल परीचा प्रवास दुरावस्थेच्या वळणावर
मनोजकुमार मस्के -

अलीकडे एसटीची अवस्था एकाद्या पाने गळुन पडलेल्या झाडाप्रमाणे झाली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेच्या टाईमींगवर पोहचवणारी, प्रत्येक नोकरदाराला त्याच्या कामाच्या ठीकाणी पोहचवणारी,प्रत्येक शेतकऱ्याला अचुक टाईमावर पोहचविणारी एसटीची आज अवस्था अतिशय बिकट झाली आहे. 
      ऐके काळी मुंबईला ने आण करणारी ही एसटी अनेकठिकाणी दिसेनाशी झाली. पुर्वी एसटी स्टँड गाड्यांनी आणी लोकांनी गजबजलेले असायचे. अनेक फेरीवाले, ऊसाचा रस विकणारे, फळे विकणारे यांचा पोटापाण्याचा प्रश्न सुटत होता. एकेकाळी पोस्टाची पत्र, वर्तमान पत्र, ड्रायवर मामाच्या भरवशावर आईने आपल्या मुलाला पाठविलेली भेट अचुक मिळायची. अभ्यासासाठी शहरात होस्टेलमध्ये असणाऱ्या मुलाला आईने दिलेला डब्बा अगदी टाईंमिंग मध्ये मिळत होता. अनेक प्रवासी खाजगी वाहतुक पेक्षा एसटीवर विश्वास ठेवत होते. अनेक दशके लहानांपासून, जेष्ठ नागरीक, महीला, अपंग,आमदार, पत्रकार याच एसटीने प्रवास करत होते. आज सुद्धा एसटीत आमदार, पत्रकार या सिट लिहलेल्या राखीव आहेत. सत्तेवर येणाऱ्या प्रत्येक सरकारचे या लालपरिवर विशेष लक्ष होते. ड्रायव्हर कंडक्टर यांचे पगार वेळेवर होत होते. आता मात्र पगार होण्याची वाट पहावी लागेते. त्यात नविन गाड्यांचा समावेश न करता जुन्याच गाड्या वापरल्या जातात.  महाराष्ट्रात बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची सत्ता आली त्यावेळी  एसटीचा रंग भगवा करुण  तीला लालपरी असे संबोधण्यात आले.
          खऱ्याअर्थाने उन,वारा,पाऊस याचा कोणताही विचार न करता रस्ते चांगले की, खराब न पाहता प्रत्येक प्रवाशाची सुरक्षा पाहणारी एसटी आज अखेरच्या घटका मोजत आहे. खाजगी गाड्या जीथं पोहचत नाहीत तिथं तिथं या महाराष्ट्राची ही लालपरी पोहचली आहे. यात्रा, सन, गणपतीला तर या सजवलेल्या गाड्या लोकांचे लक्ष वेधून घेत.ड्रायव्हर मामा, कंडक्टर मामा स्वतः गाड्या स्वच्छ करूण त्या विविध रंगाच्या रेबीण लाऊन सजवत असतं.        
           परंतु आज पत्र्याला होल पडलेत त्यातुन पाणी आत येते म्हणून टपावर कागद आणी प्रवाशांच्या जागेवर कोकणातला लाल दगड भरलेला पाहीले की वाटतं काय होतीस तु आणी काय झालीस तू नेमकं कोण दोषी तुझ्या आयुष्याला



बाळासाहेबांच्या शिवसेनेने याच एसटीला भगवा साज चढवला. त्याच एसटीच्या डोक्यावर उद्दवजींच शिवसेना सरकार भगवा फेटा बांधेल का? अनेकांच्या आयुष्यात आनंद फुलवणाऱ्या या एसटीला खरच पुन्हा चांगले दिवस येतील का?

-बाजीराव शेणवी - सर्वसामान्य प्रवासी

जग गरजेच्या नियमानुसार चालत असते थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते. उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो. लाल परी तुझी किंमत तेव्हा होईल जेव्हा तुझी गरज लक्षात येईल. 

-अरूण पाटील- समाजसेवक




Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*