विराज नाईक दादा एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व.,....
मनोजकुमार मस्के
शिराळा तालुक्यातील युवा नेतृत्व म्हणून विराजदादा नाईक यांच्याकडे पाहीले जाते. अत्यंत शांत, संयमी, आणि अभ्यासू व्यक्तीमत्व विराज नाईक यांच्याकडे आहे. कमी वयातच त्यांनी विराज इंडस्ट्रीची जबाबदारी घेऊन ती यशस्वीपणे पार पाडली. आज विराज इंडस्ट्री च्या माध्यमातुन अनेक उत्पादने निर्माण करून ती जगाच्या बाजारपेठेत विकणे ही फार मोठी कसरत असताना देखील विराजदादांनी ती यशस्वी करून दाखवली. प्रत्येकाशी आपुलकीने बोलणे, कर्मचाऱ्यांच्या समस्या ऐकुन घेणे, चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक करणे आशा विविध गुणांच्या मुळे विराजदादा प्रतयेकाला आपलेसे वाटतात.
पुणे येथील विश्वकर्मा ईन्सि्टट्युट आॅफ टेक्नॉलॉजी येथे विराजदादांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली . त्यानंतर लंडन येथे नाॅटिंगहॅम युनिव्हर्सिटी येथुन एमबीए बिझनेस मॅनेजमेंटची पदवी प्राप्त केली . याच शिक्षणाच्या भरवशावर व विराजदादांच्या मेहनतीवर वडील मानसिंगराव नाईक भाऊ यांनी विराज इंडस्ट्रीची जबाबदारी विराजदादा नाईक यांच्यावर सोपविली. आज विराजदादा यांच्या मार्गदर्शनाखाली विराज उद्योग समूह प्रगतीच्या दिशेने झेप घेताना दिसत आहे. तालुक्यातील अनेक तरूणांना विराज उद्योग समुहामुळे रोजगार उपलब्ध झाला आहे. आज शिराळा तालुक्यात तरूणांना व महिलांना सर्वाधिक रोजगार उपलब्ध करुण देणारा विराज उद्योग समुह आहे. शिराळा तालुक्याच्या शेवटच्या टोकापासून महिला याच विराज इंडस्ट्रीत कामासाठी येत असतात. अनेकांची कुटुंबं याच ईंडस्ट्रीच्या जिवावर चालत आहेत.
विराज दादांनी शिक्षण संपवून विराज उद्योगाची जबाबदरी स्विकारली नुसती जबाबदारी स्विकारली नाही तर विराज उद्योग समुहाची झपाट्याने वाढ केली. विराज पशुखाद्य असेल ,विराज सेनिटायझर असेल असे अनेक उत्पादने विराज ईन्डस्ट्री मार्फत होऊ लागले. किंबहुना मार्केट मध्ये विराज ईंडस्ट्री चे नाव होऊ लागले.
कोणताही विषय समजुन घेउन मग प्रतीउत्तर करणे, कोणीही कार्यकर्ता असेल तर त्याच्याशि मनमुराद गप्पा मारणं हे एकाद्या अनुभवी राजकारण्यांना लाजवेल असंच विराज दादांचं काम आहे.
काम करणारी माणसं कमी बोलतात व काम जास्त करतात हे आम्ही अनेकदा पाहिले आहे. परंतु विराजदादा काम तर करतातच पण बोलायला लागले तर समोरच्याची बोलतीही बंद करतात. दादांच्या प्रेमळ स्वभावामुळे कमी कालावधीत व लहान वयात दादांनी मोठा जनसंपर्क वाढविला. शिक्षण संपवून दादा आले तेंव्हा त्यांना तालुक्यात एकही मित्र नव्हता आता मात्र मित्रांचा लोंढाच्या लोंढा येताना दिसतो. आपल्या गोड वाणिने दादांनी तालुक्यात मित्रांची फौज तयार केली.
Comments
Post a Comment