पारंपारिक भातांचे बी काळाच्या पडद्याआड जाण्याच्या मार्गावर...

पारंपारिक भातांचे बी काळाच्या पडद्याआड जाण्याच्या मार्गावर...
-------
वरंगाल, दोडक, टायचन, वांडर या जाती झाल्या नाहीश्या : सुधारित हायब्रीड बियाणांना दिली जातेय पसंती
-------------------------------------- 
मनोजकुमार मस्के  

        शिराळा तालुक्याचा पश्चिम भाग म्हणजे भातपिकांचे व विविध भातांच्या वाणांचे कोठार म्हणून ओळखले जाते. दरवर्षी या भागातील शेतकरी वर्ग धुळवाफ पध्दतीने भात पेरणी करत असतो.
      जरी हा पश्चिम भाग भातपिकाचे आणि विविध भातांच्या वाणांचे कोठार म्हणून ओळखला जात असला तरी सध्याचे वास्तव चित्र मात्र वेगळे आहे.  सध्या शेतकरी सुधारित जातीच्या हायब्रीड बियाणांना पसंती देत असून देशी वाण नाहीशा होताना दिसत आहेत. या  भागातील वरंगाल, दोडग, मोडग, टायचन, वांडरं, जोंधळं अशा अनेक शरीरास पोषक असलेल्या वाणांची भातपिकं येथे घेतली जायचीत परंतु सध्या सुधारित व संकरित वाण उपलब्ध झालेमुळे शेतकरी वर्गाचा ओढा अनेक जातीच्या संकरित बियानाकडे झुकला असून यातून जादा उत्पादन घेऊ लागला आहे. त्यामुळे पारंपारिक वाण नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. 
         बळीराजाला  भातपिकासाठी खूप कष्ट उपसावे लागतं, खूप राबावं लागतं. शिवाय उत्पादन खर्चा पेक्षा नफा कमी, मजुरांची कमतरता या साऱ्यामुळे वर्षाकाठी पुरेल एवढेच सुधारित व संकरित भातपीकाचे उत्पन्न घेऊन, ऊसाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घेतले जात आहे. उसामध्ये सुर्यफुल, मका, भुईमुंग, सोयाबीन यांची अंतरीक पिकंही घेतली जात असून कमी कष्टात  दुहेरी  फायदा मिळत आहे. ऊस पिकांसाठी लागणारे मुबलक पाणी बारमाही वाहणाऱ्या वारणा नदीमुळे कधीही कमी पडत नाही. याशिवाय कालव्यातील पाणी  सायफनव्दारे शेतीला देता येत असल्याने काही शेतकऱ्यांना विद्युतपंपाची आवश्यकताही भासत नाही. यामुळे अपोआपच भरमसाठ प्रमाणावर येणाऱ्या विद्युत बिलाचा खर्चही वाचत आहे. आणि  सर्वात महत्त्वाची बाजू म्हणजे या तालुक्यात सक्षमपणे सुरू असणारे दोन साखर कारखाने व सहकारी सेवा सोसायटींचे व बँकांचे आर्थिक सहाय्य या साऱ्यामुळे येथील शेतकरी वर्गाचा कल ऊस उत्पादन घेण्याकडे दिसून येत आहे.


Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*