एकटे लढा, दुकटे लढा,‘मीच पुन्हा येईन’ वाले सत्तेवर येणार नाहीत, याची खात्री द्या!
एकटे लढा, दुकटे लढा,
‘मीच पुन्हा येईन’ वाले सत्तेवर येणार नाहीत, याची खात्री द्या!
मधुकर भावे उत्तर-दक्षिण
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीला अजून ३ वर्ष ४ महिने आहेत. आॅक्टोबर २०२४ मध्ये महाराष्टÑात विधानसभा निवडणूक होईल. त्यापूर्वी मे २०२४ मध्ये लोकसभेची निवडणूक होईल. तीन वर्षांचा काळ बघता-बघता संपेल हे खरे आहे. त्या निवडणुका महाराष्टÑातला कॉंग्रेस पक्ष स्वबळावर लढवू इच्छित आहे. या निवडणुकांच्या अगोदर होणारी मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवावी. नंतर लोकसभा, विधानसभाही स्वबळावर लढवावी असा आता जाहीरपणे सांगण्यात आलेलं आहे. कॉंग्रेस आमच्यासोबत येत नसेल तर राष्टÑवादी कॉंग्रेस आणि शिवसेना एकत्रपणे निवडणूक लढवतील असं जयंतराव पाटील यांंनी जाहीरही करुन टाकले आहे. त्यामुळे कॉंग्रेस आणि राष्टÑवादीचं पुढच्या निवडणुकीतल धोरण आताच जाहीर झाल्यासारखं आहे. या निवेदनांमुळे सध्या चॅनेलवाल्यांना भरपूर ब्रेकिंग न्यूज मिळत आहेत. कॉंग्रेस आणि राष्टÑवादी किंवा आताच्या महाआघाडी सत्तेतील कॉंग्रेस-राष्टÑवादी आणि शिवसेना असे तीन पक्ष विरुध्द भाजपा अशी लढाई तर नक्कीच होणार आहे. मग महाआघाडीतले तीन पक्ष वेगळे लढले तरी तिघांचा लढा भाजपाशीच आहे. एकत्र लढले तरी तिघांना भाजपाशीच लढायचं आहे. तिकडे केंद्रात महाआघाडीचा प्रयोग सुरु झालेला आहे. पण तो तितकासा शाश्वत नाही आणि भरवशाचाही नाही. देशपातळीवर भाजपाविरोधात ना सर्व राज्यात शिवसेना लढू शकतं, ना राष्टÑवादी लढू शकतं. देशपातळीवरलची दोन राष्टÑीय पक्षांची लढाई म्हणजे भाजपा आणि कॉंग्रेस अशीच आहे. राज्या राज्यात फरक आहे. बंगालमध्ये भाजपाची लढाई तृणमूल कॉंग्रेसशी, ओरिसामध्ये बिजू जनतादलाशी, तामिळनाडूमध्ये द्रमुकशी, केरळमध्ये कम्युनिस्टांशी, आंध्र आणि तेलंगणात तेलगु देसमशी अशा त्या-त्या प्रादेशिक पक्षांशी भाजपाच्या लढाया होणार आहेत. २०१४ आणि २०१९ या निवडणुकातील भाजपाची हवा आणि मोदीची लाट २०२४ साली असणार नाही हे भाजपाही समजून चुकला आहे. आणि मोदी आता अशा उंच टप्यावर उभे आहेत की, तिथुन घसरणच होणार आहे. प्रश्न राष्टÑीय पक्षांशी त्यांची लढाई फक्त कॉंग्रेसशीच आहे. कॉंग्रेस देशव्यापी प्रमाणावर ही लढाई लढायला ज्यावेळी समर्थ होईल त्यावेळी राज्या- राज्यातली कॉंग्रेसही मजबूत झालेली असेल. आज नेमकी अडचण तीच आहे. देशपातळीवरही कॉंग्रेस मजबूत नाही आणि राज्यपातळीवरही कॉंग्रेस मजबूत नाही.
नाना पटोले प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष आहेत. हिंमतवाला तरुण आहे. सगळ्यांना अंगावर घेऊन लढायची धमक आहे पण तरीसुध्दा काही गोष्टींची विचार करण्याची गरज आहे. ५० वर्षापूर्वीची कॉंग्रेस, त्या कॉंग्रेसचे नेतृत्व, त्या नेत्यांवर असलेला लोकांचा विश्वास या सगळ्याच विषयावर कॉंग्रेसची कमालीची पिछेहाट झालेली आहे. तसं पाहिलं तर संपूर्ण महाराष्टÑावर हुकुमत करु शकेल, ज्यांच्या शब्दामुळे लोकं कॉंग्रेसला मत देतील आणि बहुमत मिळेल असा नेता आज कॉंग्रेसजवळ राज्यात नाही आणि देशातही नाही हे समजून घेतले पाहिजे. तो काही नाही या कारणाची चर्चा आज निरर्थक आहे. केवळ कॉंग्रेस नव्हे तर महाराष्टÑात तर कोणत्याही पक्षाचा एक नेता ‘मी बहुमत आणून दाखवतो’ असं हिमंतीन सांगू शकत नाही. भाजपाजवळसुध्दा राज्यव्यापी नेतृत्व आजिबात नाही. त्यातल्यात्यात राज्यव्यापी नेतृत्व आहे ते शरद पवार यांचेच आहे. कॉंग्रेसने या सगळ्या परिस्थितीचा विचार करुन अगोदर मजबुतीनं पक्ष उभा केला पाहिजे. ९ जिल्ह्यात कॉंग्रेसचे अध्यक्ष नाहीत. जवळजवळ ९-१० जिल्ह्यात कॉंगे्रेसचा एकाही आमदार नाही. राष्टÑवादीबरोबर आघाडी करुन २००४, २००९, २०१९ या निवडणुकांमध्ये आघाडी झाल्यामुळे जे मतदारसंघ कॉंग्रेसने राष्टÑवादीला दिले त्या मतदार संघात कॉंग्रेसच कुठेच नाही. ते सगळे पोरके मतदारसंघ आहे. जिथे कॉंग्रेसचे ४४ आमदार निवडुन आले. त्याखेरीज ज्या मतदारसंघात कॉंग्रेसचे उमेदवार पराभूत झाले. त्या मतदारसंघाची स्थिती मजबूतीची नाही. शिवाय कॉंग्रेसचे जे मंत्री आज मंत्रीमंडळात आहेत. त्यापैकी कोणीही महाराष्टÑाचा नेता नाही. त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात ते मजबूत असतील पण पक्षनेता म्हणून मजबूतीने कॉंग्रेस उभी करण्यात गेल्या दीड वर्षांत त्यांनी नेमकं काय केलं हे कोणालाच माहित नाही. कॉंग्रेसचे जे मंत्री आहेत त्या मंत्र्यांनी महाराष्टÑाचे सर्व जिल्हे घुसळून काढले, पक्ष बांधणीसाठी ताकद लावली, कॉंग्रेस कार्यकर्त्यांना ताकद दिली, तालुका - जिल्हा कॉंग्रेस अध्यक्षांशी संपर्क ठेवला, त्यांना सन्मानानं वागवलं त्यांचे फोन घेतले, त्यांना वेळोवेळी मदत केली, असे अजिबात घडलेले नाही. किंबहुना जिल्हा अध्यक्ष आणि कॉंग्रेसचे मंत्री यांची गाठ पडणेच मुश्किल आहे. याच्या नेमकी उलट परिस्थिती राष्टÑवादीची आहे. त्यांच्या मंत्र्यांना फाईलही समजते, कार्यकर्त्याला कशी मदत करावी हे कळते, पक्ष वाढवण्यासाठी कायं करावं हे समजत... कॉंग्रेस मजबूत करण्यापूर्वी कॉंग्रेसच्या मंत्र्यांना दुरुस्त करण्याची गरज आहे. शिवाय नानांला नम्रपणे सांगणे आहे की, गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहीला पाहिजे. १९९९ साली राष्टÑवादीची स्थापना झाली. त्यावर्षीच्या निवडणुकीत कॉंग्रेस, राष्टÑवादी स्वतंत्रपणे लढली. नंतर दोघे सत्तेत येऊन सत्ता स्थापन केली. २००४, २००९ या दोन विधानसभा निवडणुकीत राष्टÑवादीशी आघाडी झाली. २०१४ ला आघाडी झाली नाही. राष्टÑवादीची कॉंग्रेसबरोबर झाली नाही, भाजपाची शिवसेनेबरोबर झाली नाही. चौघेही स्वतंत्रपणे लढले. त्यावेळी कॉंग्रेसला जागा मिळाल्या ४२ आणि राष्टÑवादीला मिळाल्या ४१ दोघे एकमेकांच्या विरुध्द लढले आणि २०१४ च्या निवडणुकीत ७१ विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेस राष्टÑवादी एकमेकांना पाडले.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्टÑवादीची आघाडी झाली. कॉंग्रेस विजयी झाली ४४ जागेवर, राष्टÑवादी ५४ जागेवर राष्टÑवादीचे उमेदवार वाढले १३, कॉंग्रेसचे वाढले फक्त २ आमदार. ४२ चे ४४ झाले.
२०१९ च्या निवडणुकीत देशात मोदी लाट होती. लोकसभेत भाजपाला बहुमत मिळाले. महाराष्टÑात २०१४ ते २०१९ फडणवीसांच राज्य होतं. पण भाजपाला बहुमत मिळवता आलं नाही. १२२ वरुन १०५ वर संख्या आली. बहुमत न मिळाल्यामुळे भाजपाचे राज्य गेले.
आता या स्थितीत दोन मुद्दे आहेत. कॉंग्रेस पक्षांने मजबुतीनं उभ राहीले पाहिजे हे मान्य आहे. प्रत्येक गावात कॉंग्रेस आहे. कॉंग्रेसचा कार्यकर्ता आहे, कॉंग्रेसचा विचार आहे. पण नेते आणि लोक यातलं पडलेले अंतर भरुन कोण काढणार शिवाय, २०१४ च्या निवडणुकीत स्वतंत्र लढल्यानंतर महाराष्टÑात भाजपाचे राज्य आलं. आता पुन्हा तो प्रयोग केला गेला आणि दुर्दैवानं पुन्हा पुरोगामी महाराष्टÑ भाजपाच्या जबड्यात गेला तर, १०० वर्षे आणखी मागे जाईल. स्वतंत्रपणे लढायला हरकत नाही. पण देशाचा आजचा मुख्य शत्रू भाजपा आहे. इतका खोटा पक्ष जगात नाही. ७ वर्षांतल्या मोदी सरकारनं आणि ५ वर्षाच्या फडणवीस सरकारनं लोकांची पूर्ण फसवणूक केली. दरवर्षीचे २ कोटी रोजगार ही घोषणा होती, प्रत्यक्षात लाखो लोकांचे रोजगार गेले. कामगार कपात झाली. विकासदर घटला, महागाई ३०० पटीने वाढली, जीएसटीने, नोटाबंदीने आर्थिक कोंडी केली. खोट्या आश्वासनांचा पाऊस पडला. सामान्य माणसाची घुसमट झाली. या विरोधात लिहीणाºयांना देशद्रोही ठरवले गेले. १९७५ च्या आणीबाणीपेक्षा आज देशात केंद्राची अधिक दहशत आहे. मूठभरांच्या हातात लोकशाही सापडली आहे. आवाज उठवणाºयांना सपवून टाकलं जात आहे. या सगळ्या स्थितीत भाजपाचा देशात पराभव होईल की नाही सांगता येत नाही. मोदींना सत्तेवर उतरवता येईल की नाही, हे आज ठामपणे सांगता येत नाही. पण पुरोगामी महाराष्टÑापुरत बोलायचं तर या महाराष्टÑात २०२४ साली भाजपाचं सरकार पुन्हा येणार नाही याची हमी देऊन ज्यांना लढायचं आहे त्यांना लढा, एकत्र लढा, स्वतंत्र लढा. लढा, लढू नका... काय हवं ते करा... भाजपा येता कामा नये... याची हमी द्या. मग एकमेकांच्या उरावर बसून काय करायचं आहे ते करा... सामान्य माणसांना त्यांची झालेली फसवणूक याबद्दल संताप आहे. महागाईबद्दल संताप आहे, गमावलेल्या रोजगाराबद्दल संताप आहे, या सगळ्याला जे कारण आहे ते सात वर्षांतलं केंद्र सरकार आहे. फडणवीस आणि चंद्रकांत पाटील या बोगस कंपनीच्या हातात महाराष्टÑ पुन्हा जाता कामा नये. याची हमी जो देतोय, त्यांना आघाडी करावी किंवा करु नये. पण ही हमी कोण देणार आहे? एकटे एकटे लढून ही हमी मिळणार आहे का? समजा कॉंग्रेस उद्या एकट लढली आजची निवडणूक म्हणजे १९६० ची निवडणूक नाही. सगळा पैशाचा खेळ आहे. या स्थितीत पक्षाला विजय मिळवून देण्याची स्थिती इतकी सोपी नाही. ६० वर्षांपूर्वी निवडणुकीला पैसा लागत नव्हता आता पैसा आणि जात याच दोन गोष्टी लागतात. त्याची तयारी किती केली आहे? शिवाय आणखीन एक धोक्याचा मुद्दा सांगून ठेवतो. नाना पटोले आल्यामुळे महाराष्टÑ कॉंग्रेसमध्ये उत्साह आहे, पण नाना इकडे स्वबळाच सांगायचा आणि तिकडे दिल्लीत राहुल गांधी १० जनपथपासून ६ जनपथपर्यंत- शरद पवारांच्या घरी चालत जावून आघाडी जाहीर करुन टाकायचे. तसं झालं तर.... तेव्हा स्वबळावर लढायचं असेल तर त्याची घोषणा दिल्लीच्या नेत्यांना करायला लावा, त्यांनाही मैदाना उतरु द्या. नाहीतर नाना इकडे घोषणा करणार आणि दिल्लीचे नेते तोंडघशी पाडणार. कोणीच कोणाची हमी देऊ शकणार नाही. हेच कॉंग्रेसचं सगळ्यात मोठं दुखण आहे. शिवाय येणाºया निवडणुकीपर्यंत भाजपा-शिवसेनेत किती नेते पळून जातील याचीतरी खात्री कोणाला देता येईल का? बंगालच्या वाघिणीसारखा नेता महाराष्टÑात कॉंग्रेसजवळ आज कुठे आहे. तेव्हा थोडं सावकाशिन घ्या.. प्रत्येक दिवशी राजकारण बदलतयं...
सध्या ऐवढेच....
Nice writeup!
ReplyDelete