*श्री प्रताप भाऊ कदम, सौ दिपा कदम लग्न वाढदिवस विशेष*.......

*श्री प्रताप भाऊ कदम, सौ दिपा कदम लग्न वाढदिवस विशेष*.......
..................... 
✍️ *लेखन पै अशोक सावंत -पाटील* सोंडोलीकर 
................................ 
शिराळा तालुक्यातील प्रताप कदम हे असं वेगळे व्यक्तिमत्त्व आहे की *कुस्ती  सारख्या रांगड्या खेळाला विशेष महत्त्व देणारे  कुस्ती प्रेमी, कुस्ती प्रसारक म्हणजे प्रताप भाऊ कदम*...... 
 आज त्यांच्या लग्नाचा बारावा वाढदिवस आहे त्याबद्दल उभयंताना भरभरून शुभेच्छा. 

जवळच्याच गावातील त्यांची अर्धांगिनी आहे, खरंच सांगतो एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे त्याची पत्नी असते अगदी तसंच प्रताप भाऊंच्या बाबतीत आहे, भाऊंना गावाकडे अनेक क्षेत्रात चढउतार आले पण ते खचून न जाता पुढे वाटचाल करत राहिले. आणि त्याच्या मध्ये महत्त्वाचा वाटा कोणाचा असेल तर तो त्यांच्या पत्नीचा म्हणजे दिपा वहिंनीचा ..... सतत त्यांना धीर देत आपला संसार सावरण्याचा त्यांनी नेहमी प्रयत्न केला आहे. या दोघांचीही मनं एकदम मिळतीजुळती आहेत म्हणतात की जन्माच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात अगदी तशाच..... *आणि दुसरे म्हणजे त्यांची 'राजनंदिनी' ही त्यांची मुलगी नॅशनल कराटे चॅम्पियन्स आहे, अनेक स्पर्धेत निर्विवाद विजेती आहे*.. आणि चांगल्या शाळेत शिक्षण सुद्धा घेत आहे. प्रताप भाऊ स्वत: कमी शिकले पण मुलांना ते चांगले शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहेत... आईवडिलांना आदर्श माणुन, त्यांचा शब्द म्हणजे आज्ञा माणुन त्यांची मुलं आपले करियर करु पाहताहेत.... 
    प्रताप भाऊ आणि त्यांच्या पत्नीने जीवनात येऊन काही कमवले असेल तर ती म्हणजे माणुसकी,जिव्हाळा, प्रेम आणि आपुलकी ची माणसं.... हे सर्व अगदी त्यांनी शांत, संयमी, बोलण्याने कमवले आहे 
 
    आजच्या या धावपळीच्या युगात ते स्वतः दिवस रात्र कुस्ती वाढीसाठी प्रयत्न करत असतात. कोणत्याही गावच्या कुस्ती मैदान आयोजकांनी फक्त फोन केला तरी ते कुस्ती मैदान साठी उपस्थित असतात. *३२ शिराळा येथे त्यांच्या स्वमालकीचे प्रितिराज ऑफसेट नावाचे नामांकित प्रेस आहे* आणि दुसरे विशेष म्हणजे ते स्वतः च्या स्वखर्चाने प्रितिराज ऑफसेट च्या  नावाने जाहिरात वरील *मोठ्या कुस्तीतील विजेत्या पैलवानांना कायम शिल्ड देऊन ते त्यांचा गौरव करत असतात*,
 
 कुस्ती क्षेत्राव्यतिरीक्त प्रताप कदम यांची राजकीय क्षेत्रात मोठी छाप आहे. *विद्यमान आमदार मा मानसिगराव भाऊ नाईक यांचे ते अगदी जवळचे सहकारी आहेत* आपल्या लाडक्या नेत्याच्या वाढदिवशी त्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे हा योगायोगच आहे..
तालुक्यात राष्ट्रावादी पक्ष वाढीसाठी त्यांचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्रातील अनेक बड्या नेत्यांबरोबर त्यांचे अगदी सलोख्याचे संबंध आहेत. 
 
असे हे सहृदयी व्यक्तिमत्त्व *श्री प्रताप (भाऊ) कदम व सौ दिपा कदम  या उभयतांना त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसी आमच्या कडून या शब्दरूपी शुभेच्छा*....... 
•••••••••••••••••••••••••
धन्यवाद
*पै अशोक सावंत/ पाटील* कुस्ती संघटक
*कुस्ती हेच जीवन महासंघ महाराष्ट्र राज्य*
अध्यक्ष शाहुवाडी तालुका
9702984006

Comments

Popular posts from this blog

*अनाथ मुलांचे स्वीकारले स्वामी धामने पालकत्व*

संजय गणपती पाटील उर्फ संजू दादा भावपूर्ण श्रद्धांजली

*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*